HOME   महत्वाच्या घडामोडी

पवार, सरकार, घातवार, शनिवार!

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे अजित पवार उप मुख्यमंत्री


पवार, सरकार, घातवार, शनिवार!

मुंबई: कॉंग्रेस आणि शिवसेनेला चर्चात गुंतवून राष्ट्रवादीने भाजपाशी घरोबा केला. राज्यपालांनी दिल्ली दौरा रद्द करीत सकाळी राजभवनात शपथविधी सोहळा घेतला. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. अजित पवारांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कॉंग्रेस आणि शिवसेना आता प्रचंड अडचणीत आली आहे. तीन पक्षांचं खिचडी सरकार नीट काम करु शकत नाही हे लक्षात आल्यानं राष्ट्रवादीची सोबत घेतली. आमचं हे सरकार पाच वर्षे उत्तम चालेल. महाराष्ट्रानं महायुतीला जनादेश दिला होता. पण शिवसेना दुसर्‍यांसोबत गेल्यानं राष्ट्रपती राजवट लागू झाली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मागच्या महिनाभरापासून कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठका सुरु होत्या. त्यातून फारसं काही निष्पन्न होत नव्हतं. अनेकांच्या अनेक अपेक्षा होत्या, वाढत होत्या, ही महाविकास आघाडी नीट काम करु शकणार नाही याचा अंदाज आला होता. महाराष्ट्राला स्थिर सरकार देणे आवश्यक होते, तिघांचे जमत नाही तर दोघांचे चांगले चालू शकते ही बाब लक्षात आल्याने हा निर्णय घेतला असं अजित पवार सांगतात.
पुढे काय?
काहीही समर्थनं करा पण विचारांवर श्रद्धा ठेवणार्‍या मतदारांना भाजप-राष्ट्रवादी आघाडी मंजूर होऊ शकत नाही. महायुतीला जनादेश असताना शिवसेना बाजुला जाते हेही मतदारांना मान्य नाही. ज्या शिवसेनेशी कधीच नाळ जुळली नाही त्या कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणे जाणत्या नागरिकांना रुचत नाही. आता आगामी काळात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचेही मोठे नुकसान होणार अशी अटकळ राजकीय तज्ञ लावत आहेत!


Comments

Top