HOME  

दाऊदच्या हॉटेलच्या जागी शौचालय, मुंबईत रक्ताची टंचाई, सोयाबीनचे अनुदान आले, १८ ला लोड शेडींग, बेस्टमध्ये इलेक्ट्रीक बसेस, ज्येष्ठांना घरपोच बॅंक सेवा......११ नोव्हेंबर २०१७


दाऊदच्या हॉटेलच्या जागी शौचालय, मुंबईत रक्ताची टंचाई, सोयाबीनचे अनुदान आले, १८ ला लोड शेडींग, बेस्टमध्ये इलेक्ट्रीक बसेस, ज्येष्ठांना घरपोच बॅंक सेवा......११ नोव्हेंबर २०१७

* लातुरात अधिकृत स्कूल बस चालकावर पोलिसांकडून कारवाई, अधिकृत चालकांनी लावल्या गाड्या पोलिस ठाण्यात, परवाने परत घेण्याची मागणी
* पुणे विद्यापिठाच्या कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून बिर्याणी खाण्याचं आंदोलन, कार्यकर्त्यांसोबत कुलगुरुंनीही दिल्या घोषणा
* लातुरच्या कव्हा मार्गावर पोलिस असल्याचे भासवून एका वृद्धाला लुटले दीड लाखाला, दोघांविरुद्ध गुन्हा
* लातूर तालुक्यातील दगडवाडीत डीपीचे फ्यूज बसवताना विजेच्या झटक्याने शेतकर्‍याचा मृत्यू
* जीएसटीमुळे लातूर मनपाने पुन्हा काढली नळाच्या मीटर्सची ऑनलाईन निविदा
* रेल्वेखाली चिरडल्याने वडवळच्या २१ तरुणाचा मृत्यू
* लातूर आरटीओ कार्यालयातील १६ सेवा झाल्या ऑनलाईन
* शाळा बंद पडली तरी समायोजन नाही, पगारही नाही, एलएम जाधव या उदगीरच्या शिक्षकाची आत्मदहनाची तयारी
* लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे साडे एकोणीस कोटी रुपयांचे अनुदान आले, आठवडाभरात पडणार शेतकर्‍यांच्या खात्यांवर
* तीव्र रक्तटंचाईमुळे मुंबईत अनेक शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे
* दाऊदची कार लिलावात घेऊन जाळणारे स्वामी चक्रपाणींचा दाऊदच्या भेंडी बाजारातील हॉटेलवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा मनोदय
* पात्र शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम देणार - सहकरमंत्री सुभाष देशमुख
* हॉटेलमधल्या जेवणावरील जीएसटी १८ वरुन आला पाच टक्क्यांवर
* मार खाणारे नव्हे मारणारे कार्यकर्ते हवेत, नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
* २०२२ पर्यंत मुंबईत बांधणार ५० हजार नवी घरे
* १८ नोव्हेंबरला सरकार पुरस्कृत अघोषित लोडशेडिंग, जनरेटर्स, इनव्हर्टर्स, मेणबत्त्या तयार ठेवा- राज ठाकरे
* ठाकरे यांचं १८ नोव्हेंबरचे भाषण ऐकता येऊ नये म्हणून लोडशेडिंगबरोबर केबल बंद होऊ शकतात- मनसेला संशय
* मुख्यमंत्र्यांनी एखादी संस्था मराठवाड्यात आणावी, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, पाणीप्रश्न मार्गी लावावे, पंकजा मुंडेंबरोबर काम करेन- धनंजय मुंडे
* पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना दोन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर
* गर्भलिंग निदान कायद्याच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पुण्यातील दोन डॉक्टरांना एक वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा
* मुंबईत बेस्टच्या ताफ़्यात चार इलेक्ट्रिक बसेस दाखल
* पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी भारतीय उच्चायुक्तालयाला प्राप्त झाले पत्र
* दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणार घरपोच बॅंक सेवा, रिझर्व बॅंकेचा निर्णय
* कराड जनता बॅंकेवर आरबीआयचे निर्बंध ३३ शाखांमधून ग्राहकांना दररोज काढता येणार फक्त एक हजार रुपये, थकित कर्जाच्या अनियमिततेमुळे निर्णय
* प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, बदल्यांबाबत राहतील सरकारकडेच अधिकार
* गुजरातमधल्या गीर जंगलात सिंहाचा पाठलाग करणार्‍या चारपैकी तीन तरुणांना अटक
* कोल्हापुरातील अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या आड येणारी अतिक्रमणे हटवली
* गरज नसताना रुग्णांवर महागडे उपचार करणार्‍या डॉक्टरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फटकारले
* सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी उधळले सोयाबीन
* कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग
* नागपुरात नवव्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी
* सरकारकडून कृषी क्षेत्राकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नाही, कृउबाचे मूल्य शास्त्रीय पद्धतीने ठरवणे ही काळाची गरज- व्यंकय्या नायडू
* पुणे, नागपूर, गोवा व त्रिची विमानतळांवर प्रवाशांच्या हँडबॅगेजला टॅग लावून त्यावर स्टॅम्पिंग करण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय
* मराठी सिने-नाट्य अभिनेते मिलिंद शिंदे, दीपाली सय्यद यांना लागली म्हाडाच्या घराची लॉटरी
* मुंबईतील नागपाड्यातून १२ लाख ४४ हजाराचा गुटखा जप्त
* मोदी सरकार कामगार, शेतकरी, देश विरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप करत औरंगाबादेत कामगार कर्मचारी संघटनेची निदर्शने
* मुंबईत गोरेगाव भागात १२ एकर जागेवर‌ ०५ हजार घरे बांधण्याचा म्हाडाचा निर्णय
* सिंचनाची श्वेतपत्रिका, शिखर बँक चौकशीचे निर्णय राष्ट्रवादीला न आवडल्याने विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नाही- पृथ्वीराज चव्हाण नागपुरात
* पुण्यात रिक्षावाला दाम्पत्याने निवृत्त कर्नल महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने लुबाडले ७० लाखाला
* कानपूर मनपा समिती अध्यक्षपद निवडणूकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूनबाई दीपा कोविंद भाजपविरोधात अपक्ष उमेदवार
* न्यायाधीशांच्या नावे लाच घेतल्याच्या याचिका सुनावणीसाठी घटनापीठाची स्थापना करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
* सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश हेच सर्वोच्च अधिकारी- न्यायालयाचे स्पष्टीकरण
* जागतिक आरोग्य संघटनेनुसार दर हजारांमगे एक डॉक्टर आवश्यक पण प्रत्यक्षात देशात १३६ कोटींसाठी केवळ १० लाख २२ हजार ५८९ डॉक्टर
* देशभरातील विविध प्रवेश परीक्षांसाठी एकच राष्ट्रीय परीक्षा संस्थेची स्थापना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* प्रद्युम्न हत्या प्रकरणी पिंटो कुटुंबाच्या जामीन याचिकेवर सुनावणी १७ नोव्हेंबरला
* लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना घरगुती अन्नपदार्थ मिळणार, ई-केटरिंग व्यवसायात आता महिला बचत गटही होणार सहभागी
* ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचे प्रतिक ठरलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याची कुचेष्टा केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष प्रतिनिधीचा केंद्र सरकारने केला निषेध
* श्रीलंकेसोबत भारताचे तीन कसोटी सामने, आजपासून कोलकत्यात सराव सुरु होणार


Comments

Top