HOME   महत्वाच्या घडामोडी

आजपासून संसदेचे अधिवेशन; पेटणार, सेना जाणार सत्तेबाहेर, अवयवदानातून दोघांना जीवदान, मुख्यमंत्री अवमानित योजना, नेहरु सेंटरमध्ये राजा रवी वर्मा, पीएमची चौकशी.....१५ डिसेंबर २०१७


आजपासून संसदेचे अधिवेशन; पेटणार, सेना जाणार सत्तेबाहेर, अवयवदानातून दोघांना जीवदान, मुख्यमंत्री अवमानित योजना, नेहरु सेंटरमध्ये राजा रवी वर्मा, पीएमची चौकशी.....१५ डिसेंबर २०१७

* शिवाजी पाटील कव्हेकरांचा १०२ गावांचा दौरा पूर्ण, २२ तारखेला लातुरात काढणार मोर्चा
* नासाला सापडली नवी सूर्यमाला, पण जीवसंवर्धनासाठी पोषक नसल्याचा खुलासा
* भंडार्‍यात लग्नाच्या मंडपात शिरला वाघ
* १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची सरकारची घोषणा खड्ड्यात, सरकारची नाचक्की
* खड्डे प्रकरणी आज लातुरात कॉंग्रेसचे हल्लाबोल, आंदोलन
* खासदार दुष्यंत चौटाला संसदेच्या अधिवेशनाला आले चक्क ट्रॅक्टर घेऊन, सुरक्षा रक्षकांनी अडवलं
* अमृतच्या कामात तुटलेले साडे नऊ हजार नळ गुत्तेदाराच्या खर्चातून जोडून घेणार- अशोक गोविंदपूरकर
* पावती घोटाळा प्रकरणी जन आंदोलन उभारणार- दीपक सूळ
* आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, विरोधकांच्या हाती अनेक कोलितं!
* सेना सत्तेतून बाहेर पडणार, अंतिम निर्णय घेतील उद्धव ठाकरे- आदित्य ठाकरे नगरमध्ये
* औरंगाबादेत वाळूमाफियांच्या मोर्चाला पोलिसांनी नाकारली परवानगी, पाच कोटींचा हप्ता देत असल्याचा वाळू माफियांचा दावा
* मुंबई-आग्रा मार्गावर २५ रायफली, २५ पिस्तुलं आणि ०४ हजार जिवंत काडतुसं जप्त
* अहमदनगरच्या पारनेरमध्ये तहसीलदारांना जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
* ऐन अधिवेशनाच्या काळात नागपुरात वाईन शॉप फोडून लाखांचा ऐवज लांबवला
* बीडमध्ये हजारावर स्कूल रिक्षा चालकांनी पाळला बंद, आजही सुरु
* महाबळेश्वरातील तापमान घसरले १२ अंशावर
* नागपुरात ब्रेन डेड झालेल्या सुभाष पुरी यांच्या अवयवदानातून दोघांना मिळाले जीवदान
* बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी अनेक विकास कामांवर हातोडा
* बोंडअळी नुकसान भरपाई सरकार, विमा कंपनी आणि औषध कंपनी अशा तीन मार्गांनी मिळणार- मुख्यमंत्री
* औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावं हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, त्याकडे शिवसेनेचे मंत्रीही दूर्लक्ष करतात- चंद्रकांत खैरे
* रोजगार हमी योजनेवरुन एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला धरले धारेवर
* कोल्हापुरात दोन टोळ्यात राडा, अनेक गाड्या फोडल्या, १५ जणांना अटक
* उडाण: नाशिकमध्ये आगाऊ तिकिट नोंदणीची यंत्रणा कोलमडली
* भाजपला गुजरात निवडणुकीत स्पष्ट बहुमत तर काँग्रेसचा पुन्हा पराभव- सर्वच एक्झिट पोलचा अंदाज
* कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत सुरुवातीस काही चुका झाल्या, चुकीच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप झाली- मुख्यमंत्री
* २२ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर माफ़ीची रक्कम जमा, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत योजना सुरूच राहणार- मुख्यमंत्री
* कर्जमाफीला शिवरायांचे नाव देण्याऐवजी मुख्यमंत्री अवमानित योजना असे नाव द्या- धनंजय मुंडे
* वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संकेतस्थळाशी साधर्म्य असणारे बोगस संकेतस्थळ सुरु केल्याचे उघड
* अंबाजोगाईजवळील अंबालवाडी गावाजवळ दोन एसटींच्या धडकेत एक चालक ठार, ३० हून अधिक प्रवासी जखमी
* नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आजपासून राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचे प्रदर्शन
* एटीएस व सीबीआयपेक्षा एनआयएचा तपास पूर्ण वेगळा कसा?- उच्च न्यायालय
* मालेगाव बॉम्बस्फोट: एटीएस व सीबीआयच्या ०९ आरोपींवरील आरोप रद्द करुन एनआयएने वेगळ्याच चार आरोपींवर दाखल केले आरोपपत्र
* पॅथॉलॉजीचे पदव्युत्तर आणि मेडिकल काऊंन्सिलला नोंदणीकृत असलेल्या लॅबेरोटरीच तपासणी अहवाल करू शकणार प्रमाणित
* मुंबई विद्यापीठाने इंजिनीअरिंगच्या परिक्षेत मे महिन्याची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी पाठविली डिसेंबरच्या परीक्षेत
* मुंबई, नवी मुंबई, कोकणातल्या रस्त्यांच्या कामात प्लास्टिक वापराचा प्रयोग झाला यशस्वी
* राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये जिल्हा परिषदेचे ९८ हजार मागासवर्गीय विद्यार्थी मोफत गणवेशापासून वंचित
* राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत वैद्यकीय संशोधनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार
* एसएम जोशी यांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अजय जोशी यांचे निधन
* एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरण: मृतांच्या कपाळावर नंबर टाकणे अत्यंत चुकीचे- मुंबई उच्च न्यायालय
* ज्येष्ठ व्हायोलिनवादक, संगीतकार प्रभाकर जोग यांचा गदिमा पुरस्काराने सन्मान
* 'मिनी रोड शो' करुन पंतप्रधानांनी केला आचारसंहितेचा भंग, भाजपने निवडणूक आयोगाला बनवले कळसूत्री बाहुली - काँग्रेसचा आरोप
* पंतप्रधानांच्या रोड शोच्या अहवालाची सखोल तपासणी केल्यानंतर निर्णय घेणार- निवडणूक आयोग
* कन्याकुमारीत राहुल गांधी भेटले ओखी वादळपिडीत मच्छिमारांना
* अमरनाथ गुहेत मंत्रोच्चारांचे पठण करण्यास अथवा भजनास बंदी नाही- राष्ट्रीय हरित लवाद


Comments

Top