HOME   महत्वाच्या घडामोडी

संसदेची १६ वर्षे, झाली एकदाची कर्जमाफी, उडाणचं तिकीट एक रुपया, बाटलीबंद पाणी जादा दरानेच, आता १५ टक्के इथेनॉल.....१३ डिसेंबर २०१७


संसदेची १६ वर्षे, झाली एकदाची कर्जमाफी, उडाणचं तिकीट एक रुपया, बाटलीबंद पाणी जादा दरानेच, आता १५ टक्के इथेनॉल.....१३ डिसेंबर २०१७

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन २९९७, मूग ५४५० तर उडीद पोचले ४१६ रुपयांवर (कमाल भाव)
* कोळसा घोटाळ्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सीबीआय कोर्टाने ठरवले दोषी
* संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मोदी अन मनमोहनसिंग भेटले, हातात दिला हात
* कविवर्य ना.धो. महानोर यांच्या उपस्थितीत लातुरात २४ डिसेंबर रोजी धनगर समाज राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
* लातूर जिल्ह्यात केवळ २१ हजार शेतकर्‍यांनी केली नावनोंदणी, हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ
* खाजगीकरणाच्या विरोधात बीएसएनएल कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन, दोन दिवसांच्या राष्ट्रव्यापी संपात सहभाग
* लातूर जिल्ह्यात ०१ लाख २६ हजार ६९६ शेतकर्‍यांना कर्जमाफी
* लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना २०५ कोटी ७० लाखांचा लाभ मिळणार
* संसदेवरील हल्ल्याला १६ वर्षे पूर्ण, मान्यवरांनी अर्पण केली शहिदांना श्रद्धांजली
* विश्वास गमावलेल्या साकारची कुठलीच देणी देऊ नका, शरद पवार यांचे आवाहन
* गुजरात ९३ जागांवर गुरुवारी मतदान
* उडाण योजनेअंतर्गत २३ तारखेपासून नाशिक-मुंबई विमान सेवा
* काही नशीबवान प्रवाशांना मिळणार एक रुपयात तिकीट
* पिंपरी चिंचवड परिसरात आढळलं उकळतं पाणी
* सेवा देत असल्याने हॉटेल चालकांना विकता येणार अधिक दराने बाटलीबंद पाणी
* मोहालीत भारत-श्रीलंका एक दिवसीय सामना
* सिंचन घोटाळा प्रकरणी आणखी चार गुन्हे दाखल
* १८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर मराठा मोर्चा, गनिमी कावा वापरणार
* १८ डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा निकाल लागताच मोठी उलथापालथ होणार- चंद्रकांत खैरे
* गुजरात निवडणुकीत वापरले जाणारे सगळे इव्हीएम सुरक्षित, सरकारचा दावा
* पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉल वापारण्यास परवानगी देणार- नितीन गडकरी
* नागपूर अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, अजित पवारांनी उपस्थित केला कर्जमाफीचा मुद्दा
* ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे कल्याण महामंडळ स्थापन करणार
* लोकप्रतिनिधींवरील खटले चाल्वण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार
* मोदी गोरे होण्यासाठी कोट्यवधींचं मशरुम खातात- अल्पेश ठाकूर


Comments

Top