HOME   महत्वाच्या घडामोडी

पवारांची शिरसीत रॅली, कॉंग्रेसची आंबेडकर चौकात विराट सभा, आज दानवे लातुरात, दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद.....१८ ऑक्टोबर २०१९


पवारांची शिरसीत रॅली, कॉंग्रेसची आंबेडकर चौकात विराट सभा, आज दानवे लातुरात, दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद.....१८ ऑक्टोबर २०१९

* लातुरच्या आंबेडकर चौकातील कॉंग्रेसच्या सभेला विराट प्रतिसाद
* बहुजन समाजाने जातीयवादी भाजप सेनेला कधीही थारा दिला नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका, दिलीपराव देशमुख यांचे आवाहन
* आज सकाळी अमित देशमुख यांची हरंगुळ येथे सभा, सावेवाडीत निवृत्त कर्मचार्‍यांची बैठक, रात्री मुरुड येथे सभा
* औसा भाजपाला का दिला? शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे
* शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ आज लातुरच्या मार्केट यार्डात रावसाहेब दानवे यांची सभा, शिरुर अनंतपाळमध्ये संभाजीरावांसाठी सभा
* अभिमन्यू पवार यांनी काढली कासारशिरसीत रॅली
* निलंग्यात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारणार, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची ग्वाही
* औसा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पपत्राचे प्रकाशन
* ७० वर्षात आम्ही काय केले हे सांगण्यासाठी निवड्णूक प्रचाराचे दिवसही कमी पडतील- शिवराज पाटील चाकूरकर
* टपाल कर्मचाऱ्यांचे घोषित आंदोलन मागे
* लंगोट बांधा आणि आखाड्यात उतरा, बघू कोण जिंकतं ते! अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
* कॉंग्रेस सावरकर विरोधी नाही पण काही विचारांबाबत विरोध- माजी पंतप्रधान मनमोहनसिंग
* आज मोदी, शाह आणि गडकरींच्या सभा
* २०१९ मध्ये दोन हजाराची एकही नोट छापली नाही
* दोन हजाराच्या नोटा पुन्हा छापणार की नाही याचा खुलासा नाही
* अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल, नियमित तपासणी असल्याचा सुत्रांचा दावा
* अमिताभ बच्चन यांना विश्रांतीचा सल्ला, यकृताचा आजार असल्याची चर्चा
* मुंबईची मेट्रो मराठी माणसाला मुंबई बाहेर काढेल- राज ठाकरे
* उदयनराजे यांच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून कुणीच तयार नव्हते- पंतप्रधान
* विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कृती केल्याप्रकरणी काँग्रेसमधील १५ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
* सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगांचा अपमान- कन्हैया कुमार
* शरद पवार यांच्या पायाला दुखापत
* सुनील तटकरे शिवसेनेत येण्यासाठी संपर्कात- अनंत गिते
* मुंबईतल्या बीकेसी मैदानावर आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत संध्याकाळी महायुतीची सभा
* शरद पवार यांच्या आज चार प्रचार सभा
* मुख्यमंत्री फडणवीस, राज ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदे, उद्धव ठाकरे यांच्या आज विविध ठिकाणी सभा
* पेट्रोल आणि डिझेलवर महाराष्ट्रात सर्वाधिक करवसुली- राज ठाकरे
* जनतेचा लुटलेला पैसा परत येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही- पंतप्रधान
* माझ्यामुळेच भाजपमध्ये सर्वात आधी मेगाभरती सुरू झाली- पंकजा मुंडें
* बहुभाषीय ब्राह्मण महासंघाचा भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा
* बीएसएनएल कंपनीतील कर्मचार्‍यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार थकला, दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता


Comments

Top