• 20 of March 2018, at 1.06 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

मतपत्रिकांवर निवडणुका घ्या भाजपा होईल पराभूत- मायावती

‘भाजपाकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर, अन्यथा आम्हाला अधिक जागा मिळाल्या असत्या’

मतपत्रिकांवर निवडणुका घ्या भाजपा होईल पराभूत- मायावती

नवी दिल्ली: २०१९ च्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे बाजुला करा, मतपत्रिका वापरा भाजपाचा नक्कीच पराभव होईल असा विश्वास बसपा नेत्या मायावती यांनी व्यक्त केला आहे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील १६ महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपाने १४ ठिकाणी तर बसपाने ०२ जागा जिंकल्या होत्या. या देशानं आपल्या पक्षावर विश्वास ठेवला आहे, सबंध देश आपल्या पाठीशी आहे असा दावा भाजपाकडून केला जातो मात्र मतपत्रिका वापरल्यास हा पक्ष जिंकू शकणार नाही याची मला खात्री आहे असं सांगून मायावती म्हणाल्या महापालिका निवडणुकीत बसपाने आपल्या चिन्हावर लढा दिला. दलित, इतर मागासवर्गीय आणि मुस्लिमांनी बसपाला चांगला प्रतिसाद दिला. महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला नसता तर बसपाने अनेक जागा जिंकल्या असत्या. आगामी काळात कुणासोबत आघाडी करणार असा प्रश्न विचारला असता बसपाला दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि उच्चवर्णीयांमध्ये बंधूभाव हवा आहे. हीच खरी आघाडी आहे!
दरम्यान अखिलेश यादव यांनीही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत शंका व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशात ज्या मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली त्याच भागात भाजपा निश्चिंत होती असा दावा त्यांनी केला आहे.


Comments

Top