HOME  

आज विद्यार्थी दिन, कुठे आहेत अण्णा? ११६ बालगृहांची मान्यता रद्द, नोटाबंदीचा वाढदिवस, सरकार चांगले? मग मोर्चे का निघतात?, एचडीएफसीची ऑनलाईन सेवा मोफत.....०७ नोव्हेंबर २०१७


आज विद्यार्थी दिन, कुठे आहेत अण्णा? ११६ बालगृहांची मान्यता रद्द, नोटाबंदीचा वाढदिवस, सरकार चांगले? मग मोर्चे का निघतात?, एचडीएफसीची ऑनलाईन सेवा मोफत.....०७ नोव्हेंबर २०१७

* कन्हैय्याकुमार आज उस्मानाबाद आणि सोलापुरात, सोलापुरात साधणार पत्रकारांशी साधणार संवाद
* राज्यात आज साजरा होतोय विद्यार्थी दिन, बाबासाहेब आंबेडकारांनी आज शाळेत टाकले होते पहिले पाऊल
* शेतमालाचे भाव घसरले, उद्या शेतकरी संघटनेकडून लातुरचा बाजार बंद, मोर्चाही काढणार
* उद्या लातूर बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेचे उदघाटन
* लातूरहून नांदेडकडे जाणार्‍या बसचालकाने केले होते मद्य प्राशन, प्रवाशांनी बस थांबवली, एसटीने दिला पर्यायी चालक
* निलंगाच्या केळगाव पाझर तलावात आढळली मगर, गावकरी भयभीत, वनविभाग तळ ठोकून
* अ‍ॅलोपॅथी उपचाराचे प्रकरण, लातुरच्या आयुर्वेदीक डॉक्टरांनी पाळला बंद
* लातुरात उघड्यावर मांस विक्री करणार्‍या नऊजणांवर कावाई
* लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा खर्च सादर न करणार्‍या १११० उमेदवारांना नोटिसा
* कॉंग्रेसच्या काळात उठसूठ आंदोलन करणारे अण्णा हजारे आता कुठे आहेत? कन्हैय्याकुमारांचा सवाल
* लवकरच पेट्रोल ८० तर डिझेल ६५ रुपयांवर जाण्याची शक्यता
* मराठवाड्यातील ११६ बालगृहांची मान्यता रद्द
* मास्कोत प्राणी संग्रहालयातील वाघाचा महिला कर्मचार्‍यावर हल्ला,
* भाजप ०८ नोव्हेंबर रोजी पाळणार 'काळा पैसा विरोधी दिवस' तर विरोधक पाळणार नोटाबंदी विरोधी दिन
* नोटाबंदीच्या प्रश्नावर राजकारण पुरे, निर्णय चुकीचा असल्याचे नरेंद्र मोदींनी मान्य करावे- मनमोहन सिंग
* नोटांबदीमुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांवर याचा विपरित परिणाम झाला, अर्थतज्ञ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
* नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होणार, नरेंद्र मोदी ०८ नोव्हेंबर रोजी पुढील रोडमॅप जाहीर करण्याची शक्यता
* एक तुतारी द्या मज आणूनी, फ़ुंकीन जी मी स्वप्राणाने या कवितेचे जनक आद्य मराठी कवी केशवसूत यांचा आज स्मृतीदिन
* ‘आहे मनोहर तरी’ या आत्मचित्राने मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटविणार्‍या सुनीता देशपांडे यांचा आज स्मृतीदिन
* जालना येथे आजपासून दोन दिवस समरसता संगम बैठक, सरसंघचालक मोहन भागवत करणार मार्गदर्शन
* थंडीमुळे भाज्यांचे दर कडाडले, दोन महिन्यांत भाज्यांचे दर वाढले दुपटीने
* राज्यात मूग, उडीद आणि सोयाबीन उत्पादन अत्यंत कमी आल्याने शेतकरी चिंतेत, नाफेड करणार सर्वेक्षण
* राज्यातील शासकीय आणि निमशासकीय साडेतेरा लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय होणार ६० वर्षे
* आरक्षण बदलेल त्यादिवशी सरकार बदलेल, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही- रामदास आठवले
* सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणेवर सोलापूर जिल्हा वीरशैव लिंगायत समाज नाराज
* नोटाबंदीनंतर दाखल केलेल्या २० हजार ५७२ आयकर दात्यांची होणार चौकशी, रिटर्नमध्ये कमाई लपवल्याचा संशय
* नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी ०८ नोव्हेंबरला टि्वटरवर काळा डीपी ठेवण्याचे ममता बॅनर्जी यांचे आवाहन
* देशात ३३ कोटी पॅन आणि ११५ कोटी आधारकार्डधारकांपैकी १३.२८ कोटी पॅनकार्डांची आधारला जोडणी
* बीड येथील वेश्याव्यवसायावर धाड, ०४ ग्राहकांना अटक, ०३ महिलांची सुटका, चालक महिला फरार, ०५ जणांवर गुन्हा
* सैन्य दलात दलितांना आरक्षण द्या, पाकला वठणीवर आणू- रामदास आठवले
* राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेले भाजप सरकार आंधळे आणि बहिरे- भाजप खासदार नाना पटोले, कोल्हापुरात
* सरकारने तीन वर्षांत चांगला कारभार केल्याच्या जाहिराती असतील तर लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात?- नाना पटोलेंचा सवाल
* फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाण्याचे मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधवांना एक कोटीचा जामीन का मागू नये?- सहाय्यक पोलीस आयुक्त
* पालघर जिल्ह्यात गॅसलाईन भूसंपादनात फसवणूक झाल्याच्यी तक्रार, मुंबई-अहमदाबाद हायवेवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
* विदर्भात भाजपची अवस्था फटा पोस्टर निकला हिरो अशी झाली- अशोक चव्हाण
* शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे 'तारीख पे तारीख' सुरू, जीआरमध्ये बदल करणे, अटी-शर्थी बदलणे सुरू- अशोक चव्हाण
* मुंबईत मेट्रो-७ च्या बांधकामादरम्यान पिलरचा सळयांचा सांगाडा कोसळल्याप्रकरणी जे कुमार इन्फ्राला ०५ लाखांचा दंड
* राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व दक्षिण कोरिया दुतावासतर्फे ०९ व १० नोव्हेंबर रोजी पुण्यात कोरियन चित्रपट महोत्सव
* राहुल गांधी यांचा ११ नोव्हेंबरपासून गुजरातमध्ये रोड शो
* एअरलाइनमधील नोकरीसाठी तृतीयपंथीयांचा विचार केला जात नसल्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला नोटीस
* संपादकीय स्वातंत्र्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी करायला हवा, वास्तवाची मोडतोड करणे म्हणजे लिखाणस्वातंत्र्य नव्हे - पंतप्रधान
* गुवाहाटी रेल्वे स्थानकात प्रवाशाकडून सोन्याची सहा बिस्किटे जप्त
* गीतेत म्हटलंय, काम करा, फळाची चिंता करू नका, मोदींनी अर्थ लावलाय - सगळी फळं खा, कामाची चिंता करू नका - राहुल गांधी
* खाजगी क्षेत्रातही आरक्षण असावे असे माझे वैयक्तिक मत- नितीश कुमार
* गुजरातमध्ये नकारात्मक प्रचारापासून दूर राहण्याचे राहुल गांधी यांचे आदेश, मोदीना लक्ष्य करू नका
* गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीत जीएसटी आणि नोटाबंदीचा काँग्रेसचा मुद्दा
* गुजरातच्या निवडणूक प्रचारात उतरणार मनमोहन सिंगही उतरणार
* कतार एअरवेजचे बाली येथे जाणारे विमान नवरा-बायकोच्या भांडणांमुळे उतरवले चेन्नईत
* हैदराबाद येथे सुरू असलेल्या १० व्या अर्बन मोबिलिटी कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या स्टॉलला प्रथम पारितोषिक
* युद्ध करणे हा पर्याय नसून काश्मीरसह इतर प्रलंबित मुद्दे चर्चेद्वारेच सुटू शकतात- पाक पंतप्रधान
* भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेतला आखेरचा सामना आज रंगणार तिरुअनंतपूरममध्ये
* एचडीएफसी बँकेने ऑनलाइन व्यवहारांसाठी एनईएफटी आणि आरटीजीएस सेवा केली मोफत, वर्षभरात प्रति ग्राहक एकच चेकबुक


Comments

Top