HOME  

शेतमाल तारणात लातूर राज्यात दुसरे, आ. अमित देशमुखांचा आक्रोश, कर्जमाफीनंतरही ०३ आत्महत्या, आज एक्स रे दिन, संघाचा नाही घटनेवर विश्वास, सितारा देवी ९७.....०८ नोव्हेंबर २०१७


शेतमाल तारणात लातूर राज्यात दुसरे, आ. अमित देशमुखांचा आक्रोश, कर्जमाफीनंतरही ०३ आत्महत्या, आज एक्स रे दिन, संघाचा नाही घटनेवर विश्वास, सितारा देवी ९७.....०८ नोव्हेंबर २०१७

* लातूर बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेचा सभापती ललितभाई शहा यांनी केला शुभारंभ, पणन महासंघाच्या उपव्यवस्थापक शुभांगी गोंडही उपस्थित
* शेतमाल तारण योजनेत लातूर बाजार समिती राज्यात दुसर्‍या क्रमांकावर- पणन विभागीय उपव्यवस्थापक शुभांगी गोंड
* नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण, लातुरात ठिकठिकाणी निषेध, राष्ट्रवादीने केले बोंबाबोंब आंदोलन
* नोटाबंदीच्या विरोधात आज लातूर कॉंग्रेस काढणार कॉंग्रेस भवन ते गंजगोलाई मोर्चा, आ. अमित देशमुख करणार नेतृत्व
* लातुरात आज शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ
* लातुरच्या दुसर्‍या बसस्थानकात बसणार सीसीटीव्ही कॅमेरे
* खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव कमालीचा घसरला, लातुरचे शेतकरी हैराण
* प्रसिद्ध साहित्यिक सूर्यनारायण रणसुभे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त्त १२ नोव्हेंबर रोजी लातुरात विविध कार्यक्रम
* लातूरच्या अनेक शाळांनी साजरा केला विद्यार्थी दिन
* उदगीर शहरातील ३९०० ग्राहकांनी नाकारले स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान
* लातुरच्या नळांना बसवणार मीटर्स- नवे आयुक्त अच्युत हंगे
* शेतीमालाच्या विक्रीसाठी ऑनलाईन पद्धत बंद करा, शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी सहकार मंत्र्यांकडे मागणी
* दिवाळखोरीत निघालेल्या लातुरच्या विठ्ठल नागरी बॅंकेच्या ग्राहकांना पात मिळणार ठेवी, प्रशासकांनी दिली माहिती
* मराठवाड्यात तीन शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या, औंढ्याच्या महिला शेतकर्‍याचा समावेश
* खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मंत्रालयात स्थापन होणार वॉररुम
* आज नोटाबंदीचा वाढदिवस, सरकारचा आज काळापैसा विरोधी दिन तर विरोधकांचा काळा दिन
* दिल्लीत नोटाबंदीच्या विरोधात युवक काँग्रेस कार्यकर्ते आज आरबीआयसमोर करणार आंदोलन
* हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतीतील कचरा जाळल्याने दिल्लीत प्रदूषणात वाढ, पाचवीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर
* नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधातील निषेधात्मक आंदोलन अद्रमुकने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केले रद्द
* नागपूर येथील बिल्डर आदित्य बोंदरे यांच्या कारमधून १५ लाखांची रोकड लंपास
* आज जागतिक 'एक्स रे दिन', भ्रूणहत्येला विरोध करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट संघटनेचा ‘रक्षा’ नावाचा उपक्रम
* राज्यात सध्या कोरडे हवामान, जोडीला तापमानातही वाढ, पुढील तीन दिवस तापमानवाढ
* मंदिरांचे चुकीचे सर्वेक्षण, २००९ नंतरची मंदिरे अनधिकृत ठरविल्याच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची मठ मंदिर बचाव संघर्ष समितीची हाक
* विदर्भात वर्षभरात ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या आणि न लावलेल्या ०६ वाघांची वीज प्रवाहाने शिकार
* संघ परिवाराचा राज्य घटनेवर विश्वास नसल्याचे त्यांच्या विधानांवरूनच दिसते, यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी- कन्हैयाकुमार
