HOME  

३८० विद्यार्थ्यांना नगरसेवक अजित पाटील कव्हेकरांनी दाखवलं साईनंदनवनम!


आज बालदिन. केवळ चाचा नेहरुंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यापलीकडे बहुतेकजण फारसं काही करीत नाहीत. लहान मुलांच्या चेहर्‍यावरचं हसू आणि आनंद फुलवण्याचा, खुलवण्याचा अनोखा उपक्रम नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी राबवला. प्रभागातल्या तब्बल ३८० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना चाकूरचे साईनंदनवनम दाखवले, सहल घडवून आणली. ३८० मुलांनी सहभोजनाचा आनंद तर घेतलाच, शिवाय या ठिकाणच्या बागेत मुलं मनमुराद बागडली. तलावात बोटींग केलं, तिथल्या रेल्वेचा आनंद घेतला, घसरगुंड्या आणि डॅशिंग कारची मजा लुटली. सकाळी साडेनऊ वाजता बसवेश्वर चौकातून पाच ट्रॅव्हल गाड्यातून निघालेली ही सहल संध्याकाळी साडेपाचला लातुरात पोचली. प्रभाग १८ मधील वेगवेगळ्या शाळातील या मुलांनी अजित पाटील कव्हेकरांचे मनापासून आभार मानले. खर्‍या अर्थाने बालदिन साजरा झाल्याचा आनंद अजित पाटील यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. विद्यार्थ्यांच्या दिमतीला रणजितसिंह पाटील, चंद्रशेखर पाटील, संतोष जाधव, शिक्षक-शिक्षिका आणि इतर सहकारीही होते. या निमित्ताने चाकूरच्या नागरिकांनी अजित पाटील कव्हेकर यांचा सत्कारही केला.


Comments

Top