HOME  

राधे मांचं उष्टं चॉकलेट, विधानसभेत शाहरुख, गुजरातेत राष्ट्रवादी, ९९ टक्के नेते खोटारडे, हार्दीकचे १० कॉंग्रेसी उमेदवार, आज कोण लाभार्थी?.....१२ नोव्हेंबर २०१७


राधे मांचं उष्टं चॉकलेट, विधानसभेत शाहरुख, गुजरातेत राष्ट्रवादी, ९९ टक्के नेते खोटारडे, हार्दीकचे १० कॉंग्रेसी उमेदवार, आज कोण लाभार्थी?.....१२ नोव्हेंबर २०१७

* मला मृत्यूपूर्वी एकदा पाकिस्तानला भेट द्यायची आहे- ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर
* मोदींवर टीका करताना पंतप्रधानपदाचा मान ठेवला पाहिजे- राहूल गांधी
* लातूर शहरातील चालू सिग्नलसाठी मृत्यूंजय जप अन बंदला पुष्पांजली! ओंकार मित्र परिवाराने राबवला उपक्रम
* थंडी वाढू लागली, नाशिक-निफाडचा पारा पोचला १० अंशावर
* मलठण रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणा बंद पाडून पुण्याहून सोलापूरला येणारी हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा प्रयत्न
* माझ्या मागे गांधी आडनाव नसतं तर खासदार झालो नसतो- वरुण गांधी
* १५ नोव्हेंबरपासून शरद पवार यांचा चार दिवसांचा विदर्भाचा दौरा
* गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍याचा लवकरच पर्दाफाश करु, कर्नाटक गृह मंत्रालयाचा विश्वास
* २६/११ च्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या बंदोबस्तात वाढ
* दिल्लीत वडिलांच्या अंतयात्रेत मुलींचे नृत्य, वडिलांचीच इच्छा होती मृत्यूनंतर उत्सव करावा, शोक करु नये म्हणून!
* ‘पद्मावती’ चित्रप्ट: संजय लिला भन्साली यांच्या घरासमोर राजपूत संघटनेने केली निदर्शने
* नांदेड, बीड, जालना येथे शेतकर्‍यांच्या आत्महत्या
* साहित्यिक सूर्यनारायण रणसुभे यांचा आज दयानंद सभागृहात अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्कार
* गंजगोलाईत महिलेचे दोन तोळ्याचे सोने लुटणार्‍या दोघांना अटक
* निलंगा तालुक्यातील हाडगा येथे महावितरणने केले शेती पंप जप्त, १०० शेतकर्‍यांच्या वायरीही काढून नेल्या
* लातूर जिल्ह्यातील बोगस तुकड्यांप्रकरणी पाच पोलिस अधिकार्‍यांचे एसआयटी पथक नियुक्त
* चाकूर येथील पोलिस ठाण्याच्या आवारातच जीपने घेतला पेट
* कर्जमाफी: लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांची दुसरी यादी दोन दिवसात मिळणार
* महाराष्ट्रात चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात १८ पोलिसांवर गुन्हे
* राधे मांचा प्रताप भक्तांना प्रसाद म्हणून वाटले उष्टी चॉकलेट्स
* एसटीतली नोकर भरती आता प्रत्यक्ष मुलाखतींऐवजी लेखी परिक्षेतून, वशिलेबाजी चालणार नाही- परिवहनमंत्री दिवाकर रावते
* मूग आणि उडिदाची खरेदी तात्काळ सुरु करा, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांचे महाराष्ट्र सरकारला आदेश
* ‘मी लाभार्थी’ जाहिरात: आम्ही रोज नवा कोण लाभार्थी आला याची वाट पाहतो- शरद पवार
* आंध्र बॅंकेच्या ऑडीटरनेच घातला बॅंकेला कोट्यवधीचा गंडा, यादव निखारेला अटक
* गुजरात निवडणुकीत राष्ट्रवादीची कॉंग्रेसला साथ, सोबतीने १० जागा लढवणार
