HOME  

जीएसटी झाला कमी, पद्मावतीवर बंदी घालण्यास नकार, लातुरात उधारी सुरु, डीएसकेची मालमत्ता जप्त, केंद्रातल्या कर्मचार्‍यांना २५ लाख.....१० नोव्हेंबर २०१७


जीएसटी झाला कमी, पद्मावतीवर बंदी घालण्यास नकार, लातुरात उधारी सुरु, डीएसकेची मालमत्ता जप्त, केंद्रातल्या कर्मचार्‍यांना २५ लाख.....१० नोव्हेंबर २०१७

* च्युईंगम ते साबण, १७७ वस्तुंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरुन झाली १८ टक्के! केवळ पन्नास टक्के वस्तूंवर २८ टक्के
* आठ राज्यात हिंदुंना अल्पसंख्याकाचा दर्जा द्या, सर्वोच्च न्यायालयाने नाकारली याचिका, हा विषय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा असल्याचे केले नमूद
* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन २६७६, मूग ५३५१ तर उडी पोचके ४१९० रुपयांवर (कमाल भाव)
* जीएसटीचा दर २८ टक्क्यांवरुन कमी करा, त्रैमासिक रिटर्नची सुविधा द्या, जीएसटीच्या बैठकीत विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांची मागणी
* ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, चित्रपटाला परवानगी देणे-नाकारणे संबंधित नियामक मंडळाचा अधिकार, केले स्पष्ट
* ‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात ठाण्यात जोरदार आंदोलन
* ऊसाला ०३ हजार ४०० रुपयांचा किमान दर जाहीर करावा या मागणीसाठी अहमदनगरात शेतकर्‍यांचे आंदोलन
* ‘उधारी चालू आहे’ फायनान्स कंपन्यांना हाताशी घेऊन लातुरच्या टीव्ही, फ्रीज दुकानदारांनी दुकानांसमोर लावल्या पाट्या
* किर्तनकुमार शेलारमामांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना, पुणे विद्यापिठाचा फतवा
* मुंबईत म्हाडाच्या ८१९ घरांची सोडत जाहीर
* डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात, १४०० कोटींचं कर्ज
* समृद्धी रस्त्याविरोधात सगळे संघटीत व्हा, राज ठाकरे यांचे आवाहन, शेतकर्‍यांना विश्वास
* मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील गॅलरीत तरुण उभा शोले आंदोलन, कृषी मंत्र्यांना भेटण्याची मागणी
* नगर जिल्ह्यातील पारनेर येथे शाळकरी मुलीवर बलात्कार करुन खून केल्या प्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा
* केंद्रीय कर्मचार्‍यांना घरासाठी केवळ साडेआठ टक्के दराने मिळणार २५ लाख रुपये
* कल्पना गिरी खून प्रकरणाचा तपास संथ गतीने, सीबीआयच्या तपास कामावर न्यायालयाची नाराजी
* गिरी प्रकरणाची पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला
* किल्लारी कारखाना सुरु करण्यासाठी शेतकर्‍यांनी काढला मोर्चा, कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन
* अनियमित आणि कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्याने लातूर जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या शेतीपंपाच्या मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले
* १५ नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची व्यथा अधिकारी ऐकून घेणार, लवकरच सरकारी योजनांचा लाभ
* शेतकरी संघटनेच्या बंदमुळे लातूर बाजार समितीच्या बाजारात साचले नियमित आवकपेक्षा दीडपट सोयाबीन
* रस्ते प्रकरणी पत्रकारच विरोधकांची भूमिका बजावतात, वर्तमानपत्रात चांगल्या बातम्या मॅनेज करा- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
* सांगली, सातारा जिल्ह्याला ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का, केंदबिंदू कोयना परिसरात
* मुंबईत म्हाडाच्या ८१९ घरांसाठी आज सोडत, ६५ हजार नागरिक प्रतिक्षेत
* आजपासून जीएसटी परिषदेची बैठक, दैनंदिन वापराच्या २०० वस्तूंवरील जीएसटी होणार कमी
* जीएसटी होणार कमी होणार्‍या वस्तुंमध्ये सॅनिटरी वेअर, सुटकेस, वॉलपेपर, प्लायवूड, लेखनसाहित्य, घड्याळ, खेळणी वस्तूंचा समावेश
* नाशिक जिल्ह्यात बियाणे कंपनीच्या कार्यक्रमात नाश्त्यातून शेतकर्‍यांना विषबाधा, एकाचा मृत्यू, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
* कांद्याचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी कांदा आयातीची सरकारने दिली परवानगी
* अमरावतीत डीजे सुरु ठेवण्यावरुन मारहाण करणारे चार पोलिस निलंबित, पाच पोलिसांची बदली
* दिल्लीतील प्रदूषण टाळण्यासाठी पंजाब आणि हरयाणातील पिके जाळू नयेत, केजरीवालांनी केली संबंधित मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती
* शास्त्रीय संगिताच्या कार्यक्रमाच्या तिकिटावरील २८ टक्के जीएसटी कमी करण्याची मागणी, मान्य न झाल्यास सवाई संगीत महोत्सव महागणार
* नाशिक जिल्ह्यातील ब्राम्हणवाडी शिवारातील ऊसाच्या शेतात सापडले बिबट्याचे तीन बछडे
* कोल्हापुरात अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, मावळतीची किरणे पडतात देवीच्या पायथ्याशी, पाहण्यासाठी मोठी गर्दी
* सांगलीत पोलिस कोठडीतील अनिल कोथळे मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेंसह सहाजणांना १२ दिवसांची पोलीस कोठडी
* ‘पद्मावती’ चित्रपटात कसलाही आक्षेपार्ह प्रसंग नाही, संजय लिला भन्साळी यांनी सोशल मिडियावर केला एक व्हिडीओ प्रसारित
* भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेल्या व्यक्तीचे ’पद्मावती’त चुकीच्या पद्धतीने चित्रण, चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घाला- भाजप आमदार मंगलप्रभात लोढा
