HOME   महत्वाच्या घडामोडी

स्वंयसेवकांचे देखणे संचालन, गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिलेला कन्यारत्न, सेनेचा मेळावा दादरमध्ये, पंकजा मुंडे यांचा मेळावा सावरगावात, राज म्हणतात नाना पाटेकर चांगला.......१८ ऑटोबर २०१८


स्वंयसेवकांचे देखणे संचालन, गर्भाशय प्रत्यारोपण केलेल्या महिलेला कन्यारत्न, सेनेचा मेळावा दादरमध्ये, पंकजा मुंडे यांचा मेळावा सावरगावात, राज म्हणतात नाना पाटेकर चांगला.......१८ ऑटोबर २०१८

* आज लातुरच्या संघाने केले दीपज्योतीनगर भागात शिस्तबद्ध संचलन
* शिवसेनेचा दसरा मेळावा दादरमध्ये, उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
* आज धम्मचक्र प्रवर्तन दिन, दीक्षाभूमीवर भीमसैनिकांची गर्दी
* शिर्डीत साईबाबांचा १०० वा समाधीदिन सोहळा, मंदीर रात्रभर खुले राहणार
* भगवानबाबांच्या सावरगावात पंकजा मुंडे यांचा मेळावा
* सावरगावात भगवानबाबांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण
* नागपुरात संघाचा दसरा मेळावा-संचलन सुरु, मोहन भागवतांच्या भाषणाकडे लक्ष
* पुण्यात गर्भाशय प्रत्यारोपणानंतर देशातील पहिल्या बाळाचा जन्म, गॅलेक्सी केअर रुग्णालयातील डॉ. शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमचे प्रयत्न
* पेट्रोल २१ पैशांनी तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त
* सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाही
* नाना कसाही असला तरी महिलांसोबत गैरवर्तन करणार नाही- राज ठाकरे
* दिवाळीपर्यंत राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार
* राज्यात १९ लाख परवडणाऱ्या घरांची वेगाने निर्मिती होण्यासाठी गृहनिर्माण महामंडळ स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
* दिवाळीपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात माहिती
* शिवसेनेच्या दादरमधील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार की युतीबाबत सकारात्मक राहणार याबाबत बोलण्याची शक्यता
* संभाव्य दुष्काळ परिस्थिती हाताळताना प्रशासनावर ताण पडू नये यासाठी विधिमंडळ समितींच्या दौऱ्यांना बंदी
* साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डीत सांगता
* ‘पंतप्रधान आवास योजने’तील घरांचे वाटपही होणार, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा ०३ कोटींचा खर्च साईबाबा संस्थान
* स्वतंत्र विदर्भ राज्य, आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याची मागणी रालोआच्या पुढच्या बैठकीत करणार- रामदास आठवले
* विदर्भ राज्य करणे यंदा शक्य नाही, परंतु २०१९ मध्ये पुन्हा निवडून आल्यावर ही मागणी पूर्ण करणार- रामदास आठवले
* लैंगिक शोषण तक्रार निवारण समितीत काम करण्याची रवीना टंडन, रेणुका शहाणे, अमोल गुप्ते, भारती दुबे यांची तयारी
* उच्च न्यायालय अवमानप्रकरणी पुण्याच्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. मारुती नवले यांना अटक
* पावसाळ्यात बंद असणारी नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन सेवा शुक्रपासून होणार पुन्हा सुरू
* दसरा मेळावा खूप जुनी परंपरा, हा मेळावा शक्तीप्रदर्शन नव्हे- पंकजा मुंडे
* श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याचा क्विंटलला ३६०० भाव
* अमरावती येथील आयोजित प्रकट मुलाखतीत राज ठाकरे:
* ‘गुजरात मॉडेल’ने प्रभावित झालो होतो पण नरेंद्र मोंदींना विकास पुरूष म्हटले नव्हते पण आता ते भकास पुरूष
* निवडणुकीआधी दिसलेले नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यात जमीन अस्मामनचा फरक
* सेनेला अजून त्यांची भूमिकाच समजलेली नाही, सत्तेतून बाहेर पडण्याचे त्यांचे इशारे हास्यास्पद ठरू लागले आहेत
* पत्रकारिता मेलेली नाही, पण अनेक माध्यमांचे मालक विकले गेलेले आहेत
* इंदिरा गांधींच्या आणिबाणीला विरोध करणारेच आता अघोषित आणिबाणी लादत आहेत
* औरंगाबाद येथे स्कोडा ऑटोमध्ये सोलर पॅनल प्रकल्पाला सुरुवात, झेक प्रजासत्ताकचे राजदूत मीलान व्होव्होरका यांच्या हस्ते झालं लोकार्पण
* अमित शहांच्या रणनीतीमुळे गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फ़ुटले, आणखी तीन आमदार भाजपच्या वाटेवर
* राजस्थानचे आमदार मानवेंद्र सिंग आणि महाराष्ट्राचे भाजपा आमदार आशीष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
* पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटींची फ़सवणूक करणारे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची २१८ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
* रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला चालू वित्तीय वर्षातील दुसऱ्या तिमाहीत ०९ हजार ५१६ कोटींचा नफा


Comments

Top