HOME   महत्वाच्या घडामोडी

२०० तालुके दुष्काळी, शिवस्मारक २४ पासून, खोतकरांना घेराव, वो नीच आदमी है, साजिद खानला नोटीस, गुजराती माणसं हुशार........१६ ऑक्टोबर २०१८


२०० तालुके दुष्काळी, शिवस्मारक २४ पासून, खोतकरांना घेराव, वो नीच आदमी है, साजिद खानला नोटीस, गुजराती माणसं हुशार........१६ ऑक्टोबर २०१८

* आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले
* भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय
* दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक
* गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा
* शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात
* नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार
* लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला
* महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया
* उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव
* वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य
* गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे
* साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार
* पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन
* परतीच्या पावसाची दडी, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दोनशेहून अधिक तालुक्यात दुष्काळ
* राजकीय पक्षांकडून होर्डिंग व फलकबाजी करून कायद्याचा भंग, कारवाईबाबत निवडणूक आयोग हतबल का?- उच्च न्यायालय
* राज्यातील औषध वितरणाच्या पद्धतीत दोष, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याची गिरीश बापट यांची कबुली
* परळीत अठरा-अठरा तास वीजपुरवठा खंडित, धनंजय मुंडे यांनी काढला कंदिल मोर्चा
* निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्र्यांचे जिल्हावार बैठकांचे सत्र, जलयुक्त शिवार, शेततळे, पिण्याचे पाणी, कचरा विल्हेवाट यांचा आढावा
* घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचवा- उद्धव ठाकरे
* नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या गिरीश महाजन यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने दाखवले काळे झेंडे
* जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून सहा ते सात टीएमसी पाणी सोडण्याचा पाटबंधारे महामंडळाचा निर्णय
* औरंगाबादमध्ये फ्लिपकार्टद्वारे व्यापाऱ्याने मागविलेल्या मोबाईलच्या पार्सलमध्ये विटेचा तुकडा, ई कार्ट कुरियरविरुद्ध गुन्हा दाखल
* दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत वाढ, किंमतीत प्रतितोळा २०० रुपयांची वाढ
* मुंबईत नोंदवले गेले राज्यात सर्वाधिक तापमान
* मुंबईत मालाड भागात मानसी दीक्षित मॉडेलचा मृतदेह सापडला बॅगेत, मित्राने खून केल्याचे पोलिस तपासात उघड
* सर्वांसाठी घरे योजनेतून म्हाडा दोन वर्षांत बांधणार सहा लाख घरे, राज्यात म्हाडाच्या भुखंडावर होणार घरबांधणी
* पंढरपूर विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार प्रकरणात सदस्य सचिन आधटरावला विधी व न्याय विभागाने केले निलंबीत
* अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षाची निवड पाच नामवंत साहित्यिकांच्या समितीने करावी- संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
* डेक्कन क्वीन आणि पंचवटी एक्स्प्रेसमधील फिरते ग्रंथालयाचे उद्घाटन केले विनोद तावडे यांनी
* वादग्रस्त पुस्तकांच्या चौकशीसाठी सरकारने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांच्या नियुक्तीस संभाजी ब्रिगेडचा विरोध
* वादग्रस्त लिखाण करणार्‍या लेखकांवर गुन्हा दाखल करा, महापुरुषांच्या बदनामीप्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा- संभाजी ब्रिगेड
* एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई विमानातील एअर होस्टेस विमानात चढताना पडून जखमी
* भुकेची समस्या प्रामुख्याने असणाऱ्या ११९ देशांच्या यादीत भारत १०३ व्या स्थानावर- ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवाल
* वाढत्या इंधन किंमती जागतिक विकासाला बाधक ठरत असल्याने तेल उत्पादक देशांनी किंमती माफक कराव्यात- नरेंद्र मोदी


Comments

Top