HOME   महत्वाच्या घडामोडी

आमदारांनी वाटल्या पोलचीट, मान्सून वेगात, अमित ठाकरे मैदानात, एअर इंडियाच्या वैमानिकांचे राजीनामे, भारत हिंदू राष्ट्र.....१४ ऑक्टोबर २०१९


आमदारांनी वाटल्या पोलचीट, मान्सून वेगात, अमित ठाकरे मैदानात, एअर इंडियाच्या वैमानिकांचे राजीनामे, भारत हिंदू राष्ट्र.....१४ ऑक्टोबर २०१९

* आज रात्री बसवेश्वर चौकात शिवराज पाटील चाकूरकर आणि दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत अमित देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा
* अमित देशमुख यांनी मतदारांची भेट घेऊन स्वतः केले पोलचीटचे वितरण
* लातुरमध्ये परिवर्तन अटळ- शिवाजीराव पाटील कव्हेकर
* शिवसेनेवर टीका करणार नाही, मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळू- नितेश राणे
* उध्दव ठाकरे यांच्या आज सात प्रचार सभा
* शरद पवारांना प्रसिद्धीची हाव कार्यकर्त्यांना मोठे होऊ देत नाहीत- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* अयोध्या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात
* सौरव गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याची संधी
* राहूल गांधी महाराष्ट्रातील प्रचारात त्यामुळे भाजपाचा विजय शंभर टक्के- योगी आदित्यनाथ
* शेतकर्‍यांना दोन पैसे मिळण्याची संधी आली असताना सरकारने कांदा निर्यात बंद केली- अजित पवार
* थकलेलेच एकमेकांना मदत करु शकतात, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर पंतप्रधानांची टीका
* जीएसटीमुळे कोणाला फायदा झाला, ते पंतप्रधान मोदींनी सांगावं, राहूल गांधी यांचा सवाल
* कोल्हापुरात अमित शाह यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन
* पवारांची अवस्था वाईट राष्ट्रवादीत राहायला कुणीच तयार नाही- मुख्यमंत्री
* मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरु
* भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हते, असणार नाही- असदुद्दीन ओवेसी
* भारत हिंदूंचा देश त्यामुळेच इथले मुस्लीम सुखी आहेत- मोहन भागवत
* पंतप्रधान मोदी महत्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतात- राहूल गांधी
* राजनाथसिंह, मायावती, स्मृती इराणी आज घेणार महाराष्ट्रात सभा
* मनसेच्या प्रचारासाठी अमित ठाकरेही उतरले मैदानात
* देशातील घुसखोरांना हुसकावून लावणार- अमित शाह
* पाकिस्तान दहशतवादाशी सामना करणार असेल तर भारतीय सैन्य मदत करेल- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
* ३७० कलम हटवण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न केंद्रातील भाजपा सरकारने पूर्ण केले- योगी आदित्यनाथ
* एअर इंडियाच्या १२० विमानचालकांनी दिले राजीनामे
* दिवाळीच्या तोंडावर मुंबईतल्या बेस्ट कर्मचार्‍यांची संपाची तयारी


Comments

Top