HOME   महत्वाच्या घडामोडी

अपूर्वा खून प्रकरणी चौघांना अटक, दोन पोलिस पथके कार्यरत, आज होईल चित्र स्पष्ट.........१७ ऑक्टोबर १८


अपूर्वा खून प्रकरणी चौघांना अटक, दोन पोलिस पथके कार्यरत, आज होईल चित्र स्पष्ट.........१७ ऑक्टोबर १८

* लातुरातील अपूर्वा यादव खून प्रकरणी दोन तपास पथके रवाना, चार संशयितांना अटक
* प्रकरण गुंतागुंतीचे, अपूर्वाने एका तरुणाला आत्महत्येस केल्याचा आरोप
* उजनीच्या पाण्यासाठी फेर प्रस्ताव पाठवा, लातूर भेटीत राज्यपालांची सूचना
* मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात
* अटल आरोग्य शिबिरात ३५०० डॉक्टरांची जेवणाची सोय करणार्‍या लातूर व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
* शिवसेनेचे अभय साळुंके यांनी उजनीचे पाणी आणून सिध्देश्वराला केला अभिषेक
* आजपासून राज ठाकरे दहा दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर
* शबरीमाला मंदिरात महिलांसह सर्वांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
* महिलांना प्रवेश दिला तर आत्महत्या करु, अनेक भक्तांची धमकी
* संघाच्या नागपूर दसरा पूजेला विरोध नाही, मात्र संघाच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याला विरोध- प्रकाश आंबेडकर
* संघवाल्यांना बेकायदा शस्त्र प्रदर्शन करण्यापासून रोखले नाही तर न्यायालयात दाद मागू- आंबेडकर यांचा इशारा
* महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज- राज्यपाल सी. विद्यासागर राव
* लातुरात राजर्षी शाहू महाविद्यालयातील ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील चर्चासत्राचे राज्यपालांनी केले उद्घाटन
* लातूर येथे विशाल नगर भागात अनंत यादव यांच्या मुलीची हत्या, दोन मोबाईल घेऊन मारेकरी पसार
* ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणात महिलांना संधी दिलेले उद्योग नफ्यात चालतात- राज्यपाल
* राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्याअभावी धोक्यात, वेळीच पाणी मिळाले नाही तर खरीपही धोक्यात- नैसर्गिक आपत्ती कक्ष
* हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकटय़ा सोलापूर जिल्ह्यात १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस धोक्यात
* पिके वाचविण्यासाठी, पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी अर्धवट स्थितीतील एक हजार योजना तातडीने पूर्ण करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
* राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस, सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पाऊस सातार्‍यात
* औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्य़ांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस, १७२ तालुक्यात दुष्काळ
* राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून ०१ लाख सौर कृषी पंपाची योजना ०३ वर्षात राबविणार, पहिल्या टप्प्यात २५ हजार पंप बसविणार
* पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी अमित शाह यांचा मुंबई दौरा, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असल्याने शाह यांच्या दौऱ्याला महत्त्व
* रद्दीच्या मोबदल्यात नव्या कोऱ्यावह्या योजना राज्यातील सर्व शाळात राबविली जाणार
* सोलापूर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक दिसणार सुटा-बुटात
* नरेंद्र मोदी यांच्या १९ ऑक्टोबरच्या सभेसाठी ४० हजार जणांना शिर्डीत आणण्याचे नियोजन, दोन कोटी खर्च अपेक्षित
* भारतात २२ अब्ज अमेरिकी डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याचा इन्व्हेस्टमेंट ट्रेण्ड्स मॉनिटरचा अहवाल
* २००७ पासून काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी जागतिक निविदा काढण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
* पुणे येथे हॉटेल डार्क हाऊसवर छापा, हुक्का ओढणाऱ्या १२ मुले आणि ०८ मुलींवर गुन्हा दाखल
* गोंदिया जिल्ह्यात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याचा दावा करणारे दोन आयुर्वेदिक डॉक्टर गजाआड, पोलिसांविरोधात रास्तारोको
* नाशिक-अहमदाबाद विमानसेवा तांत्रिक कारणास्तव ०२ डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली
* नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झाली ८१
* आगामी निवडणुकीत प्रचारात उतरलो तर पक्षाला तोटा सहन करावा लागेल- काँग्रेसचे दिग्विजय सिंग
* ऑक्टोबर ते डिसेंबरच्या जीपीएफवर ०८ टक्के व्याज देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
* भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश
* गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर
* कर्नाटकात कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणार्‍या बँक मॅनेजरला महिलेने झोडपले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
* दिल्लीत हयात फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बसपाचे माजी खासदार राकेश पांडेंचा पुत्र आशीष पांडेची गुंडगिरी, गुन्हा दाखल, आशीष पसार
* हरयाणातील सतलोक आश्रमातील हत्यांप्रकरणी बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेप
* बिहारमध्ये कन्हैया कुमारच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला, अनेक गाड्यांची तोडफोड
* सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिल्यास आत्महत्या करणार- शिवसेनेचे ७ जणांचे पथक


Comments

Top