HOME   महत्वाच्या घडामोडी

ड्रोनने वाघिणीचा शोध, दुष्काळाचा फैसला ३१ जुलैला, हार्दीक पटेल धनगर आंदोलनात, राहूल गांधींनी मराठी शिकावं, रेल्वे कर्मचार्‍यांना ४८ दिवसाचा बोनस.......११ ऑक्टोबर २०१८


ड्रोनने वाघिणीचा शोध, दुष्काळाचा फैसला ३१ जुलैला, हार्दीक पटेल धनगर आंदोलनात, राहूल गांधींनी मराठी शिकावं, रेल्वे कर्मचार्‍यांना ४८ दिवसाचा बोनस.......११ ऑक्टोबर २०१८

* लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, आ. अमित देशमुख यांची मागणी
* अमिताभ बच्चन यांचा ७६ वा वाढदिवस
* एसटी कर्मचार्‍यांचे पगार एवढे वाढलेत की कर्मचारी वेडे झाले आहेत- परिवहन मंत्री दिवाकर रावते
* यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीचा शोध घेण्यासाठी इटालियन श्वानांची घेणार मदत
* लातूर बाजार समितीत शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ
* लातूर शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुखपदी विष्णू साबदे यांची निवड
* लातुरात पावणेचार क्विंटल प्लास्टीक, थर्माकोल आणि कॅरीबॅग जप्त
* लातुरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील महिला कर्मचार्‍याचा विनयभंग, लिपिकावर गुन्हा
* लातुरच्या कचरा डेपोवर नवीन यंत्रंणा सुरु, रोज एक हजार टन कचर्‍याचे होणार विघटन
* दुष्काळाचा फैसला ३१ जुलैला, मुख्यमंत्री स्वत: पाहणी करणार
* दुष्काळाचा अंदाज घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एका जिल्ह्याचा दौरा करणार
* नाना पाटेकरांच्यासह चार जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
* आज पेट्रोल ०९ तर डिझेल ३० पैशांनी वाढले
* दोन हत्यांप्रकरणी रामपाल बाबांविरुध्द आज निकाल
* हार्दीक पटेल धनगर आंदोलनात सहभागी होणार
* ओडिशात वादळामुळं शाळा महाविद्यालये बंद, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
* राहूल गांधींनी आधी मराठी शिकून घ्यावं- नितीन गडकरी
* पॅराग्लायडर आणि ड्रोनच्या माध्यमातून यवतमाळच्या नरभक्षक वाघिणीचा शोध
* कॉलेजात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रे देण्याची गरजनाही, महाविद्यालयांना कोणत्याही विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे ठेवता येणार नाहीत- प्रकाश जावडेकर
* संपूर्ण कोर्सची फी एकदाच घेण्यास मनाई, एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरची फी घेता येणार
* विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत करणं महाविद्यालयांना बंधनकारक, तसे न केल्यास महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई
* १५ दिवस आधी कॉलेजचा प्रवेश रद्द केल्यास फी परत, ३० दिवसांत प्रवेश रद्द केल्यास ठरविक रक्कम परत मिळणार
* सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ ते १६ डिसेंबरमध्ये होणार पुण्यातील मकुंदनगरात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलावर
* २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांबाबत १९ ऑक्टोबरला निकाल
* अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा, आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
* व्हायोलिनवादक पद्मश्री डी. के. दातार यांचे वृद्धापकाळाने निधन
* महिलांचा छळ करणे ही एक 'विकृती', अशा व्यक्तींना धडा शिकवण्याचे काम महिलांनी, युवतींनी करावे- अजित पवार, नगरमध्ये
* सनातनच्या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करून पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा भाजपचा कुटील डाव - अशोक चव्हाण
* चौथीतल्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील शिक्षकाला जन्मठेप
* साठे महामंडळातील कोटय़वधींच्या घोटाळाप्रकरणी आमदार रमेश कदमांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मंत्रिपरिषदेची मान्यता
* राज्यात २० हजार गावांत भीषण स्थिती, दौऱ्यादरम्यान हारतुरे, सत्काराचा खर्च टाळा, रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरा- सुप्रिया सुळे
* औरंगाबाद येथील पाणी पुरवठा योजनेला पैसा कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री
* जळगावमध्ये भाजपची ताकद वाढली, येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही- गिरीश महाजन
* उसाला एकरकमी प्रति टनाला साडे तीन हजार पहिली उचल आणि साडेचार हजार भाव द्या- शेतकरी संघटना, कोल्हापुरच्या ऊस परिषेदत
* लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक रमेश पतंगे राफेल
* अभिनेत्री प्रीती झिंटाने उद्योगपती नेस वाडियाविरोधात दाखल केलेला छेडछाडीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने केला रद्द
* रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस
* राफ़ेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती कोर्टासमोर सादर करा- सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश, पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी
* ज्योतिषाचं ऐकून कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सरकारी कार्यक्रम केले रद्द
* बंगालच्या उपसागरात ‘तितली’ चक्रीवादळ, ओदिशा आणि आंध्र प्रदेशात तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
* गोव्यात अभिनेता प्रतीक बब्बर बब्बरच्या कारची दुचाकीला धकड, गुन्हा दाखल
* फेसबुकपाठोपाठ व्हॉट्सअॅपवरही हॅकिंगची टांगती तलवार, व्हिडिओ कॉल येताच यूजर्सना सावध राहण्याचा इशारा
* बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांचा मुलगा तारिकला २००४ च्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी जन्मठेप


Comments

Top