HOME  

सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव, आज तुषार गांधी, बस बंद मेकॅनिकला दंड, १० टक्के इथेनॉल, सावकार ऐश्वर्या-कर्जदार अमिताभ, डीएसकेला जामीन.....०५ नोव्हेंबर २०१७


सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव, आज तुषार गांधी, बस बंद मेकॅनिकला दंड, १० टक्के इथेनॉल, सावकार ऐश्वर्या-कर्जदार अमिताभ, डीएसकेला जामीन.....०५ नोव्हेंबर २०१७

* मोदी भगवान नही सैतान है, कन्हैय्याकुमार यांची नाशिकच्या सभेत टीका
* कन्हैय्याकुमार यांच्या नाशिकच्या सभेत गोंधळ घालणार्‍या युवकाला अटक, कन्हैय्याकुमार यांच्या आवाहनामुळे सभा झाली शांत
* कितीदा मंत्री होणार, मुख्यमंत्री झालात की, अजून कशाला हवं मंत्रीपद, पतंगराव कदम यांनी सुनावले नारायण राणे यांना
* नोटाबंदीनंतर १७ हजार कोटांच्या नोटांची अफरातफरीचे आरोप अडीच लाख कंपन्यांवर केंद्राकडून बंदी
* मद्याचा खप वाढवायचा असेल तर ब्रॅंडला बाईचे नाव द्या, गिरीश महाजनांचा साखर कारखान्यांना सल्ला, माफी मागण्याची राष्ट्रवादीकडून मागणी
* इस्रोने तयार केले रस्त्यावरचे खड्डे मोजणारे अ‍ॅप, नाशिकात झाली चाचणी
* सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव, मुख्यमंत्र्यांनी केली नागपुरच्या धनगर मेळाव्यात घोषणा
* सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवींचे नाव दिल्याने आजच्या आज मुख्यमंत्र्यांचे पुतळे जाळा शिवा संघटनेचे कार्यकर्त्यांना आदेश
* येणार्‍या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना धडा शिकवू, वीरशैव आघाडीची घोषणा
* ऊसाचे आंदोलन चिघळू लागले, सोलापूर आणि सांगलीत ऊस वाहतुकीला विरोध, ट्रॅक्टरचे टायरच पळवले
* फेरीवाल्यांची कसलीच चूक नाही, चूक तुमची आणि आमची आहे, आजवर का लक्षात आलं नाही? नाना पाटेकरांचा सवाल
* डबघाईला आलेल्या जिल्हा बॅंकांचं राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण करणार, राष्ट्रवादीचा विरोध
* लातूरमध्ये कॉफी शॉपची झाडाझडती, सहा मुली ताब्यात, पालकांचा स्वाधीन, करामती तरुणांच्या पालकांनाही दिली समज
* पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांचा आजचा सत्कार ढकलला पुढे, कारण आजच आहे कॉग्रेसचे जन आक्रोश आंदोलन
* प्रकाश नगरातील धनंजय ‘बाबूराव’ पाटीलला मारहाण करुन खंडणी मागितल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
* महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे आज दयानंद सभागृहात व्याख्यान
* पुण्यात चालती बस बंद पडल्यास मेकॅनिकला होणार दंड
* कसलं कॅशलेस? भाजपा नेतेच करतात रोखीने व्यवहार, एका पाहणीत उघड
* यंदा पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचा निर्णय, शक्यतेची चाचपणी
* अमिताभ बच्चन यांनी सूनबाई ऐश्वर्याकडून घेतले २१.४ कोटींचे कर्ज!
* भ्रष्टाचार आणि दहशतवाद २०२२ पर्यंत होईल हद्दपार- निती आयोग
* साखर कारखान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी समिती, तज्ञ संचालकांची नेमणूक करणार
* नांदेडमधील २४ नगरसेवकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यातले २२ कॉंग्रेसचे
* अलिबागच्या मानगावात एका बाळाला २४ बोटे
* आज मराठी रंगभूमीदिन, सांगली येथे विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग झाला होता ०५ नोव्हेंबर १८४३ रोजी
* औरंगाबादच्या सहारा सिटी होम प्रकल्पातील गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट
* नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा ०८ नोव्हेंबरला पुण्यात मोर्चा
* पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर, ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप, पुढील सुनावणी मंगळवारी
* राज्यात सौर कृषी वीज वाहिन्या उभारून ०३ वर्षांत शेतीसाठी दररोज १२ तास पूर्ण दाबाने अखंड वीजपुरवठा करणार- मुख्यमंत्री
* राळेगणसिद्धीत मुख्यमंत्र्यांवर पाण्याची बाटली भिरकावणारा मूक-बधीर प्रशांत कानडे पोलिसांच्या ताब्यात, नोकरी मिळत नसल्याचा राग
* मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत आले तरी लोकपालसाठी आंदोलन होणारच, २० ते २५ फेब्रुवारी २०१८ च्या दरम्यान दिल्लीत आंदोलन- अण्णा हजारे
* केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सत्तेतून गेल्या शिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत- अशोक चव्हाण
* कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्ज तस्करीतील आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता होणार जप्त
* औरंगाबाद येथे स्वातंत्र्यसंग्राम स्मारक व २१० फूट उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले लोकार्पण
* मराठवाडा मुक्तीलढ्याचा इतिहासाचा समावेश पाठ्यपुस्तकात करावा- राज्यपाल
* देशाची वाटचाल आणीबाणीच्या दिशेने- कवी रामदास फुटाणे
* ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांना औरंगाबाद येथे ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ प्रदान
* पुणे जिल्ह्यात शेतकर्‍यांची कर्जमाफी ०२ लाख २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी, पात्र शेतकरी अवघे १४९, शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमाही जमा झाल्या नाहीत
* हेमलकसातील प्राण्यांचा सांभाळ वनविभागाने ठावला बेकायदेशीर, प्रकाश आमटे भेटले वनमंत्र्यांना
* प्रकाश आमटेंच्या हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पातील प्राणी संग्रहालय पूर्ववत सुरू राहणार
* आधार कार्डावरील नाव, जन्मतारखेपासून अंगठय़ाच्या ठशांच्या गोंधळामुळे निवृत्तिवेतन मिळण्यास होतोय विलंब
* झटपट न्याय पदरी पाडून घ्यायचा तर सामोपचाराने वाद सोडवण्याची संस्कृती आत्मसात करा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा
* मुंबई उच्च न्यायालयाच्या शेजारी पर्यायी वाद निवारण केंद्राचे सरन्यायाधिशांनी केले * उद्घाटन
* 'मी लाभार्थी' या जाहिरातीतून फसवणूक झाल्याची भिवरीतील शेतकरी शांताराम तुकाराम कटके यांची तक्रार
* शेततळे घेतल्यावर शासनाचे अनुदान मिळाले, याचा इतर शेतकऱ्यांनीही लाभ घ्यावा हाच या प्रसिद्धीमागचा हेतू - राज्य सरकारचा खुलासा
* माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ गावात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक गजाआड
* फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने संजय निरुपम यांनी मानले नाना पाटेकर यांचे आभार
* नागपूर येथील प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनीच हत्येची सुपारी दिल्याचं उघड
* ठाणे येथे आयफोन एक्सची खरेदी करण्यासाठी महेश पालीवाल घोड्यावरून दुकानात हजर
* कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमध्ये सिमरिया घाटावर गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, ०४ भाविकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
* राजधानीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी इको-फ्रेंडली, डिस्पोजेबल टॉवेल्स आणि उशांचे अभ्रे देण्याचा रेल्वेचा निर्णय
* फील्ड मार्शल जनरल के.एम. करिअप्पा यांना भारतरत्न सन्मान मिळायला हवा- लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत
* देशातून २०२२ पर्यंत भ्रष्टाचार, दहशतवाद, गरीबी, जातीवाद होणार हद्दपार- नीती आयोगाचा दावा
* २०४७ पर्यंत विकास दर ०८ टक्के राहिला तर जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थेत भारताचा समावेश होऊ शकतो- नीती आयोग
* अ‍ॅपलच्या'आयफोन X' वर चोरट्यांचा डल्ला, सॅन फ्रान्सिस्कोत ट्रकचे लॉक तोडून २४ कोटीचे ३०० पेक्षा जास्त फोन लांबवले
* कमल हसन यांच्यासारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजे - हिंदू महासभा नेते अशोक शर्मा
* पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत, पण आताचे हिंदू हिंसेत सहभागी होतात अशी टीका केली होती कमल हसन यांनी
* काँग्रेसला हिमाचलमधून हद्दपार करा आणि भाजपला निवडून द्या- पंतप्रधान
* काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात राजपोरा पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, ०२ पोलीस जखमी
* राजकोटमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव, न्यूझीलंडचा ४० धावांनी विजय
* हैदराबाद-मुंबई प्रवासात इंडिगोच्या विमानातील ग्राउंड स्टाफने असभ्य आणि उद्दाम वर्तन केल्याची पीव्ही सिंधूची तक्रार


Comments

Top