HOME   महत्वाच्या घडामोडी

बंधारे भरले, अचानक एवढे मतदार आले कुठून? एमआयएम-राष्ट्रवादीची हाणामारी, हत्तीवरुन मतदान, भुजबळ कुटुंबियांनी मतदानच केलं नाही.....२२१०१९


बंधारे भरले, अचानक एवढे मतदार आले कुठून? एमआयएम-राष्ट्रवादीची हाणामारी, हत्तीवरुन मतदान, भुजबळ कुटुंबियांनी मतदानच केलं नाही.....२२१०१९

* लातुरचे साई, नागझरी बंधारे भरले, मांजराचेही पाणी वाढले
* लातूर जिल्ह्यात सुमारे साठ टक्के मतदान
* लातुरच्या पंचायत समिती आणि नूतन शाळेच्या मतदान केंद्रात उशिरापर्यंत चालले मतदान, बाचाबाची आणि गोंधळ
* मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात शोकडोंनी मतदार अचानक कसे आले? सगळ्यांनाच कोडे
* लातूर शहर मतदारसंघात ५२ टक्के आणि ग्रामीणमध्ये अंदाजे ६० टक्के मतदान
* औरंगाबादेत खा. इम्तियाज जलील यांना धक्काबुक्की, राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यात हाणामारी
* कॉंग्रेसने इव्हीएमच्या केल्या २२१ तक्रारी
* मतदान संपेपर्यंत सोशल मिडियावर अप्रत्यक्ष प्रचार सुरुच होता!
* पंजाब महाराष्ट्र बॅंकेचे ठेवीदार आज मुंबईत काढणार मोर्चा
* जळगावात मतदानासाठी मतदार एक जोडपं आलं हत्तीवरुन, पोलिस हतबल
* अनेकांनी काढला हत्तीसोबत सेल्फी
* महाराष्ट्रात ६०.४६ टक्के तर हरयाणात ६२ टक्के सरासरी मतदान
* महाराष्ट्रात होणार परिवर्तन, शरद पवार यांना आशा
* भुजबळ कुटुंबीय, अमिताभ बच्चन यांनी मतदान केलंच नाही
* मुंबईच्या आरेतील झाडे तोडून किती झाडे तोडली याचा तपशील आणि फोटो मागवले सुप्रीम कोर्टाने
* पाचही एक्झीट पोल दाखवतात महायुतीचे बहुमत
* आमची लढत थेट भाजपासोबत- प्रकाश आंबेडकर
* सरकारने आता मतदानाची सक्तीच करायला हवी- नाना पाटेकर
* मतदान सुरु असताना दोन कर्मचार्‍यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


Comments

Top