HOME   महत्वाच्या घडामोडी

डोकी फोडू-तंगड्या तोडू, शिवसेना-राष्ट्रवादी घेणार अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, उद्या नव्या आघाडीची घोषणा, सव्वा लाख टन कांद्याची आयात.....२१ नोव्हेंबर २०१९


डोकी फोडू-तंगड्या तोडू, शिवसेना-राष्ट्रवादी घेणार अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, उद्या नव्या आघाडीची घोषणा, सव्वा लाख टन कांद्याची आयात.....२१ नोव्हेंबर २०१९

* सोलापूर जनता बॅंकेचे संचालक सदाशिवराव दाते यांचे निधन, लातुरच्या मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
* फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषध विक्री करणार्‍या लातूर जिल्ह्यातील ३७ औषध विक्रेत्यांवर कारवाई
* लातुरच्या खाडगाव परिसरातील तात्पुरत्या कोंडवाड्यातील जनावरे गेली पळून!
* गोंधळी समाजाचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांचा लातुरात निषेध
* शिवसेनेचे आमदार फोडणार्‍यांची डोकी फोडू, तंगड्याही तोडू- आ. अब्दुल सत्तार
* मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीनंत संजय राऊत यांची स्पष्टोक्ती
* हम बुरे ही ठीक है, जब अच्छ थे तब कौनसा मेडल मिल गया था? संजय राऊत यांचे ट्वीट
* शिवसेना आणि राष्ट्रवादी घेणार अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद
* शिवसेना-आघाडीच्या नव्या आघाडीची घोषणा उद्या शुक्रवारी होणार
* पेढ्यांची ऑर्डर गेली आहे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे देतील गोड बातमी- संजय राऊत
* शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पाऊण तास बैठक
* पाचजणांचं केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात, शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार
* दिल्लीत आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांची बैठक
* देशभरातील आधार केंद्र सातही दिवस सुरु होणार
* चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची महिनाभरात नियुक्ती
* एमटीएनएलच्या १३५०० कर्मचार्‍यांनी केली स्वेच्छा निवृत्तीची मागणी
* १०० व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड
* लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, उद्धव ठाकरे यांनीही केली विचारपूस
* घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना तीन महिन्यांचा जामीन मंजूर
* केंद्र सरकार १.२ लाख टन कांदा आयात करणार
* राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
* ‘तान्हाजी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, काही दृष्ये आणि संवादांवर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप
* कोल्हापुरात ऊस दराचे आंदोल चिघळले, कर्नाटकात ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवला
* डिसेंबरमध्ये जिओही वाढवणार कॉल दर
* पालघरमधील जनतेचा बुलेट ट्रेनला विरोध
* मराठवाड्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलची फोर जी सेवा सुरु


Comments

Top