HOME   महत्वाच्या घडामोडी

औशाचे बजरंग जाधव भाजपातून निलंबित

जाधव निराधार! अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांचा दावा


औशाचे बजरंग जाधव भाजपातून निलंबित

औसा: औसा विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे बजरंग जाधव यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातून हकालपट्टी झाल्यामुळे बजरंग जाधव निराधार झाले असून त्यांच्या उमेदवारीला अर्थच उरलेला नाही असं पवार म्हणतात.
औसा विधानसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या नावाची उमेदवार म्हणून मागील दोन वर्षांपासून चर्चा होती. अभिमन्यू पवार यांनी या कालावधीत मतदारसंघाच्या विकासासाठी जवळपास तिनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. आजवर मागास असणारा मतदारसंघ विकासाच्या पटरीवर आणला. त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने उमेदवारीचे दावेदार होते. महायुतीने अपेक्षेनुसार त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. आजवर केलेली विकास कामे आणि महायुतीची वज्रमूठ पाहता पवार यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले असं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Comments

Top