HOME   महत्वाच्या घडामोडी

नाद करायचा नाही- अभिमन्यू पवार, सेना गेली साठीवर, आव्हाड विरोधी पक्षनेते? वाघ गवत खात नाही, २६४ आमदार कोट्यधीश.....२७ ऑक्टोबर २०१९


नाद करायचा नाही- अभिमन्यू पवार, सेना गेली साठीवर, आव्हाड विरोधी पक्षनेते? वाघ गवत खात नाही, २६४ आमदार कोट्यधीश.....२७ ऑक्टोबर २०१९

* लातुरातील उर्वरीत भागात दिवाळीनंतर यावयाचे पाणी दिवाळीतच येणार, विक्रांत गोजमगुंडे यांनी केली होती मागणी
* लातुरच्या आदर्श मैत्री फाऊंडेशनने तिनशे गरिब कुटुंबांना केले फराळाचे दिवाळी वाटप
* औसा मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार- आ. अभिमन्यू पवार
* आम्हाला कुणाच्या नादाला लागायचे नाही पण आमचा नाद करायचा नाही- आ. अभिमन्यू पवार
* आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करु नका, गय करणार नाही- आ. अभिमन्य़ू पवार
* लातूर जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसाने पिकांसह मातीचेही नुकसान
* लातुरात स्थलांतरीत झालेल्या भटक्या, गरीब कुटुंबांसोबत वसुंधरा प्रतिष्ठान साजरी करतंय पाच दिवस दिवाळी
* जायकवाडी धरणातून विसर्ग सुरुच, गोदावरीलाही पूर, नांदेड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
* नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने केले चारशे कोटींच्या द्राक्षांचे नुकसान
* आ. बच्चू कडू यांच्यासह चार आमदारांनी दिला शिवसेनेला पाठिंबा, सेनेचे संख्याबळ गेले साठवर
* भाजपा सर्वात मोठा पक्ष, मुख्यमंत्रीही आमचाच: भाजपाची भूमिका
* शिवसेनाही अडली मुख्यमंत्रीपदासाठी
* सत्ता प्राप्त करण्यासाठी आमच्याकडे इतरही पर्याय आहेत, तशी वेळ येऊ देऊ नका, उद्धव ठाकरेंचा इशारा
* उद्धव ठाकरे यांच्या श्रीमतींनी केले आमदारांचे औक्षण
* मूळ शिवसेना भक्कम करा, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
* आघाडी विरोधकाची भूमिका करण्यावर ठाम, शरद पवारांची भूमिका
* आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा
* वाघ कितीही भुकेला असला तरी गवत खात नाही- सुधीर मुनगंटीवार
* उन्मादानं वागणार्‍यांचा उदयनराजे होतो- खा. संजय राऊत
* महाराष्ट्र विधानसभेतील २८८ पैकी २६४ आमदार कोट्यधीश
* सुप्रिया सुळे यांनी पतीसह घेतले विठ्ठलाचे दर्शन, अजित पवारांबाबत बोलण्यास नकार
* महाराष्ट्रात सोने खरेदीला अल्प प्रतिसाद
* अयोध्या आणि शरयू नदीच्या तटावर ०६.११ लाख दिव्यांची रोषणाई
* भाजपाचे नेते मनोहरलाल खट्टर घेणार आज हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
* अयोध्या प्रकरणी संयम बाळगावा, पंतप्रधानांचे आवाहन
* भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या, कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांची मागणी
* भारत आणि बांगलादेशच्या जवानांनी केलं मिठाईचं आदान प्रदान
* अमेरिकेतली एक बेपत्ता मुलगी सापडली पॉर्न साईटवर, अपहरणकर्त्याला अटक
* अमेरिकेच्या हल्ल्यात आयसीसचा म्होरक्या बगदादी मारला गेल्याची शक्यता


Comments

Top