HOME   महत्वाच्या घडामोडी

नगरसेविकेने दिले स्वच्छता कर्मचार्‍यांना कपडे, अनिल कपूर मुख्यमंत्री? कांदा साडेचार हजारावर, व्हाट्सअ‍ॅपला नोटीस, व्होडाफोन गाशा गुंडाळण्याची शक्यता.....०१ नोव्हेंबर २०१९


नगरसेविकेने दिले स्वच्छता कर्मचार्‍यांना कपडे, अनिल कपूर मुख्यमंत्री? कांदा साडेचार हजारावर, व्हाट्सअ‍ॅपला नोटीस, व्होडाफोन गाशा गुंडाळण्याची शक्यता.....०१ नोव्हेंबर २०१९

* २१ नोव्हेंबर रोजी लातुरच्या नव्या महापौरांची निवड
* लातुरच्या संगमेश्वर बोमणे यांनी आणली पहिली ‘ट्री अंब्युलन्स’, झाडांना जीवदान देण्याचा प्रयत्न
* लातुरच्या काही भागात प्रशासनाने केली नुकसनग्रस्त सोयाबीनची पाहणी
* लातुरच्या नगरसेविका वर्षा कुलकर्णी यांनी सफाई कर्मचार्‍यांना दिले संपूर्ण पेहराव
* कांद्याचे दर पोचले साडेचार हजार रुपयांवर
* शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, शिवसेना नेत्यांचे राजयपालांना साकडे
* सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता
* कॉंग्रेसही शिवसेनेला सोबत घेण्यास अनुकुल, प्रस्ताव दिल्लीकडे
* राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसते- अजित पवार
* कुणीही मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा बांधून आलेलं नाही- उद्धव ठाकरे
* राज्यात ०७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
* आजपासून बदलणार बॅंकांच्या वेळा
* एसबीआय करणार ठेवींवरील व्याजात बदल
* शरद पवार आणि धनंजय मुंडे करणार मराठवाड्यातील शेती नुकसानीची पाहणी
* उद्धव ठाकरेही येणार मराठवाड्याच्या दौर्‍यावर, नुकसानग्रस्त शेतीची करणार पाहणी
* ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचं मुंबईत निधन
* ट्वीटरने घातली राजकीय जाहिरातींवर बंदी
* व्हाट्सअ‍ॅपचा वापर हेरगिरीसाठी झाल्याचा संशय, सरकारने दिली नोटीस
* अयोध्या प्रकरणी हिंदू-मुस्लीम मुद्यावर राजकारण केलं जातंय- न्यायमूर्ती बोबडे
* दर स्पर्धेमुळं व्होडाफोन प्रचंड नुकसनीत, भारतातील गाशा गुंडाळण्याची शक्यता
* महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता, राज्यपालांचे संकेत
* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारांची बैठक
* भाजप-सेनेच्या मित्रपक्षांनी मागितली चार मंत्रीपदे
* तुमचा तुम्हीच तोडगा काढा, अमित शाहांचा सल्ला, मुंबई दौरा रद्द
* सेना-भाजपचं ठरत नाही तोपर्यंत अभिनेता अनिल कपूरला करा मुख्यमंत्री! सोशल मिडियावर मागणी
* अनिलकपूर नायक नावाच्या सिनेमात झाला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री, घेतले होतले महत्वाचे अनंत निर्णय
* नवाजुद्दीन सिद्दीकी येणार मराठी चित्रपटात
* पाकिस्तानात धावत्या रेल्वेला आग, ७३ जणांचा मृत्यू


Comments

Top