HOME   महत्वाच्या घडामोडी

आज महापौरांची निवड, नळांच्या मीटर्ससाठी जल परिषद, पवार-ठाकरे यांची बैठक, दोन दिवसात सरकारचा दावा, ठाकरेंनी व्हावं मुख्यमंत्री.....२२ नोव्हेंबर २०१९


आज महापौरांची निवड, नळांच्या मीटर्ससाठी जल परिषद, पवार-ठाकरे यांची बैठक, दोन दिवसात सरकारचा दावा, ठाकरेंनी व्हावं मुख्यमंत्री.....२२ नोव्हेंबर २०१९

* लातुरच्या महापौर आणि उप महापौरांची आज निवड
* शेलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, देवीदास काळे महापौरपदाच्या स्पर्धेत
* सकाळी हॉटेल अरोमात भाजपा नेते आणि नगरसेवकांची बैठक
* भाजपाकडे ३५, कॉंग्रेसकडे ३३ तर एक वंचितचा नगरसेवक
* नगरसेवकांची फोडाफोड होऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत चालली नगरसेवकांची बैठक
* भाजपाने आपल्या नगरसेवकांसाठी काढला व्हीप
* लातुरात नळांना मीटर्स बसवण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी जल परिषद
* उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची रात्री उशिरा तासभर झाली बैठक
* संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, अजित पवारही होते उपस्थित
* दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार स्थापनेसाठी दावा केला जाणार
* उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळावं, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह
* राष्ट्रवादीलाही हवे मुख्यमंत्रीपद- सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड
* चार आमदारांमागे एक मंत्रीपद देण्याचा ठरला फॉर्म्युला
* बाळासाहेब थोरात होऊ शकतात उप मुख्यमंत्री
* नव्या आघाडीच्या सरकारचा संसार नीट चालावा यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करणार
* शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अनैसर्गिक, बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातली- रामदास आठवले
* महाविकास आघाडीचं सरकार टिकेल १५ वर्षे- जयंत पाटील
* उद्या कोल्हापुरच्या जयसिंगपुरात उद्या ऊस परिषद
* केंद्राचे पथक करणार धुळे, चंद्रपूर आणि अमरावतीच्या नुकसाग्रस्त शेतीची पाहणी
* सवाई भीमसेन संगीत महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात
* ज्येष्ठ संपादक, नवाकाळकार नीलकंठ खाडिलकर यांचे निधन
* एक डिसेंबरपासून जिओ, आयडिया, व्होडाफोन वाढवणार कॉलींगचे दर
* विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी तीन आसनी रिक्षांना आता परवानगी नाही
* परदेशातूनही परदेशातूनही अर्ज करता येणार
* साध्वी प्रज्ञासिंह यांची संरक्षण सल्लागारपदी नियुक्ती
* चिदंबरम यांची तिहार कारागृहात होणार इडीकडून चौकशी
* पाकिस्तानात टोमॅटो पोचला ४०० रुपयांवर
* नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून जमला पाचशे कोटींवर दंड
* कोल्हापुरात ऊस आंदोलन चिघळले, एक ट्रॅक्टर पेटवला, सहा ट्रॅक्टर्सची सोडली हवा, ऊस वाहतूक रोखली
* वादग्रस्त स्वयंघोषित बाबा स्वामी नित्यानंद विदेशात पसार


Comments

Top