HOME   महत्वाच्या घडामोडी

३० टन सोन्याची विक्री, भाजपा सत्तेत येतेच कशी? मोदींना पाकचा हवाई मार्ग बंद, आयसीसच्या बगदादीचा खातमा.....२८ ऑक्टोबर २०१९


३० टन सोन्याची विक्री, भाजपा सत्तेत येतेच  कशी? मोदींना पाकचा हवाई मार्ग बंद, आयसीसच्या बगदादीचा खातमा.....२८ ऑक्टोबर २०१९

* निलंगा तालुक्यातील कोल्हापुरी बंधार्‍यांच्या २४ लोखंडी दरवाजांची चोरी
* अहमदपुरात आ. बाबासाहेब पाटील यांनी केली शेतीच्या नुकसानीची पाहणी
* नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडले, गोदावरी पूरस्थितीत
* धनत्रयोदशीच्या निमित्ताने ३० टन सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज
* संभाजी पाटील यांनी घेतली शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट, उपचारासाठी मुंबईला येण्याची केली विनंती
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर
* पंतप्रधानांच्या सौदी दौर्‍यासाठी हवाई मार्ग वापरण्यास पाकिस्तानचा नकार
* भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत
* सत्तेसाठी अनेक पर्याय आहेत, तशी वेळ येऊ देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा इशारा
* भाजपा एकटेच सरकार कसे सरकार स्थापन करते ते पाहू- खा. संजय राऊत
* माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले सर्वांत गरीब आमदार!
* औरंगाबादहून हैदराबादसाठी स्पाईस जेटची विमानसेवा सुरू
* बंडखोरीमुळे जागा घटल्या, चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
* जम्मू काश्मीरच्या राजौरी भागात पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी
* हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे मनोहरलाल खट्टर यांनी घेतली शपथ, दुसर्‍यांदा संधी
* मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात शत्रुत्वाची भावना संपवा
* अ. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
* अयोध्येत चार लाख १० हजार दिव्यांची आरास, पर्यटन विभागाचा गिनीज विक्रम
* पुढच्या पाच वर्षात युतीचं स्थिर सरकार देऊ- देवेंद्र फडणवीस
* कोकणात क्यार वादळाची तीव्रता येत्या २४ तासांत वाढणार, तटरक्षक दलाने वाचवले मच्छीमाराला
* ‘बाप बापच असतो’ शरद पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची कोल्हापुरात पोस्टरबाजी
* अमित शाह घेणार उद्धव ठाकरे यांची भेट
* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक
* आयसिसचा प्रमुख बगदादीचा झाला खातमा, अमेरिकन अध्यक्षांची घोषणा


Comments

Top