HOME   महत्वाच्या घडामोडी

भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करणार- हार्दिक पटेल

काहीही करुन त्यांना गुजरातची निवडणूक जिंकायची आहे !


भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करणार- हार्दिक पटेल

अहमदाबाद: आज आणि उद्या रात्री भाजप इव्हीएममध्ये घोटाळा करण्याच्या तयारीत असून त्यांना गुजरातची निवडणूक जिंकायची आहे असा आरोप हार्दिक पटेलने ट्विटरद्वारे केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल सोमवारी लागणार आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव म्हणजे त्यांची नाचक्की होणार. असेही हार्दिक पटेलने म्हटले आहे. इव्हीएममध्ये घोळ करुन भाजप निवडणूक जिंकेलच असा आरोप हार्दिकने केला. जर गडबड-घोटाळा झाला नाही तर त्यांना सरासरी ८२ जागा मिळण्याची शक्यता आहे असेही हार्दिकने ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र हिमाचलमध्ये भाजप पराभूत होईल असे भाकितही त्याने केले आहे. पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यावरून हार्दिक पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे.निवडणूक प्रचारात हार्दिक पटेलची सेक्स सीडी आणून आरक्षणाच्या मिद्द्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला होता. या सार्‍या पार्श्वभूमीवर हार्दिकच्या या आरोपाने चर्चेला उअधाण आले आहे. गुजरातमध्ये नेमके काय होणार हे सोमवारीच स्पष्ट होणार. अनेक एग्झिट पोल्सनी भाजपचीच सत्ता येईल असे भाकित केले आहे.


Comments

Top