HOME   महत्वाच्या घडामोडी

तेलगीच्या मालमत्ता सरकारजमा करा- शाहीदा तेलगी

सर्व स्थावर मिळकतीची फेरतपासणी करुन खात्री करावी


तेलगीच्या मालमत्ता सरकारजमा करा- शाहीदा तेलगी

पुणे: बनावट मुद्रांक घोटाळय़ातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या मालमत्तांची तपासणी करुन त्या सरकारजमा कराव्यात अशी मागणी पत्नी शाहिदा हिने विशेष न्यायालयात केली आहे. तेलगीने बनावट मुद्रांक घोटाळय़ातून मोठय़ा प्रमाणावर पैसे कमवले होते. या पैशामधून विकत घेतलेल्या मालमत्ता सीबीआयने सरकारजमा केलेल्या नाहीत. या सर्व स्थावर मिळकतीची फेरतपासणी करुन खात्री करावी अशी मागणी शाहिदाने विशेष न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. या घोटाळय़ात उच्चपदस्थ अधिकारी, राजकीय नेते, पोलीस अधिकार्‍यांना अटक झाली होती. काहींनी अजुनही द्याप गुन्हा कबूल केलेला नसल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात सुनावणी सुरू आहे.तेलगीची पत्नी शाहिदालाही आरोपी करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने तिची जामिनावर मुक्तता केली आहे. सध्या ती आजारी आहे. तेलगीचा महिन्याभरापूर्वी बंगळुरूतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


Comments

Top