HOME   महत्वाच्या घडामोडी

विधानसभा अध्यक्षाची निवड, मी समोरासमोर लढणारा, आजमींचा ठाकरेंना विश्वास, तीन-चारला मंत्रीमंडळ विस्तार....०१ डिसेंबर २०१९


विधानसभा अध्यक्षाची निवड, मी समोरासमोर लढणारा, आजमींचा ठाकरेंना विश्वास, तीन-चारला मंत्रीमंडळ विस्तार....०१ डिसेंबर २०१९

* दीपक कराड ठरला लातूर मल्हार केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी
* लातुरच्या पाणी परिषदेचे उद्घाटन केले महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी
* लातूर बाजार समितीत सोयाबीनचा खरेदी सौदा चालणार दुपारी एक वाजेपर्यंत
* लातुरच्या चित्रपट महोत्सवात दाखवले ‘अस्तु’ आणि ‘कासव’ चित्रपट
* चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस, आज दाखवणार ‘यलो’ आणि ‘बाधा चित्रपट
* चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साधला प्रेक्षकांशी संवाद
* तुळजाभवानी मंदिरातील तिजोरीवर डल्ला, दागिने आणि पुरातन नाणी गायब
* झारखंड विधानसभेसाठी ६४.४४ टक्के मतदान
* मी समोरासमोर लढणारा, शत्रूला अंगावर घेणारा- उद्धव ठाकरे
* चालू विधानसभा अधिवेशन पूर्णपणे नियमबाह्य- देवेंद्र फडणवीस
* विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून नाना पटोले, भाजपाकडून किसन कथोरे
* विधानसभा अध्यक्षपदासाठी खुले मतदान होण्याची शक्यता, आज ११ वाजता निवड
* संघर्षाच्या प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अबू आजमी यांनी ठाकरे यांनी दिला विश्वास
* आणखी पाच आमदार येणार नव्या सरकारसोबत- बाळासाहेब थोरात
* छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं गुन्हा असेल तर तो मी हा गुन्हा अनेक वेळा करेन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
* अवयवदानात महाराष्ट्र देशात पहिला, केंद्राकडून मिळाला पुरस्कार
* येत्या तीन किंवा चार डिसेंबरला होणार राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार
* संजय राऊतांनी शिवसेना आणि महाराष्ट्राची वाट लावली- चंद्रकांत पाटील
* संजय राऊतांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज- रावसाहेब दानवे
* केदारनाथचं तापमान उतरलं पाच डिग्री सेल्सियसवर
* हैद्राबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभर आंदोलने, पुण्यातही झाला निषेध
* हैद्राबादच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
* कांदा पुन्हा दहा रुपयांनी महागला, जुना कांदा ७० रुपये, नवा कांदा ६० रुपये
* दक्षिण सियाचीनमध्ये हिमस्खलन, दोन जवानांचा मृत्यू
* अभिनेता अक्षयकुमारने केली नव्या ‘दुर्गावती’ चित्रपटाची घोषणा


Comments

Top