* देशाची प्रागतिक वाटचाल राज्य घटनेवरच होऊ शकते, संघाच्या संकुचित विचारधारेने देशाची अधोगतीच होईल- कन्हैयाकुमार
* कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांच्या ९७ व्या वाढदिवसाच्या गूगल ने 'डूडल' तयार करुन केला सन्मान
* महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांची आज जयंती
* केंद्रात एकाधिकारशाही वाढत असून लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे- शरद पवार
* शिवसेना सरकारमध्ये समाधानी नाही, सरकारचा पाठिंबा काढल्यास आम्ही पाठिंबा देणार नाही- शरद पवार
* उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर, पवार यांनी दिला भेटीबाबत दुजोरा
* राज ठाकरे १० नोव्हेंबरला नाशिकमध्ये भेटणार समृद्धी महामार्ग आंदोलकांना
* विशेष आर्थिक क्षेत्राच्या विकासकांना, सहविकासकांना तसेच तेथील उद्योगांना मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय
* गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी डीएस कुलकर्णींच्या जामीन अर्जावर आज निकाल
* औरंगाबाद येथे एकच फ्लॅट तीन जणांना विकून दीड कोटींची फसवणूक करणार्‍या ‘प्रसन्न कन्स्ट्रक्शन’चा मालक प्रफुल्ल मांडेचा जामीन अर्ज फेटाळला
* पाच महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याच्या कारणावरुन जिंतूर तालुक्यातील बोर्डीच्या अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
* राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी दहा कोटींचा निधी मंजूर
* कार्तिकी यात्रेत विठ्ठलाच्या चरणी ०१ कोटी ८६ लाख अर्पण
* प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राला रॉयल्टी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे समन्स
* मुस्लिम सत्यशोधकचे संस्थापक हमीद दलवाईंवर काढणार नाट्य अभिनेत्री ज्योती सुभाष माहितीपट, नसीरुद्दीन शाह असणार माहितीपटात
* छत्रपती शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला उजाडणार पुढचं वर्ष- रितेश देशमुख यांची माहिती
* मुंबईतील केईएम रुग्णालयात २०१४ ते २०१७ या तीन वर्षांत ०१हजार ६० अर्भके जन्मत:च दगावल्याची माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती उघड
* राज्‍यातील १२ लाख बोगस रेशनकार्ड रद्द, तीन ते चार हजार कोटीच्या धान्याची बचत- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
* ट्विटरच्या शब्दमर्यादेत वाढ, लिहिता येणार २८० शब्दापर्यंत मजकूर
* मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात परपुरुषाबरोबर पळून गेली म्हणून महिलेला पतीला खांद्यावर घेऊन ०२ किमी चालायला लावणारे ०६ जण ताब्यात
* केवळ पोकळ आश्वासने देऊ नका, अंमलबजावणी करा- खाजगी क्षेत्रात ५० टक्के आरक्षण नितीशकुमारांनी उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर मायावती
* जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांत जैश-एचा म्होरक्या मसूद अझहरचा तलहा रशीदचा समावेश
* नोटाबंदी हे केंद्र सरकारने उचललेले नैतिक पाऊल, २ जी, कॉमनवेल्थ गेम्स, कोलगेट अशा घोटाळ्यात मात्र लूट झाली- अर्थमंत्री अरुण जेटली
* ‘अल-कायदा’ला आर्थिक मदत केल्याप्रकरणी याहा फारुख मोहम्मद या भारतीय तरुणाला अमेरिकेत सुनावली २७ वर्षे आणि ०६ महिन्यांची शिक्षा
* भारताच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर सहा धावांची मात
* पॅराडाइज पेपर्स प्रकरणात कोलंबियाचे अध्यक्ष, जॉर्डनची राणी आणि तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या कुटुंबियांनी कर चुकवल्याचे उघड
* पॅराडाइज पेपर्स घोटाळ्यात परदेशात आर्थिक गुंतवणूक करण्यात सन ग्रुपचे नंदलाल खेमका आघाडीवर


Comments

Top