logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   काल, आज आणि उद्या

अष्टविनायक शाळेला कुलूप, पालकांनी तोडले, विद्यार्थी उघड्यावर, राहूल गांधींचा अर्ज दाखल, कमी पटसंख्या शाळा बंद, भाजपचे ट्वीटर हॅक? कॅशलेस अंबानी, टेक्स्ट मेसेजची पंचविशी......०४ डिसेंबर २०१७

अष्टविनायक शाळेला कुलूप, पालकांनी तोडले, विद्यार्थी उघड्यावर, राहूल गांधींचा अर्ज दाखल, कमी पटसंख्या शाळा बंद, भाजपचे ट्वीटर हॅक? कॅशलेस अंबानी, टेक्स्ट मेसेजची पंचविशी......०४ डिसेंबर २०१७

* राष्ट्रवादीचे नेते एनबी शेख यांचे मुंबई येथे निधन, उद्या औसा येथे अंत्यविधी
* राहूल गांधी भरला पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज
* लातुरच्या अष्टविनायक शाळेला लातूर मनपाने ठोकले कुलूप
* अष्टविनायक शाळेचे कुलूप-सील पालकांनी तोडले, पोलिसांनाही बोलावून घेतले
* अष्टविनायकचे विद्यार्थी बसले मैदानात, कार्यवाही होईपर्यंत वर्गात न जाण्याचा निर्णय
* ओखी वादळ ४८ तासांत गुजरात, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर
* ज्येष्ठांनी सवलत सोडल्याने रेल्वेला ४० कोटींचा फायदा
* भोपाळ वायूपीडित वाढीव भरपाईसाठी पुन्हा याचिका दाखल करणार
* राहूल गांधी आज कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार
* राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या अर्जावर सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्र काँग्रेसच्या ३० नेत्यांचे अनुमोदन
* काँग्रेसमध्ये घराणेशाहीच्या जोरावरच राष्ट्रीय अध्यक्षपद मिळते, ‘मी शहजाद आहे शहजादा नाही’- काँग्रेस नेते शहजाद पूनावाला
* कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
* हिम्मत असेल तर मनसेने भायखळ्यात तोडफोड करुन दाखवावी- वारिस पठाण एमआयएम
* पुढची दिवाळी राम मंदिरात साजरी करु- सुब्रमण्यम स्वामी
* रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला ओखी वादळाचा तडाखा, अनेक गावात पाणी
* आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०१८ ची मुदत
* खा. राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद, हिंगोलीत पाच सात बसेसवर दगडफेक
* शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळेपर्यंत अकोला सोडणार नाही- यशवंत सिन्हा
* लिंगायत समाजाने काढला सांगलीत महामोर्चा, धर्माची मान्यता देण्याची मागणी
* कोपर्डी गुन्हेगारांना येरवड्याला पाठवा, निनावी फोन करणार्‍याला अटक
* बीड-परळी मार्गावार बीएसएफच्या गाडीला अपघात, नऊ जखमी
* रजनीकांतच्या २.० चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर
* विधान परिषद जागेसाठी गुरुवारी पोटनिवडणूक, प्रसाद लाड यांना २०० पेक्षा जास्त मते मिळण्याचा दावा
* कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शासन, प्रशासनस्तरावर तीन वर्षांपासून सुरू
* अपंग प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक ७० हजाराची मदत मिळणारी योजना राबवणार
* मुंबई व पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात, गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प
* नगर: नितीन आगेच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवा, आज आझाद मैदानात आंदोलन, पालकही होणार सहभागी
* ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी उपकरणांची खरेदी, खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा प्रस्ताव
* भाजपचे अधिकृत ट्वीटर हँडल हॅक झाल्याचे भाजपाचा खुलासा, चौकशीची मागणी
* महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी आणि शिवाजीपार्क परिसरात लाउडस्पीकर्स आणि डीजेचा गोंगाट बंद करा- आंबेडकरी संघटनांची मागणी
* सीडी विक्रेते तसेच डीजेंवर कठोर कारवाई न झाल्यास आंबेडकरी जनता स्वयंस्फू्र्तीने गोंगाट बंद पाडेल- संघटनांचा इशारा
* सोबत कधीही पैसे बाळगत नाही, तसेच आयुष्यात कधी कार्डचा देखील वापर केलेला नाही- मुकेश अंबानी
* मुंबईतील स्वच्छतादूत अफरोज शहा यांच्या वर्सोवा बीचवरील स्वच्छता अभियानात देवेंद्र फडणवीस झाले सहभागी
* कपड्यांच्या वर जानवे घालणारे राहुल गांधी हे एकमेव ब्राह्मण- मीनाक्षी लेखी
* राष्ट्रवादाविरुद्ध वक्तव्य करणार्‍या गांधीनगरचे आर्चबिशप थॉमस यांच्यावर नरेंद्र मोदींची अहमदाबादच्या सभेत टिका
* परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणण्यात मदत केली तो ‘राष्ट्रवाद’च होता- पंतप्रधान
* देशाला राष्ट्रवादी शक्तींपासून वाचवा असे आवाहन आर्चबिशप थॉमस यांनी ख्रिश्चन समुदायाला केले होते
* फसवणुकीच्या प्रकरणात महिलेला न्याय देण्यास उशीर झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मागितली महिलेची माफी
* अभिनेत्री कंगना राणावतचा 'पद्मावती'ला पाठिंबा देण्यास नकार
* केरळमध्ये १९ मच्छीमारांना वाचवले भारतीय नौदलाने
* काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवार जिंकणार- पंतप्रधान
* जगातल्या पहिल्या टेक्स्ट मेसेजने साजरी केली पंचविशी, ०३ डिसेंबर १९९२ रोजी ‘मेरी ख्रिसमस’ हा पहिला टेक्स्ट मेसेज संगणकाद्वारे होता पाठवला
* सुरतमध्ये रॅली न करण्यासाठी ०५ कोटींची ऑफर दिली होती- हार्दिक पटेल
* लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणसंबंधी आजपासून लंडन कोर्टात सुनावणी, सीबीआयची टीम राहणार उपस्थित
* जीएसटीनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प, एक फेब्रुवारीला सादर होणार


Comments

Top