HOME  

कन्हैय्याकुमार लातुरात मंचावर दाखल, शिक्षकांची बोगसगिरी-तावडे, जीएसटी होणार स्वस्त, मन की बात आवश्यक, मोदक-वडापाव तिकिटांवर, ‘आप’च्या प्रचार साहित्याची चोरी.......०६ नोव्हेंबर २०१७


कन्हैय्याकुमार लातुरात मंचावर दाखल, शिक्षकांची बोगसगिरी-तावडे, जीएसटी होणार स्वस्त, मन की बात आवश्यक, मोदक-वडापाव तिकिटांवर, ‘आप’च्या प्रचार साहित्याची चोरी.......०६ नोव्हेंबर २०१७

* राष्ट्रीय परिवर्तनवादी विद्यार्थी नेते कन्हैय्याकुमार आंबेडकर पार्कवर आले, सोबत आ. अमित देशमुख, भालचंद्र कंगो, सोबत बसवराज पाटील, उदय गवारे, मोईज शेख
* आधार कार्ड स्विसमधील बँक खात्यांशी कधी जोडणार? हार्दीक पटेल यांचा सवाल
* पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्स लीक, ७१४ भारतीयांची नावे अमिताभ, जयंत सिन्हा, माल्या यांचा समावेश
* ममता बॅनर्जी म्हणतात, जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फिश टॅक्स!
* दारुच्या ब्रॅंडला महिलांची नावे देण्याचं प्रकरण: मंत्री गिरीश महाजनांनी मागितली महिलांची माफी
* २०१९ हे वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्ष, शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात, प्रफुल्ल पटेल यांचं अप्रत्यक्ष वक्तव्य
* तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर व्यंगचित्र काढणार्‍या चित्रकाराला अटक, आज मिळाला जामीन
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन २७५८, मूग ५५२२ तर उडीद पोचले ४५०० रुपयांवर (कमाल भाव)
* कन्हैय्याकुमार यांना ऐकायला मीही उत्सुक, विचार समजून घेऊ- आ. अमित देशमुख
* उदगीरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह अंत्यसंस्काराविना १२ दिवसांपासून अमेरिकेतच पडून, भारतात आणण्यात तांत्रिक अडचणी
* गुजरातेत ऊसाला ४४०० रुपयांचा भाव, मग महाराष्ट्रात कमी का? रघुनाथदादा पाटील यांचा प्रश्न
* आज लातुरात राष्ट्रीय युवा नेते कन्हैय्याकुमार यांच्या उपस्थितीत व्हीएस पॅंथर्स संघटनेचे अधिवेशन, आ. अमित देशमुख यांच्या हस्ते उदघाटन
* लातुरच्या एसटीचे कॅंटीन चालवायला कुणीच पुढे येईना, चारवेळा निघाले होते टेंडर
* लातूर जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे ऊसाची वाहतूक कठीण, वाहतुकीचा खर्च वाढणार
* लातुरच्या दयानंद गेट परिसरात सीआयडी असल्याचे सांगून वृद्धाचे दागिने लुटले
* ०७ डिसेंबरपासून शेतकर्‍यांचे राज्यभरात जेलभरो आंदोलन, प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी तुरुंगात जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देणार इच्छापत्र
* मुंबईत पात्र असलेल्या फ़ेरीवाल्यांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल- मुंबई उच्च न्यायालय
* एफआरपीशिवाय अधिक २०० रुपये दोन टप्प्यात देण्याचा कारखानदार व स्वाभिमानीच्या बैठकीत निर्णय
* अनेक शिक्षक वर्गात जात नाहीत, एजंटगिरी करतात, प्रॉपर्टीचा धंदा करतात, त्यांची नावे आपल्याकडे, आधार जोडणीमुळे खोटी पटसंख्या उघड अतिरिक्त शिक्षकांना बाहेर जावे लागेल- विनोद तावडे
* बालभारतीची पुस्तकेच अशी लिहिली जातात की विद्यार्थ्यांना गाइडची गरज पडते, हे षडयंत्र मोडून काढणार-विनोद तावडे
* अभ्यासक्रमात बदल करणे ही काळाची गरज, अभ्यासक्रम स्थानिक संदर्भांवरच आधारित हवा, भगवीकरणाच्या टीकेला घाबरणार नाही- विनोद तावडे
* कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांना मिळणार टनामागे ३०० रुपये जास्त- स्वाभिमानीचे राजू शेट्टी
* सहकारी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमणार, यात शेतकर्‍यांचा समावेश असणार- सहकारमंत्री
