HOME   महत्वाच्या घडामोडी

नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे मतदान, हार्दिकच्या जिवाला धोका, वाळूचोरांचा पाच कोटींचा हप्ता, पुन्हा केजरीवाल घडणे नाही......१४ डिसेंबर २०१७


नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे मतदान, हार्दिकच्या जिवाला धोका, वाळूचोरांचा पाच कोटींचा हप्ता, पुन्हा केजरीवाल घडणे नाही......१४ डिसेंबर २०१७

* नरेंद्र मोदी, हिराबेन, आनंदीबेन पटेल, अमित शाह यांनी केले मतदान
* मतदानानंतर पंतप्रधान मोदी यांनी केला इनी रोड शो
* गुजरातेत पहिल्या तीन तासात १० टक्के मतदान
* हार्दिक पटेल याच्या जिवितास धोका असल्याची त्याच्या आईला भिती
* दयानंद गेट, खर्डेकर स्टॉप, हनुमान चौक, सुभाष चौक, रेणापूर नाका, राजस्थान शाळा मार्गावरील सिग्नल सुरु
* शाहू चौक आणि विवेकानंद चौकात कुणीच सिग्नल पाळेना
* लातूर जिल्ह्यात अकार्यक्षम ११०४ संस्थांची नोंदणी रद्द
* लातूर महापालिका पुन्हा करणार मालमत्ता कराची वसुली
* अमृतच्या गुत्तेदाराने तुटलेल्या नळांची जोडणी करण्यासाठी परस्पर छापले पावती बुक, लातूर मनपाने दिले जमा करण्याचे आदेश
* १५ ते १७ डिसेंबर दरम्यान लातुरात लॅप्रोस्कोपी संघटनेची कार्यशाळा
* गुजरात विधानसभा निवडणूक: आज ९३ जागांवर मतदान
* कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी विविध वाहिन्यांवरुन दिलेल्या मुलाखतींबद्दल निवडणूक आयोगाची नाराजी
* राहूल गांधी यांच्या तथाकथित मुलाखती दाखवणार्‍या वाहिन्यांविरुध्द गुन्हे दाखल करणार, राहूल यांच्या मुलाखतींवर बंदी
* राहूल गांधींना १८ तारखेपर्यंत उत्तर देण्याची मर्यादा, कॉंग्रेसवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी
* मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीत १७०४ संस्थांचा १८२६ कोटींचा गैरव्यवहार, ७० संस्थांवर गुन्हे दाखल, मराठवाड्यातील काही संस्थांचाही समावेश
* नाशिक, जळगावकरांचं २३ तारखेला विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार, कोल्हापुरात २४ ला उड्डाण
* औरंगाबादेत वाळूचोर महिन्याला पोलिसांना देतात पाच कोटींचा हप्ता- वाळू वाहतूक संघर्ष समिती
* नाशिक, पुणे, जळगाव, कोल्हापुरच्या अंतर्गत विमान सेवेची जबादारी एअर डेक्कनवर, १७ सीटर विमान झाले दाखल
* २००० ते २०११ मधील झोपडीधारकांना पक्की घरं देण्याचा अधिवेशनात निर्णय, मुंबईतील साडे तीन लाख झोपड्यांना मिळणार लाभ
* संपूर्ण भारतीय बनावटीची स्कॉर्पिनस पाणबुडी आज दाखल होणार नौदलात, मुंबई डॉकयार्डवर पंतप्रधान नौदलाकडे करणार सुपूर्त
* आधार नंबर बॅंक खात्याशी जोडण्याची मुदत आता ३१ मार्च १८
* ब्रिटीश एअरवेजने धूर निघाल्याने विमान उतरवले अजरबैजानच्या विमानतळावर, एसबीआय माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांना झोपावे लागले फ़रशीवर
* सरकारी रुग्णालयांत चाचण्या, उपचार, शस्त्रक्रियांच्या दरात १० हजारपर्यंत वाढ, वैद्यकीय प्रमाणपत्र शुल्कात ५० ते ५०० रुपयांची
* राज्यातील ६० हजारांहून अधिक बोगस कंपन्यांचे आर्थिक व्यवहार थांबविण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश- उद्योगमंत्री सुभाष देसाई
* कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा विचार नाही- मुख्यमंत्री
* साठे महामंडळ गैरव्यवहार: रमेश कदमांना जालन्यात सुनावणीला आणणे त्रासदायक, सुनावण्या होणार व्हिडिओ कॉनफ़रन्सिंगद्वारे
* आंदोलन गुंडाळून राजकारणात शिरणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नवीन आंदोलनात पुन्हा जन्माला येऊ नये- अण्णा हजारे
* कर्जमाफी झाली म्हणता पण पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर कधी जमा होणार? अजित पवार यांचा सवाल
* चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख एक सांगतात अन मुख्यमंत्री दुसरेच बोलतात, अजित पवारांचा आरोप
* उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, आज होणार विरोधकांची बैठक
* पुण्याच्या यमाईदेवीच्या गाभार्‍यात दीड वर्षांपासून महिलांना बंदी, तृप्ती देसाई पोचल्या, भाविकांनी केली तोडफोड
* कोल्हापुरात आठवीच्या विद्यार्थीनीने गृहपाठ केला नाही म्हणून मुख्याद्यापिकेनी काढायला लावल्या ५०० उठाबशा
* कराडच्या आयटीआय मध्ये मुलींच्या स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे, चार विद्यार्थी निलंबित
* अहमदनगरच्या पारनेरमध्ये वाळू तस्करांनी केला तहसीलदारांना जाळण्याचा प्रयत्न, दगडफेकही केली
* परभणीच्या पाथरीत आठ लाखांचा गुटखा जप्त
* सवाई गंधर्व महोत्सवाला पुण्यात सुरुवात यंदाचं ६५ वं वर्ष
* मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका दीड लाखांची! पत्रिकेवर सोन्याचे काम
* मोहालीत झालेल्या भारत श्रीलंका एक दिवसीय सामन्यात भारताचा १४१ धावांनी विजय
* छत्रपतीं शिवरायांचा जीवनपट अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून तयार, ट्रेलर झाला रिलीज
* सिंचन घोटाळ्याचा आरोप असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या चौकशीचा अहवाल सादर करा- नागपूर उच्च न्यायालय
* मायावती आंबेडकरवादी असतील तर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी, घोषणाबाजीने बौद्धांची दिशाभूल करण्याचा उद्योग थांबवावा - रामदास आठवले
* मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, सकस लेखकांना संमेलनात स्थान द्या, अन्यथा बडोद्याचे साहित्य संमेलन उधळू- कृती समितीचा इशारा
* बँकिंग व्यवस्थेतील अनुउत्पादित कर्जे हा यूपीएच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा- पंतप्रधान
* सोशल मीडियावर सूचीबद्ध कंपन्यांची महत्वाची माहिती लिक कशी केली जाते? याचा तपास करण्याचा 'सेबी' चा निर्णय


Comments

Top