* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३७८९, तूर ६३५० तर हरभरा पोचला ४६५१ रुपयांवर
* लातूर मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी दीपक मठपती यांची निवड
* कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराला पडली सारखीच आठ मते, चिठ्ठ्या टाकून झाली निवड
* लातुरचे भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मिळली एकूण ०६ लाख ६१ हजार ४९५ मते
* कॉंग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामंत यांना मिळाली ०३ लाख ७२ हजार ३८४ मते
* सुधाकर शृंगारे झाले ०२ लाख ८९ हजार १११ मतांनी विजयी, एक विक्रमच!
* लातूर मतदारसंघात ६५६४ जणांनी केला नोटाचा वापर
* लातूर मतदारसंघात एकूण ११ लाख ७८ हजार ०८९ जणांनी केले होते मतदान
* मोदी महानयक अमित शाह यांनी केले कौतुक
* राज्यात भाजप सेनेने जिंकल्या ४१ जागा
* राहूल गांधी, सुशीलकुमार शिंदे, पार्थ पवार पराभूत
* भाजपा आघाडीने ३५० हून अधिक जागा जिंकल्या
* एकट्या भाजपाने पार केला तिनशेचा आकडा
* कॉंग्रेसप्रणित आघाडीला ८६ च्या आसपास विजय
* आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक
* २६ मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता
* नागपुरातून नितीन गडकरी, यवतमाळमधून भावना गवळी विजयी
* वंचित विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अकोल्यातून पराभूत
* देशातील कोट्यवधी नागरिकांनी एका फकिराची झोळी भरुन टाकली- नरेंद्र मोदी
* मोदी आणि अमित शाह यांनी दोन्ही निवडणुकातील स्वत:चाच विक्रम मोडला
* राहूल गांधी यांनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव, मोदी-इराणींचे केले अभिनंदन
* महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा, वंचितलाही एकच तर राष्ट्रवादीने जिंकल्या पाच जागा
* जनतेनं मोदी यांचं नेतृत्व स्विकारलं आहे- देवेंद्र फडणवीस
* शिवसेना भाजप युतीनं मुंबईतल्या सर्व सहा जागा जिंकल्या
* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात आवक वाढणार
* राज ठाकरेंनी मोदी-शाह यांच्या विरोधात उठवलेली राळ मतदानापर्यंत पोचलीच नाही
* राज ठाकरेंच्या दहा विक्रमी सभांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला फायदा झालाच नाही
* मी कुणाला काहीच म्हणणार नाही, एवढंच म्हणेन लावा रे ते फटाके- उद्धव ठाकरे
* राजू शेट्टींनाही स्विकारावा लागला पराभव
* फक्त भाषणांवर निवडणुका जिंकता येत नाहीत, राज ठाकरेंवर टीका
Comments