HOME  

सचिनला पुरस्कार, पंतप्रधानांना काळजी, नेतेच होते लाभार्थी, फेरीवाल्यांच्या पाठीशी शिवसेना, गांधींना लागल्या चार गोळ्या? नांगरे पाटलांचीही चौकशी.....१३ नोव्हेंबर २०१७


सचिनला पुरस्कार, पंतप्रधानांना काळजी, नेतेच होते लाभार्थी, फेरीवाल्यांच्या पाठीशी शिवसेना, गांधींना लागल्या चार गोळ्या? नांगरे पाटलांचीही चौकशी.....१३ नोव्हेंबर २०१७

* औरंगाबादेत २००० हून अधिकजणांना गॅस्ट्रोची लागण, सरकारी दवाखान्यात जागा नसल्याने अनेकांना झोपवले जमिनीवर
* इराणमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप १७० ठार, १६०० जखमी
* खाजगी संस्थांना विद्यापीठ शब्द लावण्यास मनाई
* ऊस दराबाबत सहकार मंत्र्यांसोबतची बैठक फिस्कटली, शेतकरी संघटना आक्रमक, सोलापुरात ऊस वाहणार्‍या ट्रॅक्टरचे टायर फोडले
* आधीचं सरकार हिंदूमंध्ये फूट पाडायचं आता आम्ही अल्पसंख्याकात फूट पाडतोय, भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं नाशिकात वक्तव्य
* उदगीरचा विद्यार्थी सुनील बिराजदार याच्या पार्थिवावर १५ दिवसांनी अमेरिकेतच झाले अंत्यसंस्कार
* नाना नानी पार्कमधील साहित्याची दुरावस्था, सकाळी फिरायला येणार्‍यांनी केली या साहित्याची महा आरती
* लातुरच्या कॉंग्रेस भवनात आज सामाजिक परिवर्तन मेळावा
* लातुरात कराराप्रमाणे कचर्‍याचे नियोजन करा, सुधार समितीची आयुक्तांकडे मागणी
* जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात अहमदपूर तालुका प्रथम, पाच लाखांचे बक्षीस
* सोयाबीनचा भाव आणि शेतकर्‍यांची वीज तोडणीच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांच्या खुर्चीचा लिलाव करणार- अभय साळुंके
* विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक; शिवा, वीरशैव संघटनांचा सहभाग, धनगर समाजाचा ‘आनंदोत्सव’
* केंद्राने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा द्यावा, या मागणीसाठी २८ जानेवारी रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी मोर्चा
* ऑनलाइन औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी ठोस पावलांची गरज, विविध मागण्यांसाठी मेडिकल संघटनेचा आज मुंबईत महामोर्चा
* सांगलीत पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदेंचीही चौकशी होईल- गृहराज्यमंत्री
* अनिकेत कोथळे याच्या मारेकर्‍यांना शिक्षा न झाल्यास अंपूर्ण कुटुंबाची आत्मदहनाचा इशारा
* अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणात वापरलेली पोलिसांची गाडी आणि पोलीस अधिकारी युवराज कामटेची बुलेट जप्त
* नाशिकात १० तर पुण्यात ११ परभणीत १२ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद
* औरंगाबादेत ६०० जणांना गॅस्ट्रोची लागण, दूषित पाण्याचा प्रताप
* आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेतेच लाभार्थी होते, लाभार्थी जाहिरातीवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
* आम्ही शेतकऱ्याचा फोटो छापला, तर विरोधकांच्या मनात तडफड का? तुमच्या काळातील लाभार्थी तुमचे कच्चे-बच्चे होते- मुख्यमंत्री
* लाभार्थी जाहिरातीची लाज वाटते, गुजरात निवडणुकीमुळेच जीएसटी कर कमी केला- उद्धव ठाकरे
* सरकारवर नाराज असल्याचे जाहीर सभेत बोलतो, कोपऱ्यात जाऊन का बोलेन? - उद्धव ठाकरे
* राज ठाकरे यांची १८ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे जाहीर सभा रस्त्यावर घेता येणार नाही- पोलिस
* मुंबईत पोट भरण्यासाठी प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार, फेरीवाल्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार- शिवसेना
* देशात इस्लामिक बॅंक स्थापन करणार नाही- आरबीआय
* मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या खात्म्यासाठी आठ कोटींची सुपारी, सईदची सुरक्षा वाढवली
* उत्तर भारतात धुक्यामुळे अनेक रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल
* केरळमध्ये के. आनंद या संघाच्या कार्यकर्त्याची हत्या
* अहमदनगरात अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई, ०५ मंदिरं हटवली
* आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे कृष्णा नदीत बोट बुडून १६ जणांना जलसमाधी, बोटीत होते ३६ जण, क्षमतेपेक्षा अधिक
* जायकवाडी धरणाच्या जलाशयात उमाकांत चौधरी हा बीडचा रहिवासी बुडाला
* औरंगाबादेत महावितरणच्या ऑनलाईन परीक्षेत हायटेक पद्धतीने कॉपी करणारे ०४ विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
* सॅन‌िटरी नॅपकिन्समध्ये अविघटनशील पदार्थ असल्याने त्यावर १८ टक्के जीएसटी
* संघाच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढतो आहे, यातूनच परिवर्तन होताना दिसते- सरसंघचालक
* मुंबई विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी युजीसी नियमांनुसारच कुलगुरू निवडा- विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. एडी सावंत
* नथुराम गोडसेने दोन गोळ्या चालविल्या, तर गांधीजींच्या शरीरातून चार गोळ्या कशा निघाल्या, शवविच्छेदन का झाले नाही?- सुब्रमण्यम स्वामी
* पतंजली समूह वर्धा जिल्ह्य़ातील हेटी गावाजवळ ८०० एकर जागेत १० हजार गायींचा सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार
* पिंपरी रेल्वे स्थानकात रेल्वेरूळ ओलांडताना कोयना एक्सप्रेसच्या धडकेत दोन चिमुरड्यांसह महिलेचा अंत
* यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल गावात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने महिला सरपंचानी केलं विष प्राशन
* भाईंदर रेल्वे स्थानकात मुलीला एकजण छेडताना पाहून दुसरी मदतीला सरसावली, पण पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका, व्हिडिओ झाला व्हायरल
* प्रद्युम्न हत्या प्रकरणी तपासात गुरुग्राम पोलिसांनी पुराव्यासोबत छेडछाड केली- सीबीआय
* पुणे येथे आशय सांस्कृतिकच्या पुलोत्सवात सचिन पिळगावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
* नाट्य संमेलन अध्यक्षपद निवडणूक पोस्टलऐवजी होणार प्रत्यक्ष, जिल्हानिहाय मतदान केंद्रांवर होणार निवडणूक- नाट्य परिषद
* नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने पंतप्रधानांना चिंता
* सरकारची धोरणे, निर्णय आणि योजना लोकांपर्यंत पोहोचण्याची मंत्र्यांवर टाकली जबाबदारी
* मध्य प्रदेशातील चित्रकूट विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नीलांशू चतुर्वेदी विजयी
* बँक ऑफ इंडिया एअर इंडियाला देणार दीड हजार कोटींचे कर्ज
* आंतरराष्ट्रीय बाजारात खनीज तेलाचे दर वाढायला लागल्यामुळे आगामी काळात किमत वाढीचा धोका


Comments

Top