* बांगलादेशात फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे रंगपूर जिल्ह्यात हिंदुंची ३० घरे जाळली, पोलिसांकडून रबरी गोळ्यांचा मारा
* गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात तिसर्‍या क्रमांकावर
* ‘पद्मावती’ चित्रपटाची कथा काल्पनिक, जावेद अख्तर यांचा दावा
* राज्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवणार, मुखमंत्र्यांची घोषणा
* शिवसेना दोन वर्षे सत्तेतून बाहेर पडणार नाही, शरद पवार यांचा दावा
* ९९ टक्के राजकीय नेते खोटारडे, त्यांचा पर्दाफाश करु शकतो- रामदेवबाबा
* खराब रस्त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगावात अधिकार्‍याला अपघात, मृतदेह रस्त्यावर अनेक तास पडून
* शाहरुख खानचे प्रकरण आ. जयंत पाटील विधानसभा अधिवेशनातही मांडणार
* पुणे विद्यापीठ पुरस्कार प्रकरण: घटनेतील अधिकाराला बाधा न येता पुरस्कार द्यावेत- शिक्षण मंत्री विनोद तावडे
* गुजरात निवडणुकीमुळेच जीएसटीचे दर कमी झाले, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
* दाऊद इब्राहीमच्या मालमत्तेचा मंगळवारी लिलाव
* हार्दीक पटेलच्या दहा उमेदवारांना मिळणार कॉंग्रेसची उमेदवारी
* मुंबईतील बाद लोकल गाड्या आल्या पुणेकरांसाठी
* पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचाच भाग, तो कुणीही हिसकावून घेऊन शकत नाही- फारुख अब्दुल्ला
* आगामी काळात क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड ठरणार निरुपयोगी, लोक करतील मोबाईलवरुन व्यवहार- निती आयोग
* पाकिस्तानात परवेज मुशर्रफ यांनी केली २३ पक्षांची आघाडी
* उत्तरप्रदेश सरकारने बसेस, सरकारी इमारती रंगवल्या भगव्या रंगाने, जमेल तेवढे भगवीकरण
* अमेरिकेत अनिवासी भारतीय आकाश पटेल याची हत्या
* गोकुळ: गायीच्या दूध खरेदी दरात होणार कपात
* अनुराग कश्यपच्या आगामी हिंदी चित्रपटात, परश्या आकाश ठोसर
* कोल्हापूर किरणोत्सव: सूर्यकिरणे पोचली अंबाबाईच्या चेहर्‍यापर्यंत
* दिल्लीत तूर्त 'ऑड-इव्हन' चा निर्णय मागे; परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांची घोषणा
* कर्नाटक हायकोर्टात कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत मोबाइल फोनचा वापर करण्यास मनाई
* कुलभूषण जाधव यांची फाशी रद्द व्हावी आणि त्यांची सुटका होण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करणार- संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे
* हिंगोलीत बनावट नोटांप्रकरणी दोन पोलिसांना अटक
* मोदींनी टाटांच्या नॅनो प्रकल्पाला ३५ हजार कोटी रुपये मिळवून दिले, राहूल गांधी यांचा दावा
* अनिकेत कोथळे मृत्यूः सर्वपक्षीय कृती समितीकडून सोमवारी सांगली बंदची हाक, आणखी सात पोलिस निलंबित
* देशभरातील अंगणवाडी कर्मचारी करणार संसदेसमोर आंदोलन
* नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन
* अभिनेता अक्षय कुमारने अंधेरीत खरेदी केले ४ फ्लॅट. प्रत्येक फ्लॅटची किंमत ४.५ कोटी रुपये
* केंद्र सरकार केवळ पाच उद्योगपतींची मदत करते, शेतकऱ्यांची जमीन सरकारने दिली उद्योगपतींना दिली, राहुल गांधीं यांचा आरोप


Comments

Top