HOME   महत्वाच्या घडामोडी

जयंत पाटील गटनेते, आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, बहुमत चाचणीवर निर्णय, भाजपाचे नेते वेडे होतील, भाजपासोबत जाण्याचा निर्णय आधीच.....२६ नोव्हेंबर २०१९


जयंत पाटील गटनेते, आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, बहुमत चाचणीवर निर्णय, भाजपाचे नेते वेडे होतील, भाजपासोबत जाण्याचा निर्णय आधीच.....२६ नोव्हेंबर २०१९

* लातूर जिल्ह्यात ५६ टक्के रबीची पेरणी पूर्ण
* लातूर जिल्हा न्यायालयात आज संविधान गौरव दिनाचे आयोजन
* २६/११ च्या हल्ल्याला अकरा वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून शहिदांना श्रद्धांजली
* अजित पवार हॉटेल ट्रायडंटमध्ये दाखल, कुणाला भेटणार याचे कुतुहल
* सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता
* आजच विधानसभेतील बहुमत चाचणीवर निर्णय होण्याची शक्यता
* विधानसभेच्या हंगामी अध्यक्षाची नेमणूक होण्याची शक्यता
* जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे अधिकृत गटनेते, विधीमंडळ सचिवांनी केले जाहीर
* महा विकास आघाडीने केला सत्ता स्थापनेचा दावा, अपक्षांसह १६२ आमदारांनी केल्या सह्या
* अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्यांवरील चौकशी थांबवली, नऊ प्रकरणाच्या फायली झाल्या बंद
* शिवसेनेच्या चार खासदारांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
* महा विकास आघाडीच्या बैठकीला केवळ १३० आमदार उपस्थित होते, शिवसेनेचे अधिक आमदार गैरहजर होते- नारायण राणे
* सत्ता न मिळाल्यास भाजपाचे नेते वेडे होतील, वेड्यांची नवी रुग्णालये उभारावी लागतील- संजय राऊत
* संजय राऊतांनाच वेड्याच्या इस्पितळात भरती करण्याची गरज- रावसाहेब दानवे
* मुख्यमंत्र्यांनी घेतली अधिकार्‍यांची बैठक, अजित पवार अनुपस्थित
* अजित पवारांना व्हीप काढण्याचा अधिकार नाही- शरद पवार
* अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते, त्यांचाच व्हीप चालणार- भाजपा
* अजित पवारांशी सकारात्मक बोललो, पुढची बैठक लवकरच- जयंत पाटील
* अजित पवार म्हणतात भाजपासोबत जाण्याचा निर्णय आधीच झाला होता, आता मला तोंडघशी पाडलं जातंय!
* भाजपासोबत जाण्याआधी अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता- शिवसेना
* राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी फडणवीस सरकारने जाहीर केली ०५,३८० कोटी रुपयांची मदत
* झी एंटरटेन्मेंटचे अध्यक्ष सुभाषचंद्रा यांनी दिला राजीनामा
* शशी थरुरांनी तिहार जेलमध्ये घेतली पी. चिदंबरम यांची भेट
* वेदनाशामक तेलाच्या खोट्या जाहिरातीसाठी न्यायालयाने ठोठावला अभिनेता जॅकी श्रॉफ आणि गोविंदाला दंड


Comments

Top