• 18 of December 2017, at 4.48 am
  • Contact
  • booked.net
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

छकुलीला न्याय मिळाला- पिडीतेची आई, न्यायालयाभोवती गर्दी

कोपर्डी प्रकरणात तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

अहमदनगर: कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही गुन्हेगार जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे यांना आज अहमदनगर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र या तिन्ही आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे. आज शिक्षा सुनावली जाणार असल्याने न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. तसाच बंदोबस्तही लावण्यात आला होता. पिडीतेची आई, बहीण आणि मैत्रिणी न्याय कक्षात पहिल्या रांगेत बसले होते. छकुलीला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया पिडितेच्या आईने दिली. त्यांनी मराठी समाज, उज्वल निकम, मुख्यमंत्री आणि सबंध महाराष्ट्राचे आभार मानले. न्यायालयाबाहेर उपस्थित असलेले लोक आणि माध्यमांना चुकवून तिन्ही दोषींना न्यायालयात हजर करण्यात आले. राज्य राखीव दल, बॉंबशोधक पथकही पोलिसांच्या दिमतीला हजर होते. प्रत्येकाची तपासणी करुनच प्रवेश देण्यात आला. तबल तेरा महिन्यांनी कोपर्डीचा निकाल लागला. कोपर्डी प्रकरणात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सगळे परिस्थितीजन्य पुरावे कामी आले.

Comments

Top