* औरंगाबादच्या उस्मानपुरा परिसरातील एका पंपावर पाणी मिश्रीत पेट्रोल, विक्री थांबवली
* राज्यातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत, तर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ३० डिसेंबरपर्यंत भरणार- सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील
* यवतमाळ जिल्ह्यात तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यामुळे एक शेतकरी गंभीर जखमी
* चंद्रपूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने वर्षभरात सहा वाघांचा मृत्यू, वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकरी सोडतात कुंपणात विजेचा प्रवाह
* मुंबई विद्यापीठाने विधी विभागाची परीक्षा ढकलली पुढे, १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती परीक्षा
* शासनाने ठरवून दिलेल्या दूध दरकपातीपेक्षा जादा कपात करणाऱ्या दूध संघावरच्या कारवाईचे आदेश मागे- दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १८ नोव्हेंबरला ठाण्यात जाहीर सभा
* ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना शनिवारी रायबरेलीत 'डॉ राममनोहर त्रिपाठी लोकसेवा सम्मान'केला जाणार प्रदान
* राष्ट्रवादीचे जयवंत सुतार नवी मुंबईच्या महापौरपदी, उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे
* कोल्हापूर चित्रनगरीचे उदघाटन डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार
* सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या ट्रेलरवर सोशल मिडियावर कोट्यवधी प्रेक्षकांच्या उड्या
* जीएसटी आणि सोने खरेदीच्या केंद्र सरकारच्या नियमामुळे सोन्याची मागणी ३० टक्क्यांनी घटली- ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’चा अहवाल
* भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज वडोदरात भेटणार पक्षाच्या कार्यकर्त्यांना
* मुंबईत गृहसंकुल आवारात कचऱ्यावरील प्रक्रिया करणे होणार बंधनकारक, २० हजार चौ.मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या गृहनिर्माण संकुलांना बंधन
* लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीचा राज्यात जिल्ह्यांना पुरवठा न झाल्याने ०३ कोटी ५२ लाख पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न लटकला
* कोठडीतील मृत्यूत राज्य आघाडीवर, २०१५ मध्ये देशात ९७ मृत्यूंपैकी १९ मृत्यू राज्यात, बहुतांश मृत्यू आत्महत्या व आजारपणाने- ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ची आकडेवारी
* वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’ला आळा घालण्यासाठी अनधिकृत पॅथॉलॉजीकडे रुग्णांना पाठविणाऱ्या डॉक्टरांचा समावेश करा- राज्य पॅथॉलॉजी असोसिएशन
* मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाने वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना सकाळी व संध्याकाळी बायोमेट्रिक हजेरी केली सक्तीची
* वैद्यकीय चिकित्सकांमध्ये समन्वयाचा आभाव, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथीमध्ये चिकित्सक विभागले गेले आहेत- मोहन भागवत पुण्यात
* पुण्याचे आयुर्वेदाचार्य वैद्य परशुराम यशवंत खडीवाले (वैद्य खडीवाले) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
* देशातील सामान्य माणसाला आरोग्य आणि शिक्षणाचे जास्त महत्व, आर्थिकदृष्ट्या त्या दुर्लभ होत चालल्या आहेत- मोहन भागवत
* जगात भारतीय लोकांना त्यांच्या कर्तृत्त्वामुळे नव्हे तर देशामुळे सन्मान मिळतो- मोहन भागवत
* दिव्यांग विषयावरील राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत राज्याच्या तीन लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार, पुणे आणि मुंबईचे दिग्दर्शक सन्मानित
* हार्दिक पटेलच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीला शिक्षण संस्था, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे काँग्रेसने दिले पर्याय
* वस्तू व सेवा कर अपयशी ठरल्याचा दावा करत काँग्रेस सुरतमधील व्यापाऱ्यांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहे- स्मृती इराणी
* केरळमध्ये सौरऊर्जा घोटाळ्यातील कंपनीला माजी मुख्यमंत्री ओम्मन चंडींनी सहकार्य केल्याचा अहवाल विधान सभेत सादर
* अनुकूल निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या नावावर लाच मागितली गेल्याची याचिका, सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींची समिती
* पश्चिम बंगाममध्ये डोंगरी भागातून दोन तरूणांना ०४ लाख ८० हजारांच्या बनावट नोटांसह अटक, सीमेपलिकडे छापखाने सुरू असल्याची शंका
* बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नाकारली आपची राज्यसभेची उमेदवारी
* रिलायन्स जिओची प्राइम ग्राहकांसाठी २५९९ रुपयांपर्यतची कॅशबॅक ऑफर, निवडक ठिकाणी खरेदी करताना ऑफरचा लाभ घेऊ शकणार
* २०१८ मध्ये देशातील उर्जा, गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि रिटेल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे १० टक्क्यांनी वाढणार पगार- सॅलरी बजेट प्लॅनिंगचा रिपोर्ट
* कर्नाटकातील कलबुर्गीमधील वाडी स्थानकावर मोटरमनशिवाय एक्स्प्रेसचं इंजिन धावलं १३ किलोमीटर
* जर्मनीतील क्लायमेट चेंज संमेलनात १९७ देशांचे २५ हजार नागरिक, संमेलन पेपरलेस, ६०% भोजन शाकाहारी, चहा-कॉफीसाठी मातीच्या कपाचा वापर, चर्चा * तंबूंत


Comments

Top