HOME   महत्वाच्या घडामोडी

विधानसभेत जाण्याची हॅट्ट्रीक

मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित देशमुख यांचे केले स्वागत


विधानसभेत जाण्याची हॅट्ट्रीक

मुंबई: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठया मताधिक्यांने तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रीक केली. या बद्दल कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वागत केले. पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
मुंबईतील टिळक भवन येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मताधिक्याने विजयी झाल्याबददल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच विधानसभा निवडणुकीकरीता राबविलेले जनसंपर्क अभियान, केलेल्या कामाची वचनपुर्ती आणि आगामी काळात करावयाच्या विकासकामांचा वचननामा या आमदार अमित देशमुख यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. विधानसभा निवडणूक २०१९ करीता मराठवाडा विशेषत: लातुरमध्ये काँग्रेस पक्षाला उभारीची गरज होती. या कठीण काळात लातुर शहर मतदारसंघासह लातुर जिल्हयात काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिददीने काम करून चांगले यश मिळवले आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी विरोधी बाकावर असताना पाच वर्षे विधानसभेचे सभागृह, रस्त्यावरील आंदोलने, निवेदने देवून सर्व माध्यमातुन लातुरकरांचे प्रश्न मांडून सोडविण्याचे प्रयत्न केले. विधानसभा निवडणुक काळात जनसंपर्क अभियानाअंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी, पदयात्रा, मेळावा, विविध समाजाच्या बैठका, भेठीगाठी माध्यमातुन साधलेला जनसंपर्क, सभाचे नियोजन करून कोणावरही आरोप प्रत्यरोप न करता लोकशाहीला धरून लातुरच्या परपंरेला साजेसा प्रचार केला. यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्याने विजय झाला. या सर्व प्रचार उपक्रमाचे कौतुक काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी केले असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Comments

Top