HOME   महत्वाच्या घडामोडी

सरकारला दुखणे कळालेच नाही, भाजपाला १२२ जागा? मोदी परळीत, पाच लाख उद्योग बंद, उदयनराजेंच्या प्रचारात भिडे गुरुजी.....१७ ऑक्टोबर २०१९


सरकारला दुखणे कळालेच नाही, भाजपाला १२२ जागा? मोदी परळीत, पाच लाख उद्योग बंद, उदयनराजेंच्या प्रचारात भिडे गुरुजी.....१७ ऑक्टोबर २०१९

* अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ आज प्रकाशनगरात ज्योतिरादित्य सिंधिया यांची सभा
* माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो- दीपक सूळ
* सरकारला जनसामान्यांचे दुखणे कळलेच नाही- दिलीपराव देशमुख
* नायगाव पाडोळीत सभा चालू असताना खासदार ओमराजे निंबाळकरांवर झाला चाकू हल्ला, थोडक्यात बचावले
* आम्ही केलेल्या कामाचा होशोब जनतेसमोर मांडत आहोत- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
* लातूर जिल्ह्यात ३० गावांना टॅंकरने पाणी पुरवठा
* अहमदपूर तालुक्यात अवैध दारु नेणारी कार उत्पादन शुल्क विभागाने पाठलाग करुन पकडली
* हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबादेतील घरावर हल्ला, गाड्याही फोडल्या
* भाजपला मिळणार १२२ जागा: अंतर्गत सर्वे
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परळीत
* मुख्यमंत्री आज घेणार सहा प्रचार सभा
* शरद पवार यांच्या आज पाच सभा
* ज्योतिरादित्य सिंधीया आज सोलापुरात
* राणे जातील त्या पक्षाची वाट लागते, पाठीत वार करणार्‍यांपासून सावध रहा- उद्धव ठाकरे
* उद्धव ठाकरे यांची टीका सहन करणार नाही, योग्य वेळी बोलणार- नारायण राणे
* पुरुष गरोदर राहू शकत नाही, काहीजण गरोदर असल्यासारखे दिसतात- राज ठाकरे
* गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील ५ लाख उद्योग बंद- राज ठाकरे
* कलम ३७० प्रकरणी विरोध करणार्‍यांना लाज वाटली पाहिजे- पंतप्रधान मोदी
* १३ वर्षे सत्तेत काहीच करता न येणार्‍यांनी बांगड्या भरावात, गयारामांवर शरद पवार यांची टीका
* अयोध्या प्रकरणाचा निकाल २३ दिवसात शक्य
* मोदींच्या सभेसाठी खारघरमधील रस्ते रात्रीत झाला चकाचक!
* परळीहून परत येताना अंबाजोगाई मार्गे या, तुमच्या नेत्यांनी केलेला विकास दिसेल, धनंजय मुंडे यांचा पंतप्रधानांना सल्ला
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना घ्यावे लागतील दहा जन्म- धनंजय मुंडे
* मुख्यमंत्र्यांनी गिळले ९० हजार कोटींचे घोटाळे- धनंजय मुंडे
* पीएमसी बॅंकेचे संचालक सुरजित सिंग अरोरा यांना अटक
* पीएमसी बँकेच्या खातेदारांनी केली कोर्टाबाहेर निदर्शने
* वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाश आंबेडकर यांनी केले प्रकाशन
* निवडणुका आल्या की देशाला धोका असल्याचा कांगावा का केला जातो? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
* नागपुरात अभिनेता सनी देओल यांनी केला रोड शो
* उदयनराजे यांच्या प्रचारात उतरले संभाजी भिडे गुरुजी


Comments

Top