logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   महत्वाच्या घडामोडी

अपडेटेड...१२० जोडप्यांचे मनोमिलन, कलर ब्लाईंडनेस कार्यशाळा, खा. सातवांना मारहाण, हाफीज सईद निवडणुकीत, शाहीद म्हणतो पद्मावती बघा......०३ डिसेंबर २०१७

अपडेटेड...१२० जोडप्यांचे मनोमिलन, कलर ब्लाईंडनेस कार्यशाळा, खा. सातवांना मारहाण, हाफीज सईद निवडणुकीत, शाहीद म्हणतो पद्मावती बघा......०३ डिसेंबर २०१७

* लातूर पोलिसांनी दुभंगलेले १२० संसार जोडले, सर्वांचा केला सत्कार
* लातूर जिल्ह्यात कलर ब्लाईंडनेसवर चार डिसेंबरपासून सात ठिकाणी रोटरीतर्फे कार्यशाळा
* गुजरातेत हार्दीक पटेलचा जंगी रोड शो, मोदींच्या तीन सभा
* खा. राजीव सातव यांना गुजरातेत पोलिसांकडून मारहाण, पोस्टरवरुन झाला होता वाद
* कळमनुरीत कॉंग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांनी केली तोडफोड
* शेतकर्‍यांच्या प्रश्नी भाजपा नेते यशवंत सिन्हा उतरणार रस्त्यावर
* यवतमाळहून निघाली राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा, खा. सुप्रिया सुळे झाल्या सहभागी
* गुजरातेत निवडून आल्यास शिवसेनाही देणार शेतकर्‍यांना कर्जमाफी
* कसोटी सामन्यात विराट कोहली लगावले सहावे द्वीशतक
* २६/११ च्या हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद लढवणार पाकिस्तानात निवडणूक
* लातुरच्या जिल्हा परिषदेनं केला प्रा. श्रीराम गुंदेकरांचा विशेष गौरव
* मतदान यंत्राऐवजी मतपत्रिका वापरल्यास २०१९ च्या निवडणुकीत होईल भाजपा पराभूत- मायावती
* इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अखिलेश यादव यांनीही घेतला आक्षेप
* पद्मावती बघा अन मग बोला, अभिनेता शाहिद कपूरचा सल्ला
* मनसेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, भाजप-मनसे समझोता- संजय निरुपम
* दहावी, बारावीच्या परिक्षेबाबत घातलेल्या नवीन नियमांवर टिकेची झोड
* विजयसिंह मोहिते पाटील आणि दिलीप सोपलांचे साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय
* सांगलीत जाळला संजय लिला भन्साळी यांचा पुतळा, मोर्चाही काढला
* प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता- सारंगी महाजन यांचा दावा
* पूनम महाजन यांचे गुंड जिवे मारण्याची धमकी देतात- सारंगी महाजन
* दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची वाहतूक न करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय
* स्मार्टफोनच्या सततच्या वापरामुळं मेंदुचा कॅन्सर होऊ शकतो- आयआयटी तज्ञ
* राज्यात ३० टक्के नोकर कपात, सातव्या वेतन आयोगामुळे निर्माण होणारा बोजा कमी करण्याचा प्रयत्न
* अपेक्षित पटसंख्या नसल्याने राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय
* दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ०५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करणार- शिक्षणमंत्री विनोद तावडे
* मुंबईपासून एक हजार किलोमीटरवर चक्रीवादळ, मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
* राज्यातील ३५० हून अधिक धर्मादाय रुग्णालये आज रस्त्यावरील हजारो गरीब रुग्णांना देणार आरोग्य कवच
* मुंबई काँग्रेस कार्यालयाची तोडफोड: मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंसह सात कार्यकर्त्यांना सोमवारपर्यंत कोठडी
* येत्या सहा महिन्यांत राज्यात टप्प्याटप्याने पूर्णपणे प्लास्टिकबंदी करण्यात- मुख्यमंत्री
