HOME   महत्वाच्या घडामोडी

मांजरा परिवाराने बदलले ग्रामीण भागाचे अर्थकारण !

युती सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली, दिलीपराव देशमुख यांचा दावा


मांजरा परिवाराने बदलले ग्रामीण भागाचे अर्थकारण !

लातूर: दुष्काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने कुठलीच मदत केली नाही. घोषणांचा पाऊस नुसता पाडला. पण अडचणीत आलेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मांजरा परिवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भक्कम आधार दिल्यामुळे शेतकऱ्यांकडे सुबत्ता आली आहे. नेहमीच मांजरा परिवार व जिल्हा मध्यवर्ती बँक या सहकारी संस्थानी या भागातील शेतकरी, शेतमजूर यांना मदत केली आहे. यालाच विकास म्हणतात असे प्रतिपादन दिलीपराव देशमुख यांनी केले. ते ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर आमदार अँड त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, जगदीश बावणे, स्वयंप्रभा पाटील, मदन भिसे, बंकटराव कदम. संभाजी सूळ, राजेसाहेब सवई, हरीराम कुलकर्णी, राजेसाहेब पाटील, किशन लोमटे, अनुसुचीत जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बबन ढगे उपस्थित होते. पुढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपा शिवसेना सरकारने दिलेली किती आश्वासन पूर्ण केली आहेत. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कुठलेही काम गेल्या पाच वर्षांत झाले नाही असे सांगून भविष्यात आपल्या भागातील विकासकामे प्राधान्याने करु असा विश्वास मतदारांना दिला. मांजरा परिवार व जिल्हा बँकेने नेहमीच शेतकरी, शेतमजूर यांना सहकार्य केले आहे. ते पुढे ही चालुच राहणार आहे.


Comments

Top