HOME  

सेना लढणार गुजरातेत, हिमाचलमध्ये विक्रमी मतदान, आता विम्यालाही लागणार आधार, कोपर्डीचा निकाल १८ तारखेला? पोलिस महासंचालकांना नोटीस.....०९ नोव्हेंबर २०१७


सेना लढणार गुजरातेत, हिमाचलमध्ये विक्रमी मतदान, आता विम्यालाही लागणार आधार, कोपर्डीचा निकाल १८ तारखेला? पोलिस महासंचालकांना नोटीस.....०९ नोव्हेंबर २०१७

* शिवसेनेचे घुमजाव, शिवसेना गुजरात विधानसभेच्या ४० जागा लढणार, भाजपाला फटका बसण्याची शक्यता
* हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ७४ टक्के मतदान, कॉंग्रेस अन भाजपात कांटे की टक्कर
* सद्यस्थितीत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज, महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांचे एकमत
* विमा पॉलिसीलाही जोडावे लागणार आधार कार्ड, अन्यथा पैसे मिळणार नाहीत, एलआयसीचा निर्णय
* गुजरातेत मोदींच्या लोकप्रियतेत घट, निवडणुकीत भाजपाच जिंकण्याचा पाहणी अहवाल
* झाकीर नाईकचे प्रत्यार्पण करण्यास मलेशिया तयार
* २० नोव्हेंबरला दिल्लीत देशभरातील शेतकरी संघटनांचे आंदोलन, केंद्रापुढे पेच
* सोलापुरात शेतकर्‍यांनी काढला सहकार मंत्र्यांच्या घरावर मोर्चा
* कोपर्डी खटल्याचा निकाल १८ नोव्हेंबरला लागण्याची शक्यता
* ‘एक मराठा लाख मराठा’ चित्रपटात आर्चीचे आई वडीलही काम करणार
* अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी पोलिस महासंचालकांना मानवी हक्क आयोगाची नोटीस
* मंगळ ग्रहाच्या सफरीसाठी भारतातील दीड लाख जणांनी केले नासाकडे तिकीट बुक!
* लातुरात बोगस तुकड्यांप्रकरणी सरस्वती शाळेचे रेकॉर्ड जप्त
* बोगस तुकड्यांप्रकरणी उच्च न्यायालयात १५ नोव्हेंबरला सुनावणी, पोलिसांकडून तिघांचे तपास पथक नियुक्त
* हाडगागावी मनसेनं नोटाबंदीचं श्राद्ध घालत गावकर्‍यांना दिलं सोयाबीनचं प्रत्कात्मक जेवण
* आपण थेट नगराध्यक्ष झालो, आपल्या निवडीचे सूत्रधार शिवाजी पाटील कव्हेकर- डॉ. जनार्दन वाघमारे
* चाकूर तालुक्यात शिधापत्रिकेतील ६५०० सदस्यांची नावे रद्द
* लातुरात स्वतंत्र महात्मा बसवेश्वर विद्यापिठाची स्थापना करा, शेकापचे उदय गवारे यांची मागणी
* लातुरच्या भुसार लाईन बाजारात सराफाची नजर चुकवून तिघांच्या टोळीने लंपास केले दीड लाखांचे दागिने
* लातूर जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन होणार राष्ट्रीयकृत बॅंकेतून
* येरोळ येथे बाहुबली कासार या तरुण शेतकर्‍याने केली कर्जाला कंटाळून आत्महत्या
* शेतीतील फवारणीसाठी उमरदरा येथे झाले प्रशिक्षण शिबीर, फवारताना मास्क आणि गॉगल वापरण्याचे आवाहन
* मराठा आरक्षण प्रकरणी न्यायालय देईल तो निर्णय मान्य- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
* हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागांवर आज मतदान, ६२ आमदारांसह ३३८ उमेदवार मैदानात, फक्त १९ महिला लढाईत
* मुंबईत रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या हातांचे होणार प्रत्यारोपण, राज्यातील पहिली हस्तप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
* जीएसटीअंतर्गत येणाऱ्या २८ टक्के वस्तूंवरील करात होणार घट- जीएसटी समिती सदस्य सुशील मोदी
* मुंबईसह राज्यातील खड्डयांच्या प्रश्नावर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाने दोन न्यायमुर्तींची समिती स्थापन करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय
* सांगलीत पोलीस ठाण्यातून पलायन केलेल्या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू, मृताला जाळूनही टाकले. पोलीस उपनिरिक्षकासह पाचजणांना बेड्या, निलंबित
* फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी पदाधिकाऱ्यांवरच मुंबई, ठाणे व पुण्यात पोलिसांच्या कारवाईचा सपाटा- मनसेचा आरोप
* राज्यात दोन वर्षांत पंतप्रधान आवास योजनेतील २२ लाख घरांच्या संकल्पातील अवघ्या २१ हजार घरांचे काम सुरू
* महिला शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाहासाठी आपले आयुष्य वेचणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा आज स्मृतीदिन
* ठेवीदारांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ०१ हजार ३४०हून अधिक लोकांची फसवणूक, डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फ़ेटाळला
* राज्य वन विभागाचे स्वतंत्र जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सेंटर नागपूर आणि पुणे येथे उभारले जाणार
* कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील तीन दिवसांच्या किरणोत्सव सोहळ्याला आजपासून सुरूवात, सूर्यास्ताची किरणे पडतात देवीच्या गाभाऱ्यात
* अंगणवाडी सेविकांचे सप्टेंबर २०१७ पर्यंतचे मानधन त्यांच्या खात्यात जमा
* टेस्ट ट्रॅकच उपलब्ध नसल्याने राज्यातील २७ आरटीओ कार्यालयांत वाहनांची फिटनेस चाचणी बंद
* कॅशलेस व्यवहारांवरील सेवाकर रद्द झाल्यामुळे कॅशलेस व्यवहार करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची बचत
* नोटाबंदीमुळे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि काळा पैसा उघड करण्यात यश- मुख्यमंत्री
* नोटाबंदीमुळे मंदी आल्याचा कांगावा, देशात कुठेही महागाई किंवा मंदी नाही, सर्वसामान्य माणूस खूश- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
* नोटाबंदीमुळे ९० टक्के काळा पैसा बाहेर, ०३ लाख ६८ लाख बँक खात्यातील व्यवहार संशयास्पद- नितीन गडकरी
* मंत्र्यांना खोलीत कोंडून नोटाबंदी जाहीर करणार्‍या पंतप्रधानांनी भारतातील भरभराटीच्या अर्थव्यवस्थेतला आत्मविश्वास संपवून टाकला- राहुल गांधी
* औरंगाबादेत नोटाबंदीच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले मुंडण, तर नाशिकमध्ये सरकारची काढली अंत्ययात्रा
* नोटाबंदीच्या निषेधार्थ वर्षश्राद्ध : नाशिकमध्ये शिवसेनेचे रामकुंडावर तर मुंबईत राष्ट्रवादीचे आझाद मैदानावर
* स्वच्छ, पारदर्शी कारभाराची स्वप्ने दाखवत सत्ता बळकाविलेल्या नरेंद्र मोदींच्या काळात देशाचे अतोनात नुकसान झाले- कन्हैयाकुमार
* नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांसाठी नव्हे तर देशातील भांडवलदारांसाठी होता- कन्हैयाकुमार
* कन्हैया कुमार भेटला कोल्हापुरात गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांना
* प्रामाणिक व्यापार, उद्योग करणाऱ्यांकडे पंतप्रधान संशयित दृष्टीने बघतात- राहुल गांधी
* नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांवर आपत्तींचा डोंगर कोसळला असताना त्यात कुठली नैतिकता होती?- पी. चिदम्बरम
* नोटाबंदीच्या निर्णयाने काळा पैसा नष्ट झाल्याचे भासवले जात आहे तोच गुजरात निवडणुकीत मागच्या दाराने परत येणार- पी. चिदम्बरम
* वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त नरेंद्र मोदींच्या फोटोला केक भरवून केला जल्लोष
* दिल्लीत नोटाबंदीच्या निषेधार्थ आपची केंद्र सरकारविरोधात निदर्शने
* दिल्ली परिसरात जमिनीपासून कमी उंचीवरच दाट धुक्याचा थर पसरल्याने शाळांना रविवारपर्यंत सुट्टी, ट्रक प्रवेशावर बंदी
* केंद्र सरकार जानेवारी महिन्यापासून डिजिटल व्यवहारांच्या जनजागृतीचा दुसरा टप्पा राबवणार
* नवी दिल्लीतील गुरुग्राममध्ये रेयॉन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रद्युम्न ठाकूरची हत्या अकरावीतील विद्यार्थ्याने परीक्षा टाळण्यासाठी केल्याचे स्पष्ट
* चेन्नईत जया टीव्हीच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड
* उत्तर प्रदेशात सहारनपूरमध्ये मध्यरात्री जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
* निवडणुकीत एकगठ्ठा मतदानाचे गलिच्छ राजकारण घडल्यास साहित्यिक निवडणुकीत रस दाखवणार नाहीत- साहित्य संमेलन उमेदवार राजन खान
* भारतातील चिथावणीमुळे होणारा धार्मिक हिंसाचार रोखणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना पाच लाखाचे अनुदान- अमेरिका
* बेस्ट आगारात नृत्यसोहळ्यात बेस्ट कर्मचारी माधवी जुवेकर या अभिनेत्रीवर पैशांची उधळण, जुवेकरांसह ११ जणांवर ठपका
* पी. व्ही. सिंधूचा पराभव करत सायना नेहवालनं पटकावले ८२ व्या सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पीयनशीपचे जेतेपद
* बॉक्सर एमसी मेरी कोमने पटकावलं आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक


Comments

Top