* ओखी चक्रीवादळ आले अरबी समुद्रात ०६ डिसेंबरपर्यंत वादळाची तीव्रता होणार कमी, ०४ आणि ५ डिसेंबरला सतर्कतेचा इशारा
* पुढील दोन दिवस पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण, दक्षिण कोकण- गोव्यात तुरळक ठिकाणी पडणार पाऊस
* गोपीनाथ मुंडेंच्या जागेवर केंद्रात मंत्रिपदाची ऑफर होती- पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
* जेनेरिक औषधे लिहून देण्याच्या नियम रद्द करण्याची राज्यातील डॉक्टरांची मेडिकल कौन्सिलकडे मागणी
* राजकीय फायद्यासाठी मुख्यमंत्री कोणत्याही थराला जातात, मनसेच्या हल्ल्यातून दिसते- काँग्रेस व राष्ट्रवादी
* किरकोळ बाबतीतही ‘टीवटीव’ करणारे मुख्यमंत्री मुंबई काँग्रेस कार्यालयावर मनसेच्या गुंडांनी हल्ला करूनही गप्प का?- काँग्रेस
* जागतिक सुंदरी मानुषी छिल्लरने महापालिकेतील विद्यार्थिनींशी साधला संवाद
* देशाच्या विकासात भाजपचे कोणतेही योगदान नाही, हाफ पँटवरून फुल पँटवर आले, हेच काय त्यांचे कर्तृत्त्व- अशोक चव्हाण
* रोजगार, अच्छे दिन, कर्जमाफीसारख्या भूलथापा देणाऱ्या या सरकारला कायमस्वरुपी डिसकनेक्ट करण्याची गरज- अशोक चव्हाण
* रूपवेध प्रतिष्ठानचा यंदाचा 'तन्वीर सन्मान' ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर
* सामाजिक स्वास्थ्य बिघडवून मतांसाठी डावपेच खेळले, सर्वच पक्षांनी जातीय दंगे घडविले- विचारवंत इरफान इंजिनीअर
* पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्यातील पिंपरी ते रेंजहिल्सचे काम युद्ध पातळीवर सुरू
* पुणे जिल्ह्यातील चाकणमधील महा ई-सेवा केंद्रावर पैसे घेऊन बनावट अधारकार्ड काढून देणारे चौघे गजाआड
* अंधांना दोन नोटांमधील फरक कळेल अशा पद्धतीने नवीन नोटा कराव्यात दिल्ली उच्च न्यायालयाच्या सूचना
* अंध व्यक्तींना नव्याने चलनात आणलेल्या नोटा व नाणी वापरण्यात अडचणी येत असल्याची याचिका दाखल
* १०, ५, २, आणि ०१ रुपयांची रचना सारखीच असल्याने फरक ओळखता येत नसल्यामुळे त्यातही बदल करा, पुढील सुनावणी ०६ डिसेंबरला
* मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांची टोलनाक्यांवरील कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका निर्माण करण्याचा निर्णय
* सलिल पारेख इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त, ०२ जानेवारीला स्वीकारणार पदभार
* गुन्हेगारी प्रकरणांतील दोषी व्यक्तींना राजकीय पक्षाचे प्रमुख होण्यापासून रोखावे, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
* सरकार किंवा संसदेने निर्णय घ्यावा, कुणालाही राजकीय विचार मांडण्यापासून न्यायालय रोखू शकतो का?- सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
* भाजपचा 'सबका साथ,सबका विकास'चा नारा खोटा- एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी
* जीएसटी जर ‘गब्बर सिंग टॅक्स’ तर काँग्रेसने संसदेत जीएसटी विधेयकाला पाठींबा कसा दिला?- राजनाथ सिंह, गुजरातमध्ये
* नोटाबंदी दिवस देशाची अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस हे खेदाने आणि पूर्ण जबाबदारीने सांगतो- मनमोहन सिंग
* नरेंद्र मोदींशी मला कुठलीही स्पर्धा करायची नाही- मनमोहन सिंग
* भारत श्रीलंका कसोटी सामन्यात विराटच्या कारकीर्दीतील ०५ हजार धावा पूर्ण, ०५ हजार धावा करणारा विराट भारताचा ११ वा खेळाडू
* भारतासाठी कमी वजनाच्या २०० कामोव ६० हेलिकॉप्टर्सची निर्मिती रशिया चार टप्प्यांत करणार, शिवाय दीडशे हेलिकॉप्टर्स भारतात होणार तयार


Comments

Top