• 20 of March 2018, at 12.58 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   महत्वाच्या घडामोडी

राहूल औरंगजेब, आधार केंद्रे बॅंकात, सिन्हांचे उपोषण, भुंकणारे कुत्रे, माल्या म्हणतो मी निर्दोष, मुशर्रफ-सईद युती......०५ डिसेंबर २०१७

राहूल औरंगजेब, आधार केंद्रे बॅंकात, सिन्हांचे उपोषण, भुंकणारे कुत्रे, माल्या म्हणतो मी निर्दोष, मुशर्रफ-सईद युती......०५ डिसेंबर २०१७

* ओखी चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणातही शाळांना आज सुटी
* मुंबई, ठाणे, गोव्यात पहाटेपासूनच हलका पाऊस सुरु
* ओखी चक्रीवादळामुळे ताशी पन्नास ते सत्तर किलोमीटर वेगाने वाहणार वारे
* नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज, मराठवाडा, विदर्भ व प. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस
* भाजप नेते यशवंत सिन्हा रात्रभर पोलिस ठाण्यासमोर आज कोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण
* लोणावळ्यात कामशेत बोगद्यात १० गाड्या एकमेकांवर आपटल्या
* मेट्रो प्रवासी भाडेवाढीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने केला रद्द, समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारला निर्देश
* गुजरातेत भाजपला ९५ तर कॉंग्रेसला ८२ जागा मिळण्याची शक्यता
* आजच राहूल गांधी यांची कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता, आज अर्जांची छाननी
* राहूल गांधींची कॉंग्रेसमधली राजवट औरंगजेबाची- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* राहुल गांधींनी अर्ज दाखल केल्यावर मनमोहन सिंग राहुलना म्हणाले 'डार्लिंग' तर नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले 'बब्बर शेर'
* वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या दुचाकीस्वारांना आवरा, उच्च न्यायालयाचे आदेश
* नितीन आगे हत्या प्रकरणी सरकार जाणार न्यायालयात, फितूर साक्षीदारांवर होणार कारवाई
* नितीन आगे प्रकरणाची पुन्हा चौकशी करा, सुधारित अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सुनावणी व्हावी- भालचंद्र मुणगेकर
* उत्तरेकडून जोरदार थंड वारे राज्यात पारा घसरण्याची शक्यता
* मनसेच्या संदीप देशपांडेंसह आठ कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी १८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
* डीएसकेंना ५० कोटी भरण्यासाठी मिळाली १५ दिवसांची मुदत, १९ डिसेंबरपर्यंत टळली अटक
* राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना राज्याच्या मुख्य सचिवांएवढे, तर राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांप्रमाणे मिळणार वेतन आणि भत्ते
* विधेयक मांडले जाणार हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार
* फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी कुठे बसायचे हे निश्चित करणारे फेरीवाला क्षेत्र मुंबई मनपाने केले जाहीर
* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फ़ेरीवाल्यांसाठी २४ विभागांमध्ये २२ हजार ९७ ओट्यांना मान्यता
* परीक्षा केंद्रात अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना उशिरा येण्यास सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर १०.३० वाजता पोहोचण्याचे बंधन
* औरंगाबादचे प्रसिद्ध व्यापारी, मालानी ट्रेडर्सचे संचालक विजयकुमार मालानी यांचे निधन
* वांद्रे-वरळी सागरी मार्गावरील टोलवसुलीचा कालावधी २०५२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय, प्रकल्पाच्या वाढीव १९७५ कोटी खर्चालाही मान्यता
* 'भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्ती डौलाने चालत राहतो, मूर्खांच्या विधानाची दखल घेण्याची गरज वाटत नाही'- मनसे
* एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांच्या राज ठाकरे म्हणजे 'बुझा हुआ दियां' या वक्तव्याचा मनसेने घेतला समाचार
* भाजप सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते प्रथमच रस्त्यावर
* यवतमाळ ते नागपूर पदयात्रेत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची दररोज १० ते १५ किमी पायपीट
* सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि जलद तपासासाठी मुंबईत प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष स्थापन
* जुईनगर येथील बँक ऑफ बडोदा दरोडाप्रकरणातील दहावी अटक, आरोपी हाजीदच्या बहीणीकडून दागिनेही हस्तगत
* राम मंदिर आंदोलनाची पंचविशी उद्या शौर्यदिन म्हणून उत्तर प्रदेशात होणार साजरी
* राम मंदीर अयोध्येतच असा दावा सरसंघचालक मोहन भागवत कोणत्या अधिकाराने करत आहेत? ते देशाचे सरन्यायाधीश आहेत का?- ओवेसी
* अजय देवगणच्या नावानं अलाहबादमध्ये गुंतवणूकदारांना २०० कोटींचा गंडा घातल्याचे उघडकीस
* खेड तालुक्यातील धामणे येथील सतरा वर्षांच्या मुलीचा खून केल्याचे उघडकीस, तीन दिवसांपासून होती बेपत्ता, लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय
* डिसेंबर महिनाअखेर आधार केंद्रे बँक शाखांतून सुरू करण्याचे बँकांनी केले जाहीर
* तोंडी तलाक घेणाऱ्यांमध्ये भिती निर्माण होण्यासाठी कठोर कायदा होणे गरजेचे- अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष सईद रिझवी
* विजय मल्ल्यावर फसवणुकीचा खटला असल्याने उत्तर द्यावेच लागेल- भारताने सांगितले लंडन न्यायालयात
* माझ्यावरील सर्व आरोप खोटे आणि निराधार, कोर्टात सादर केलेले पुरावे निर्दोषत्व सिद्ध करण्यास पुरेसे- विजय मल्ल्या
* जम्मू-काश्मीरमध्ये काजीकुंडमध्ये दहशतवाद्याशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा जवान शहीद, तर एक जखमी, दोन दहशतवादी ठार
* १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मोहम्मद ताहीर मर्चंटच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती
* जम्मू-काश्मीरमधील नूरपुरा येथील बँक लुटली दहशतवाद्यांनी
* जनता केवळ भाजपचा विजय पाहण्यासाठीच उत्सुक नाही, तर गुजरातची मानहानी करणाऱ्यांचा पराभवही करायचा आहे- पंतप्रधान
* गोवा येथे ०७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार्‍या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संघात औरंगाबादच्या १० खेळाडूंचा समावेश
* पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांची लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदसोबत ‘युती’
* पाक तुरुंगात असलेला मुंबईचा रहिवासी हमीद अन्सारीची शिक्षा कमी करून मुक्तता करावी- हमीदच्या आईचे पाकला पत्र


Comments

Top