HOME   महत्वाच्या घडामोडी

कार आहे? गॅस नाही, भुजबळांची संपत्ती जप्त, सिन्हा शांत झाले, बीटीवर बंदी, महसूल मंत्री थापाडे, दादर टर्मिनस आंबेडकर टर्मिनस.......०७ डिसेंबर २०१७


कार आहे? गॅस नाही, भुजबळांची संपत्ती जप्त, सिन्हा शांत झाले, बीटीवर बंदी, महसूल मंत्री थापाडे, दादर टर्मिनस आंबेडकर टर्मिनस.......०७ डिसेंबर २०१७

* १६ लाख ९८ हजार ११० शेतकर्‍यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ
* ओखी वादळ झाले गायब
* गुजरातेत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आज मतदान
* विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रसाद लाड आणि दिलीप माने यांच्यात लढत
* छगन भुजबळ यांची २० कोटींची मालमत्ता जप्त
* गोकुळ दूध महासंघावर आज सतेज पाटील काढणार मोर्चा
* विराट आणि अनुष्काच्या लग्नाची अफवा, अनुष्काकडून खुलासा
* चार चाकी असेल तर अनुदानित गॅस मिळणार नाही
* राज्यातील केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात मराठी भाषा व देवनागरी लिपीचाही वापर करणे बंधनकारक
* राज्यातील विमान, रेल्वे, मेट्रो, मोनो रेल, दूरध्वनी, पेट्रोलियम, प्राप्तिकर, आयुर्विमा, पारपत्र व टपाल कार्यालयांचा समावेश
* गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान
* अकोल्यात यशवंत सिन्हा यांचे शेतकरी आंदोलन मागे
* मोदींना अर्धवट माहिती घेऊन बोलण्याची सवय- कपिल सिब्बल
* दिल्लीसह उत्तर भारताला भुकंपाचे धक्के; सहारनपूर, मथुरा, चंदीगड आणि मेरठही भूकंपाने हादरले
* जम्मू काश्मिरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणार्‍या शिवसैनिकांना अटक
* खासदार-आमदारांना कोणती माहिती द्यायची याचे धोरण ठरविण्यासाठी राज्यात समिती स्थापन
* अन्न भेसळ रोखण्यासाठी केंद्राचे कायदे आणि राज्याची नियमावली असल्याने मर्यादा- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
* बोंडअळीमुळे बीटी कापसाच्या बियाणांवर बंदी- कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर
* शुल्क नियंत्रण समिती कायद्यात बदल करणार- शिक्षण मंत्री विनोद तावडे
* ऊस दराच्या प्रश्नावर सुकाणू समितीचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन
* कर्जमाफी योजनेत १० लाख बोगस लाभार्थी असल्याचं सांगणारे महसूल मंत्री चंद्रकात पाटील थापाडे- शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील
* ‘एक लिंगायत-कोटी लिंगायत’चा नारा आता मुंबईतही घुमणार
* दादर टर्मिनसचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करा- भीम आर्मीचे पोस्टर
* निवडणुकीच्या कामाला नकार दिल्यानं बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल
* लसूण भाजी आहे की मसाला? जीएसटी संदर्भातील याचिकेच्या सुनावणीत राजस्थान उच्च न्यायालयाचा प्रश्न
* इंदू मिल स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरूवात- चैत्यभूमीवर मुख्यमंत्री
* शेतकरी संघटनेच्यावतीने पुणे येथे १० ते १२ डिसेंबरला राष्ट्रीय किसान परिषद
* उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणी कुलगुरूंना बोलावण्याचा इशारा, गहाळ झालेली उत्तरपत्रिका न्यायालयात सादर, न्यायालयाने मागितला खुलासा
* देशाच्या विविधतेचं प्रतिनिधित्व करणारं स्मारक बनवा, अयोध्या मुद्द्यावर श्याम बेनेगल यांचं मत
* उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये आज ४० हजार मुलांचे 'वंदे मातरम'
* बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजधानीतील स्मारकाचे आज लोकार्पण, केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळण्याची शक्यता
* उसाला ३५०० रुपये प्रतिटन भाव नही दिला तर साखर कारखाने बंद पाडणार- शेतकरी संघटना
* ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित उल्हास कशाळकर यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान जाहीर
* पुणे येथे मुलाने केली आई-वडिलांची गळा दाबून हत्या
* कोकणाचे श्रद्धास्थान असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील गंगामाईचे उन्हाळे तीर्थ अवतरले, १४ कुंडातील पाण्याने भाविकांचे स्नान
* चाळीसगाव तालुक्यातील मालेगाव रस्त्यावर ०७ वर्षाच्या कुणाल आहिरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत, चार महिन्यात ०७ मृत्यू
* ०८ राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी अभ्यास समितीची स्थापना
* जयपूर न्यायालयात लष्कर-ए-तोयबाच्या ०८ अतिरेक्यांना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी दोन लाखाचा दंड
* रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कोणताही बदल नाही, दर ०६ टक्क्यांवर कायम
* उत्तर प्रदेशातील काही शहरांमध्ये झळकले बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी करणारे पोस्टर
* गुजरातमध्ये भाजपला टक्कर देण्याच्या तयारीत सेना, सेनेच्याच विजय शिवतारे यांनी केले भाजप उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
* काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना जामीन नाही
* ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई द्या- धनंजय मुंडे
* बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माई आंबेडकरांची जयंती २७ जानेवारीपासून करणारसाजरी- माईसाहेब आंबेडकर स्मृती प्रतिष्ठान
* पंजाबच्या सीमावर्ती परिसरातून ५५ किलो हेरॉइन जप्त
* राहुल गांधी यांचं मंदिरात जाणं हे ढोंग- उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
* शाओमी रेडमी 'Y१' आणि 'Y१ लाइट' स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन सुरु
* गुजरात काँग्रेसने ०५ नेत्यांना केले पक्षातून निलंबित
* एकाच कुटुंबामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असे काँग्रेसला वाटतं, पण स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींचं योगदान ते विसरले- पंतप्रधान
* गुजरात विधानसभा निवडणूक: पाटीदार पटेल, ओबीसी व दलितांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित, मुस्लिम समाज नाराज
* काँग्रेस नेते वगळता सर्वांना राम मंदिर वादावर निश्चित वेळेत तोडगा हवा आहे- पंतप्रधान
* आमचा देवावर विश्वास, नरेंद्र मोदींवर नाही, आम्ही राम मंदिर बांधणार नाही, देवाला जेव्हा वाटेल तेव्हा बनेल, न्यायालयच ते ठरवेल- कपिल सिब्बल
* हॉकी वर्ल्ड लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत भारताने केला बेल्जियमचा पराभव
* पाकिस्तानमधील पेशावरमध्ये शशी कपूर यांना श्रद्धांजली


Comments

Top