HOME   महत्वाच्या घडामोडी

संसद अधिवेशन पहिल्या दिवशीच दोन वेळा तहकूब

विरोधकांनी केली पंतप्रधानांकडून माफीची मागणी


संसद अधिवेशन पहिल्या दिवशीच दोन वेळा तहकूब

नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्याबद्दलचे वक्तव्य आणि शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयावरून पंतप्रधानांच्या माफ़ीची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला. गुजरात जिंकण्यासाठी पाकची मदत घेतली जात असल्याचा आरोप पंतप्रधानांनी प्रचारात मनमोहनसिंगांवर केला. पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीने माजी पंतप्रधानांवर केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर असल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हटले. याबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे असा आग्रह धरला. 'तानाशाही नहीं चलेगी' च्या घोषणा देत विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या माफीची मागणी केली. शरद यादव आणि अली अन्वर यांना निलंबित केल्यावरुन संसदेत गोंधळ सुरुअसतानाच आझादांच्या मागणीने आणखीनच गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. अधिवेशन सुरळीत चालण्याची अपेक्षा करुन सकारात्मक चर्चा घडावी. कामकाजाचा संपूर्ण वेळ सत्कारणी लागावा अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाआधीच व्यक्त केली होती.


Comments

Top