HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. देशमुखांची व्यापारी भेट, संधी दवडू नका आदित्यंना सल्ला, पंकजा पुन्हा मंत्री? शिल्पाच्या नवर्‍याची इडी चौकशी.....२९ ऑक्टोबर २०१९


आ. देशमुखांची व्यापारी भेट, संधी दवडू नका आदित्यंना सल्ला, पंकजा पुन्हा मंत्री? शिल्पाच्या नवर्‍याची इडी चौकशी.....२९ ऑक्टोबर २०१९

* आ. अमित देशमुख भेटले लातुरातील किराणा व्यापार्‍यांना, व्यापार्‍यांनी केला सत्कार
* बाजारपेठेतील दिवाळीच्या उलाढालीची आ. देशमुख यांनी घेतली माहिती
* संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा आदित्य ठाकरेंना सल्ला
* कर्ज न फेडल्याने धनंजय मुंडे यांचा पुण्यातील फ्लॅट बॅंकेने केला जप्त
* दैनिक सामनामधून टीका बंद होईपर्यंत शिवसेनेशी चर्चा करणार नाही, भाजपाचा पवित्रा
* सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला पर्याय निवडण्यास भाग पाडू नका, सेनेच्या संजय राऊतांचा भाजपाला इशारा
* पराभव होऊनही पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
* भाजपात बाहेरुन आलेल्यांना न्याय मिळतो, मलाही मिळेल- एकनाथ खडसे
* एकनाथ खडसे लिहिणार आत्मचरित्र
* शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्यासाठी उप मुख्यमंत्रीपद स्विकारावे- रामदास आठवले
* बीड आणि जालना जिल्ह्यात गारपीट
* मुंबईत दिवाळीत ध्वनी प्रदूषण घटले, सर्वात शांत दिवाळी, जनतेचा फटाक्यांवर कंट्रोल
* पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात, तेल, वायू, ऊर्जा आणि नागरी उड्डाणासह १२ करार होण्याची शक्यता
* तामिळनाडूत बोअरवेलमध्ये अडकलेल्या दोन वर्षीय बालकाचा मृत्यू
* अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांची ०४ नोव्हेंबर ईडी चौकशी
* पी. चिदंबरम यांना एम्स रुग्णालयातून सुटी, पुन्हा तुरुंगात रवानगी
* अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी दिला भाजपला पाठिंबा
* धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ३० हजार किलो सोन्याची विक्री
* अभिनेता ऋषी कपूर दिवाळी पार्टीनंतर भडकले मिडियावर, म्हणाले शोर मत मचाव!
* अतिरेकी आयसिसचा म्होरक्या बगदादी ठार, त्याच्या निकटच्या सहकार्‍यानेच दिली होती अमेरिकेला त्याची माहिती


Comments

Top