HOME   महत्वाच्या घडामोडी

आज राहुलचा राज्याभिषेक, पोलिसांना आठच तास ड्युटी, पाकविरुद्ध आज विजय दिवस, पुन्हा शिवजयंती वाद, तिहेरी तलाक फौजदारी, मोबाईल महागणार......१६ डिसेंबर २०१७


आज राहुलचा राज्याभिषेक, पोलिसांना आठच तास ड्युटी, पाकविरुद्ध आज विजय दिवस, पुन्हा शिवजयंती वाद, तिहेरी तलाक फौजदारी, मोबाईल महागणार......१६ डिसेंबर २०१७

* लातूर विभागीय शिक्षण मंडळातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांना तीन वर्षांपासून मुहूर्त मिळेना
* वसंतराव नाईक महामंडळातील घोटाळा: लातुरच्या चारही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
* फ्लोराईडमिश्रित पाणी प्रकरण: राज्यातील १२ जिल्हाधिकार्‍यांना अटक करुन हजर करा- हरित लवादाचा आदेश
* त्या १२ जिल्हाधिकार्‍यांमध्ये लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांचाही समावेश
* २६ जानेवारीपासून मुंबईतल्या सर्वच ठाण्यांतील पोलिसांना आठ तासांची ड्युटी
* औरंगाबादेत बड्या राजकीय नेत्यांच्या बॅंकांकडून कर्जापोटी शेतकर्‍यांना जप्तीच्या नोटिसा
* नवे कॉंग्रेसाध्यक्ष राहूल गांधींचा अज राज्याभिषेक, सुत्रे हाती घेणार, दिल्लीत खास कार्यक्रम
* राहूल गांधी पदभार घेणार असल्यानं प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन
* आज विजय दिवस, बरोबर ४६ वर्षांपूर्वी झालेल्या युद्धात पाकिस्तानला भारताने शरणागती पत्करायला लावली, दिल्लीत अनेक कार्यक्रम
* जीएसटी समितीची आज बैठक, इबे बील आणि करचोरीवर घेणार महत्वाचे निर्णय, जीएसटी होणार आणखी सुकर
* शस्त्रास्त्रांच्या मोठ्या साठ्यासह दाऊदच्या शार्प शूटरला मुंबईत अटक, घातपात करण्याचा होता डाव
* राज्यातील १७ जिल्हे शंभर टक्के खड्डेमुक्त, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा
* सोनिया गांधी राजकारणातून नव्हे तर अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून निवृत्त होणार कॉंग्रेसचे स्पष्टीकरण
* शिवसेना आमदार प्रकाश आबीटकरांच्या खात्यावर अकारण कर्जमाफीचे २५ हजार रुपये जमा, फडणवीस सरकारची नाचक्की
* अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या बदल्या
* क्रिकेटपटू अजिंक्य राहणेच्या वडिलाच्या गाडीनं दिलेल्या धडकेत आशाबाई कांबळे यांचा मृत्यू
* बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका कारनं घेतला अचानक पेट, सुदैवाने दुखापत नाही
* उडाण योजनेअंतर्गत सुरु होणार्‍या विमानसेवेला जोरदार प्रतिसाद, १४ जानेवारीपर्यंतची तिकिटं हातोहात खपली
* छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेवरुन विधानसभेत वाद-प्रतिवाद, जन्मदिवस एकाच दिवशी साजरी करण्याची मागणी
* कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
* खासदारकीचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पाटोले यांचं भंडार्‍यात जोरदार स्वागत
* शेतकर्‍यांसाठी येत्या नऊ ऑगस्टला नव्या पक्षाची स्थापना करण्याची रघुनाथदादा पाटील यांची घोषणा
* तात्काळ तिहेरी तलाक फौजदारी गुन्हा ठरवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
* तीन तलाकविरोधी विधेयकाला दिलेल्या कॅबिनेटच्या मंजुरीला एएमआयचे नेते खासदार असादुद्दीन ओवेसींचा विरोध
* केंद्र सरकारने केली कस्टम ड्युटीत वाढ मोबाईलच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत वाढणार
* तामिळनाडूतील एका हॉटेलात चार रोबोंचा वापर, उत्तम सेवा देतात, तमिळही बोलतात
* आंबेडकर यांच्या इंदू मीलमधील स्मारकाचे काम शापूरजी आणि पालनजी कंपनीला मिळण्याची शक्यता
* पुणे येथे बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँक ऑफ महाराष्ट्रचे १३ कोटीचे कर्ज मंजूर करुन घेणार्‍यावर गुन्हा दाखल
* क्षयरुग्ण कळवा १०० रुपये मिळवा- खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना मिळणार अनुदान, पेशंटच्या उपचाराची माहिती दिल्यावर मिळणार ४०० रुपये
* कलर प्रिंट काढलेल्या बनावट नोटा चलनात आणणारे भिवंडीतील तीनजण गजाआड, ०२ लाख ४५ हजारांच्या बनावट नोटा जप्त
* सोलापूर विद्यापिठाचे नाव बदलणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केले स्पष्ट
* विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी होती केली
* बेकायदा फेरीवाल्यांकडून माल खरेदी केल्यास ग्राहकाला दंड आकारा, फेरीवाल्यांना महाराष्ट्रातील वास्तव्याचा १५ वर्षांचा अधिवास सक्तीचा करा- मनसे
* राज्यातील १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा भंग, बाल हक्क संरक्षण आयोगाकडे ‘आप’ करणार तक्रार
* टोल नाके नकोत म्हणून हायब्रीड ऑन्युटी तत्त्वावर ३० हजार कोटीचे १० हजार किलोमीटर रस्ते राज्यात बांधणार- चंद्रकांत पाटील
* बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत- सदाभाऊ खोत यांचे विधान परिषदेत आश्वासन
* औषधांची गुणवत्ता राखण्यासाठी, औषधांत रासायनिक बदल होऊ नयेत यासाठी दुकानांमध्ये एसी बंधनकारक केले नाही-अन्न व औषध प्रशासन
* औषधांच्या दुकानात एसी लावण्याच्या सूचना केल्याची मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या तक्रारीचा खुलासा
* मध्य रेल्वेच्या मार्गावरून बम्बार्डियर लोकल धावणार सोमवारपासून
* पुणे येथे कर्वे रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे एसटीच्या २२० मार्गांत होणार बदल
* मुंबई-आग्रा मार्गावरील शस्त्र साठा जप्तीतील ०३ आरोपींना १३ दिवसांची पोलीस कोठडी
* हिवाळी अधिवेशन किमान दहा आठवडे व्हावे, विकासाची कामं मार्गी लागणार नसतील तर अधिवेशनाचा फार्स बंद करा- भाजपचे आशिष देशमुख
* ०२ हजारापर्यंत डिजिटील पेमेंटवर शुल्क न आकारण्याचा निर्णय, लाभ दोन वर्षांसाठी, बँकांना २५१२ कोटीची भरपाई देणार सरकार
* परदेशी टीव्ही, मोबाइल मायक्रोवेव्हच्या आयातीवरील सीमा शुल्कात १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढ
* वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखण्यासाठी नवा नियामक आयोग स्थापन करण्याचा निर्णय
* ‘राष्ट्रीय वैद्यकीय परिषद’ बंद होऊन ‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७’च्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
* पंजाब, हरयाणा आणि चंदिगडमध्ये फटाके फोडण्यांवर सुप्रीम कोर्टाची बंदी कायम, पुढील सुनावणी ०५ जानेवारी रोजी


Comments

Top