* गिरीश महाजन यांचे मद्य आणि महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिलांनी महाजनांच्या फोटोला मारले जोडे
* जीएसटीची १० नोव्हेंबरला बैठक, दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा होणार विचार
* हिंदू धर्मातच जास्त भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा असल्यानेच त्यावर जास्त बोलावे लागते- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव, हिंगोलीत
* भाजपची परवानगी असेल तर हार्दिक पटेल यांच्यासोबत मध्यस्थी करण्याची तयारी- रामदास आठवले
* ऑनलाइन व्यवहारांतील धोके वाढल्याने वैयक्तिक सुरक्षेसाठी ‘बजाज अलियांझ’चा सायबर क्राइम विमा
* टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २६ जणांचा मृत्यू, २० जण जखमी, हल्लेखोरही ठार
* उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या बाबा राघवदास रूग्णालयात ४८ तासात ३० बाळांचा मेंदूज्वराने मृत्यू
* चाळीसगाव गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांचा आत्महत्येचा प्रयत्न, सभापती, उपसभापतींसह ०८ जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
* राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात भारतीय भाषांतील २० हजार चित्रपटांचे जतन, मराठी चित्रपटांची एक प्रत संग्रहालयास देणे बंधनकार- विनोद तावडे
* मराठी साहित्य संमेलन होताना वाद होणं सकारात्मक, दुर्लक्षित विषय बाहेर येतात- राजन खान औरंगाबाद
* वर्धा जिल्ह्यात बोरधरणात सेल्फी काढताना दोन युवकांचा मृत्यू
* ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना नगरच्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
* मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'आयएस' च्या संशयित अटकेत
* सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’सारखा संवादाचा कार्यक्रम महत्वाचा- राज्यपाल सी. विद्यासागर राव
* पुण्यात राज्यपालांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’च्या मराठी अनुवादीत पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन
* राज्य सरकारतर्फे दिला जाणारा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना जाहीर
* पुण्यातील हडपसर भागात आई रागावते म्हणून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या
* देशात सध्या ०७ मेगा फूड पार्क, २०२२ पर्यंत होणार ३५, त्यानंतर अन्नधान्य, फळभाज्या, दूधाची नासाडी ६० टक्क्यांनी घटेल- फेडरेशन ऑफ मेगा फूड
* पोस्ट खात्याने प्रदर्शित केलेल्या भारतातील २४ खाद्यपदार्थांच्या पोस्ट तिकीटांत मोदक आणि वडापावला स्थान
* काँग्रेसने मैदान सोडल्याने हिमाचल प्रदेशातील निवडणुकीत मजा नाही - पंतप्रधान
* नोटबंदी केली नसती तर काश्मीरमधील दहशतवाद्यांकडे पैसा येतो कसा हे आम्हाला कधीच कळले नसते- पंतप्रधान
* 'पोकळ भाषणं पुरे झाली, देशातील महागाई आणि बेरोजगारी नियंत्रित करा अन्यथा खुर्च्या खाली करा'- राहुल गांधी
* बॉलिवूड निर्माते हिंदू गुरू, देवी-देवतांवर तसेच योद्ध्यांवर चित्रपट बनवतात, यापुढे आणखी सहन करणार नाही- भाजप नेते गिरिराज सिंह
* हिंदू दहशतवादावर प्रश्न उपस्थित केला तर राष्ट्रद्रोही ठरवतात, गोळी घालून ठार करण्याची भाषा करतात- कमल हसन
* दिल्लीत आपच्या मुख्यालयातून प्रचाराचे सामान घेऊन चोर पसार
* हाँगकाँगहून भारतात आलेल्या पर्यटकाकडे सापडले ११ आयफोन एक्स, गुन्हा दाखल
* चीनचा पराभव करत भारतीय महिला हॉकी संघाने पटकावले महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेचे अजिंक्यपद
* सौदी अरेबियात ११ राजपुत्र तसेच अनेक आजी-माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक
* हिंदी चित्रपट अभिनेते संजीव कुमार यांचा आज स्मृतीदिन


Comments

Top