HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही

६८ गावांच्या बैठकीत अभिमन्यू पवार यांची शिवसैनिकांना ग्वाही


शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही

औसा: भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसेनेला मान व सन्मान दिला जाईल. औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेना कुठल्याही पदावर, सत्तेत अर्धा वाटेकरी राहील. मी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही .शिवसेना कार्यकर्त्यांनी युतीधर्म पाळावा. मी विकास घेवून मतदारसंघात आलो आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी केले.
निलंगा तालुक्यातील कासारशिरसी येथे ६८ गावातील शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी अभिमन्यू पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार दिनकर माने यांनी शिवसैनिकांना युतीधर्म पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी एकमुखी पाठिंबा देत युतीचे अधिकृत उमेदवार अभिमन्य़ू पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. दिनकर माने यांच्यासह उमेदवार अभिमन्यू पवार, कामगार सेना अध्यक्ष शिवाजी माने, सुभाष जाधव, तालुका अध्यक्ष सतीश शिंदे, निलंगा तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, सौदागर कदम, उपस्थित होते. कासारशिरसी परिसरातील शिवसैनिकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यापूर्वी आम्हाला दिनकर माने यांची साथ होती, आताही आहे. तशीच साथ आम्हाला तुम्ही द्यावी अशी मागणी केली. याला उत्तर देताना अभिमन्यू पवार म्हणाले, औसा विधानसभा मतदारसंघातील या गावातील प्रत्येक मतदार व नागरिकांना माझी खंबीर साथ असेल. मी या भागाचा विकास करण्यासाठी आलो आहे. मी कासारशिरसीचा रहिवासी आहे. माझे मतदान पण येथेच आहे. त्यामुळे येथील प्रत्येक नागरिक हा माझा असणार आहे. या बैठकीस मयूर गबुरे, किरण कानडे, सुधीर कानडे, रामानंद हुलपल्ले, संजय बडुरे, बालाजी धुमाळ, रायप्पा मंडले, शिवाजी चव्हाण, बालाजी मरे, रवी तांबाळे यांच्यासह परिसरातील रामलिंग मुदगड, शिराढोण, हसोरी, कल्याणी माळेगाव, कलमुगळी, चिलवंतवाडी, ममदापुर, नेलवाड, शिरसी वाडीसह परिसरातील ६८ गावातील शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top