HOME   महत्वाच्या घडामोडी

साई बंधार्‍यातून शेतीसाठी पाणी उपसा, रितेश म्हणतात कर्जमाफीचा फायदा घेतला नाही, आज खातेवाटप शक्य, सोलापुरात राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस एकत्र.....०४ डिसेंबर २०१९


साई बंधार्‍यातून शेतीसाठी पाणी उपसा, रितेश म्हणतात कर्जमाफीचा फायदा घेतला नाही, आज खातेवाटप शक्य, सोलापुरात राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस एकत्र.....०४ डिसेंबर २०१९

* लातुरला पाणी पुरवठा करणार्‍या साई बंधार्‍यातून शेतीसाठी पाणी उपसा सुरु
* लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला सभात्याग
* आर्थिक जनगणनेला बाभळगावातून सुरुवात
* कर्जमाफीचा फायदा घेतला नाही, अभिनेता रितेश देशमुख यांचा दावा
* हैद्राबादेतील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातुरात निघाला मूकमोर्चा
* आपणास बरंच काही बोलायचं होतं, पण सरकारविरोधात बोलता आलं नाही- माजी सभापती सुमित्रा महाजन
* आज दुपारी तीन वाजता मंत्रीमंडळाची बैठक, महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता
* कॉंग्रेसचे नेते दिल्लीवरुन परतल्यानंतरच खातेवाटप शक्य
* हिवाळी अधिवेशनानंतरच खातेवाटप आणि विस्तार होईल, कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांचा दावा
* महाराष्ट्रासाठी काय केलं असं विचारणार्‍यांनीच शरद पवारांना एकत्र काम करण्याची ऑफर दिली- शिवसेना
* चालू विकास कामांना स्थगिती नाही, कामे वेगाने पूर्ण करणार- मुख्यमंत्री
* बुलेट ट्रेनच्या कामांचा आढावा घेऊन निर्णय घेणार- मुख्यमंत्री
* महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढणार- मुख्यमंत्री
* औरंगाबादेत बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन केलं जेरबंद
* महापोर्टलद्वारे झालेल्या नियुक्त्यांची चौकशी करण्याची मागणी
* भाजपाला दूर ठेवण्यासाठी सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र
* मुंबई उच्च न्यायालयात सहा न्यायमूर्तींची नियुक्ती
* महाराष्ट्र कर्जाच्या खाईत, प्रत्येक नागरिकावर ५४ हजारांचा बोजा
* शासकीय योजनेतून एका व्यक्तीला एकच घर घेता येणार
* माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास केला गेला, भाजपा सोडणार नाही- पंकजा मुंडे
* कांदा गेला आकाशी! कमाल दिडशे रुपयांचा भाव
* परदेशातील कांदा आल्यानंतरच कमी होतील भाव
* प्रियंकापेक्षा मला मुलांची काळजी वाटते- रॉबर्ट वाड्रा
* एक देश एक रेशन कार्ड योजना ०१ जून २०२० पासून, देशात कुठेही खरेदी करता येणार रेशन
* केंद्र सरकार रेशन दुकानातून देणार कांदा
* ओडिशात ‘पृथी-२’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
* आता ऑस्ट्रेलिया पाकिस्तानला मदत करणार नाही!
* पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक, आजवर १२ जण ताब्यात
* ‘दबंग तीन’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, साधूंना एका गाण्यात नाचताना दाखवलं!


Comments

Top