HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर करु दुष्काळमुक्त, आज शपथविधी, कॉंग्रेसला १२ मंत्रीपदे, बच्चन-दिक्षित-भोसलेंना निमंत्रण, जयंत पाटील उप मुख्यमंत्री....२८ नोव्हेंबर २०१९


लातूर करु दुष्काळमुक्त, आज शपथविधी, कॉंग्रेसला १२ मंत्रीपदे, बच्चन-दिक्षित-भोसलेंना निमंत्रण, जयंत पाटील उप मुख्यमंत्री....२८ नोव्हेंबर २०१९

* भरधाव वाहन चालवणे रोखण्यासाठी लातूर पोलिसात विशेष व्हॅन दाखल
* लातुरच्या विकासाची विस्कटलेली घडी नीट बसवू- महापौर गोजमगुंडे, उप महापौर बिराजदार
* लातूर बाजार समितीत सोयाबीनसाठी तारण योजना सुरु
* लातूर तालुक्यात १३ हजार शेतकर्‍यांच्या खात्यांवर अतिवृष्टीचे अनुदान वर्ग
* लातूर संपूर्ण दुष्काळमुक्त करुन दाखवू- आ. धीरज देशमुख
* लातूर शहरासाठी स्वतंत्र जल धोरण राबवणार- जिल्हाधिकारी
* आज शिवाजी पार्कवर साडेसहा वाजता भव्य सोहळ्यात उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
* उप मुख्यमंत्री आणि काही मंत्रीही घेणार शपथ
* स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
* महाराष्ट्रातून शेतकर्‍यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण, बैठकीची खास व्यवस्था
* अमिताभ बच्चन, माधुरी दिक्षीत, आशाताई भोसले यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
* उप मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित
* विधानसभेच्या पाच वर्षांच्या अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा
* कॉंग्रेसला १२ मंत्रीपदे आणि विधानसभा अध्यक्षपद मिळेल- अशोक चव्हाण
* आदित्य ठाकरे यांनी सोनिया गांधी, मनमोहनसिंग यांना प्रत्यक्ष भेटून दिले शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
* सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले- एकनाथ खडसे
* भाजपाला दूर ठेवण्यासाठी स्थानिक निवडणुकातही होणार महा विकास आघाडी
* आम्ही गोळा बारुद घेऊन तयार आहोत, विधीमंडळात उत्तरं द्यावी लागतात, मातोश्रीत बसून आदेश सोपे असते- नितेश राणे
* रेल्वेला १९ हजार ४१२ कोटीचा तोटा, प्रवासी भाड्यात होणार वाढ
* राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता
* नथूराम गोडसे देशभक्त- साध्वी प्रज्ञासिंह
* कार्टोसॅट तीन उपग्रहाचं श्रीहरीकोटातून यशस्वी प्रक्षेपण
* काश्मीरातील दहशतवादी कारवाय जवळपास संपुष्टात आल्या- संरक्षणमंत्री राजनाथसिंह


Comments

Top