HOME   महत्वाच्या घडामोडी

नवीन वाटचालीसाठी आशिर्वाद द्यावा

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवाहन


नवीन वाटचालीसाठी आशिर्वाद द्यावा

निलंगा: मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण दिलेल्या आशिर्वादाच्या बळावर राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली. विविध खात्यांची जबाबदारी सांभाळत असताना त्या माध्यमातून निलंगा मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी खेचून आणत विकासाची कामे केली. विकासाची सुरू झालेली ही वाटचाल आगामी पाच वर्षात पुन्हा नव्याने चालू करून मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आल्याचे सांगून विकासाच्या नवीन वाटचालीसाठी आशिर्वाद द्यावा असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले. निलंगा विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ निलंगा तालुक्यातील उमरगा (हा), हाडगा, वडगाव, शिवणी (को), तुपडी, पानचिंचोली, गौर, आनंदवाडी, मुगाव, निटुर येथे जनआशिर्वाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत खा सुधाकर श्रृंगारे, विधानसभा निरिक्षक राजीव पटेल, जि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे, समाज कल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष संजय दोरवे, शिवसेनेचे अविनाश रेशमे, जि. प. सदस्य धोंडीराम बिराजदार, पं. स. सभापती अजित माने, पंचायत समिती सदस्या उर्मिला जाधव, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अ‍ॅड ज्ञानेश्वर चेवले, अंकुश लोभे, युवराज लोभे, कुमोद लोभे, अजित लोभे, उत्तम लासुने, श्रीमंत जाधव, बालाजी मोगरगे, जनार्धन सोमवंशी, अशोक शिंदे, कालिदास पाटील, सोमेश्‍वर पाटील, पंकज कुलकर्णी, वासुदेव मुगळे, शिवाजी जाधव, श्रीमंत जाधव, आयुब मुजावर आदी सहभागी झाले होते.
समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्याचे काम मागच्या पाच वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून करण्याचा ध्यास घेवून सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगत पालकमंत्री निलंगेकर यांनी मागच्या काळातील मर्यादित राहिलेला विकास लोकाभिमुख करण्याचे कामही या माध्यमातून केले. हे काम आपण दिलेल्या आशिर्वादाच्या बळावरच होवू शकले आहे. शेतकर्‍यांसह समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे काम अंतकरणातून केले असून आगामी काळातही मतदारसंघात रोजगाराची संधी प्राप्त व्हावी याकरिता उद्योग उभारणीसाठी प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. विकासाचा वेग वाढविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते असे सांगून हा वेग कायम ठेवण्याचे काम मागील पाच वर्षात केले असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी सांगितले. विकासाचा वेग वाढवितांना याचे कोणतेही राजकारण न करता विरोध करणार्‍यांनाही सोबत घेवून विकासाची वाटचाल सुरूच ठेवले असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील पाच वर्षात सुरू झालेला विकासाचा प्रवास न थांबणारा असून पुढील पाच वर्षात सुध्दा विकासाचा नव प्रवास सुरू करण्यासाठीच जनअशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतदारांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी सांगितले. आपला आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा असून या आशिर्वादाच्या बळावरच पुढील वाटचालही सुखकर होईल असा विश्‍वास व्यक्त करून मर्यादित राहिलेला विकास आगामी पाच वर्षात अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आशिर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी केले.


Comments

Top