HOME   महत्वाच्या घडामोडी

आमदारांचा शपथविधी, सरकारची बहुमत परिक्षा, मित्राने दिला दगा शत्रुने दिला आधार, शपथविधीचे शहांना निमंत्रण, बहुमत चाचणी लाईव्ह.....२७ नोव्हेंबर २०१९


आमदारांचा शपथविधी, सरकारची बहुमत परिक्षा, मित्राने दिला दगा शत्रुने दिला आधार, शपथविधीचे शहांना निमंत्रण, बहुमत चाचणी लाईव्ह.....२७ नोव्हेंबर २०१९

* अजित पवार, देवेंद्र फडनवीस पोचले विधान भवनात
* उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
* आज नवनिर्वाचित आमदारांचा होणार शपथविधी
* शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदार निघाले विधानभवनाकडे
* दिल्लीत जाऊन मोठ्या भावाला भेटणार, सोनिया गांधींचे आभार- उद्धव ठाकरे
* ३० वर्षांच्या मित्राने दगा दिला पण ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांनी मला आधार दिला- उद्धव ठाकरे
* काल रात्री सव्वानऊ वाजता अजित पवार धावत धावत पोचले शरद पवार यांच्या निवासस्थानी
* अजित पवारांना राष्ट्रवादीत आणण्याचे प्रयत्न करावेत, शरद पवार यांनी परवानगी द्यावी- छगन भुजबळ
* भाजपासोबत जाऊन शिवसेना बिघडली होती- नवाब मलिक
* कुणाचे कोण किती मंत्री अद्याप ठरले नाही
* भावी उप मुख्यमंत्री म्हणून माझी चर्चा घडवली, माध्यमांचे आभार- बाळासाहेब थोरात
* विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती
* देवेंद्र फडणवीसांनी सोपवला राज्यपालांकडे राजीनामा
* बहुमत नसल्याने राजीनामा देत आहे- देवेंद्र फडणवीस
* अजित पवारांनी राजीनामा सोपवला देवेंद्र फडणवीसांकडे
* अयोध्या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही- सुन्नी वक्फ बोर्ड
* बहुमत चाचणीचं होणार लाईव्ह टेलिकास्ट
* आजच होणार नव्या सरकारची बहुमत चाचणी
* अजित पवार मंत्रीमंडळात असतील, प्रफुल्ल पटेल यांचे संकेत
* आजपासूनच सुरु होणार विधीमंडळाचे हंगामी अधिवेशन
* देवेंद्र फडणवीस असतील विरोधी पक्षनेते
* उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला अमित शहा यांनाही निमंत्रण देणार- संजय राऊत


Comments

Top