HOME   महत्वाच्या घडामोडी

विमानाची ११४ वर्षे, पंकजांना क्लीन चीट, सोनिया पुन्हा निवडणुकीत, मायाला तीन पिले, आठवलेंची भीम रथयात्रा, सीएमना आवडते चॉकलेट.....१७१२१७


विमानाची ११४ वर्षे, पंकजांना क्लीन चीट, सोनिया पुन्हा निवडणुकीत, मायाला तीन पिले, आठवलेंची भीम रथयात्रा, सीएमना आवडते चॉकलेट.....१७१२१७

* आज वेळामवस्या, पिकांनी बहरलेली शेते माणसांनी फुलणार
* राहूल गांधी यांच्या निवडीमुळे लातुरात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला जल्लोष, भरवले पेढे
* लातूर मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते १३ दिवसांपासून विना परवानगी गायब
* २०६ कोटींच्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांना मिळाली क्लीन चीट
* गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज सहा मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान, तांत्रिक बिघाडाचे कारण
* भाजप एव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करण्याच्या तयारीत, हार्दीक पटेल यांचा आरोप
* कॉंग्रेस अध्यक्षपदी विराजमान होताच राहूल गांधी यांची मोदी यांच्यावर जोरदार टीका
* भाजप देश तोडण्याचं राजकारण करतं आम्ही देश जोडण्याचं- राहूल गांधी
* राज्यातील १२ जिल्हाधिकार्‍यांना अटक करा, फ्लोराईडयुक्त पाणी प्रकरणी हरित लवादाचा आदेश
* घोटाळ्यातून कमावलेल्या संपत्तीतली छदामही नको, तेलगीच्या पत्नीची भूमिका
* भारत-श्रीलंका दरम्यान आज तिसरा अंतीम एक दिवसीय सामना
* माणसानं विमान उडवल्याच्या घटनेला आज ११४ वर्षे पूर्ण, आज अमेरिकेत राईट ब्रदर्स डे!
* राहूल गांधी यांच्या निवडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी केले अभिनंदन, म्हणाले गुजरात निवडणुकीचे एक्झीट पोल पटत नाहीत
* राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला- राधाकृष्ण विखे-पाटील
* सोनिया गांधी आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक रायबरेली मतदारसंघातून लढवणारः प्रियांका गांधी
* गुजरातमध्ये भाजप नाही तर कॉंग्रेसची सत्ता येईल, पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांचा दावा
* कुंभमेळ्यात प्लास्टीक विक्री आणि वापरावर हरित लवादाने घातली बंदी, दोषींना पाच हजार रुपयांचा दंड
* ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया वाघिणीने दिला तीन पिलांना जन्म
* ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार थांबवा, शेतकर्‍यांच्या हाती काहीच पडत नाही- नितीन गडकरी
* शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
* नगपूरच्या सरकारी दवाखान्यात आजपासून १० रुपयात दीनदयाळ थाळी, मिळणार भरपेट जेवण
* झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा आणि २५ लाखांचा दंड
* रिपाइंच्या आठवले गटाने विविध मागण्यांसाठी काढली मुंबई ते नागपूर भीमरथ यात्रा, २० तारखेला धडकणार विधानभवनावर
* कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा बसले फेरीवाले, मनसे पुन्हा करणार आंदोलन
* कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी नेमणूक विधेयक तांत्रिक अडचणीमुळे अधिवेशनात अडकले
* अधिवेशनानंतर १५ दिवसांत पुजारी नेमण्याचा वटहुकूम काढणार- चंद्रकांत पाटील, आश्वासन न पाळल्यास आंदोलन तीव्र करणार- समितीचा इशारा
* एनआयएने विनंतीसोबत आरोपपत्र सादर न केल्याने इंटरपोलचा झाकीर नाईक विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यास नकार
* जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले सातारा जिल्ह्यातील शहीद रवींद्र बबन धनावडे यांच्या कुटुंबियांना सरकार देणार साडेआठ लाख रुपयांची मदत
* ठाण्यात एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीला फ्लाइंग किस देणार्‍या मंदार जगतापला ०५ हजाराचा दंड, दंड न भरल्यास ०५ दिवसांचा तुरुंगवास, ०८ वर्षांनी लागला निकाल
* नाशिकच्या प्रदर्शानातील गांधींजींच्या सात फूट उंच व नऊ फूट लांब आकाराच्या चष्म्याच्या प्रतिकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली दखल
* मला चॉकलेट खूप आवडते, मुलगी दिवीजासोबत त्यासाठी माझे नेहमीच भांडण होते- देवेंद्र फडणवीस नागपुरात बाल साहित्य संमेलनात
* पाचशे उठाबशांची शिक्षा झालेल्या कोल्हापूरच्या विजया चौगुले या विद्यार्थ‌िनीची भेट घेतली शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी
* विजयाच्या पाठीशी सरकार असून इच्छा असल्यास तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाईल- विनोद तावडे
* मुंबईत इलेक्ट्रिक बॅटरीवरील ‘टेस्ला एक्स’ ही स्वयंचलित गाडी दाखल, देशात परवानगी नसल्याने अडीच कोटीची मोटार चालवणार चालकच
* औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दररोज वेळेवर मुबलक पाणी पुरवठा करा, महिन्यातून दोन वेळा ड्रेनेज लाईन स्वछ करा- खासदार चंद्रकांत खैरे
* पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन १४ वर्षे होऊनही २५० कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, बीड जिल्ह्यातील आठजणांचा समावेश
* नागपूरात 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल'चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सुरुवात
* शिर्डी ते पुणतांबा रेल्वेमार्गावर चितळे-कान्हेगाव भुयारी मार्गाला रेल्वेमंत्र्यांची मंजुरी- खासदार दिलीप गांधी
* निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण, अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना ०६ महिन्यांत फासावर लटकवा- दिल्ली महिला आयोग
* निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीत चालत्या बसमध्ये झाला होता अत्याचार
* अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना सहा महिन्यांत फाशीच्या तरतुदीचे विधेयक मंजूर करा- दिल्ली महिला आयोगाच्या स्वाती मालीवाल
* पीव्ही सिंधुचा दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंतिम लढत होणार जपानच्या अकेन यामागुची बरोबर


Comments

Top